maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

HMD ग्लोबल तर्फे आकर्षक डिझाइन आणि यूपीआय पेमेंट सुविधेसह ९९९ रुपयांपासून नोकिया 105 क्लासिक सादर

[30 ऑक्टोबर २०२३, Mumbai] नोकिया फोन्सचे माहेरघर असलेल्या HMD ग्लोबलने आज आपल्या बाजारपेठेतील आघाडीच्या फीचर फोन पोर्टफोलिओमध्ये फक्त ९९९ रुपयांपासून मिळणाऱ्या नोकिया 105 क्लासिक ची उत्साहवर्धक भर घालत असल्याची घोषणा केली आहे. नोकिया फोनच्या विश्वासार्ह अस्सलतेला यूपीआयची सुलभता आणि सहज उपलब्धता यांची सांगड घालत या फोन मध्ये इनबिल्ट अंगभूत यूपीआय अॅप्लिकेशन आहे. त्यामुळे वापरकर्ते स्मार्टफोनशिवाय देखील यूपीआय पेमेंट व्यवहार सुरक्षितपणे आणि अखंडपणे करण्यास सक्षम होतात.

नोकिया 105 क्लासिक एक वर्षाच्या खात्रीशीर रिप्लेसमेंट गॅरंटीसह येतो. वायरलेस रेडिओ, अतुलनीय बॅटरी लाइफ, साधेपणा आणि वाजवी किंमत वैशिष्ट्यांसह असलेला हा फोन नोकिया फोनकडून अपेक्षित खात्री आणि विश्वासार्हता प्रदान करतो.

एचएमडी ग्लोबलचे इंडिया आणि एपीएसीचे उपाध्यक्ष रवी कुंवर म्हणाले, “आकर्षक नवीन डिझाइन आणि यूपीआय वैशिष्ट्यासह नेहमीपेक्षा आजवरचा सर्वाधिक समर्पक असा बाजारपेठेतील आघाडीच्या फीचर फोनमध्ये एक रोमांचक भर घालणारा नवीन नोकिया 105 क्लासिक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सर्व वैशिष्ट्यांनी युक्त आणि १,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या श्रेणीतील नोकिया 105 क्लासिक सह आमचा डिजिटल विषमता दूर करण्याचा आणि सर्वांसाठी आर्थिक सेवा अॅक्सेस सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.”

तुम्हाला कनेक्टेड ठेवण्यासाठी तयार केलेले डिझाइन
नोकिया 105 क्लासिक ने अगदी कठीण वातावरणातही टिकाव धरण्यासाठी कठोर टिकाऊपणाची चाचणी पार केली असून त्यायोगे कोणत्याही परिस्थितीत अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केली आहे. कीमॅटवरील प्रत्येक बटणामधील अंतर काळजीपूर्वक विचारात घेतल्याने, अंधारातही डायल करणे आणि टेक्स्ट पाठवणे सोपे होते.

उंचवलेला वापरकर्ता अनुभव आणि सुधारित ऑडिओ
नोकिया 105 क्लासिकचे अर्गोनॉमिक डिझाईन आणि सुटसुटीत आकार यामुळे तो हाताच्या पकडीत व्यवस्थित राहील आणि तुम्ही फिरत असताना सहजी तुमच्या खिशात मावू शकेल.

दिवसभरांसाठी बॅटरी
नोकिया 105 क्लासिक 800mAh बॅटरीने सुसज्ज आहे, विस्तारित स्टँडबाय वेळ पुरवत अगदी दिवसभर विनाव्यत्यय संभाषण करता येऊ शकते.

मनोरंजन आणि कार्यक्षमता
नोकिया 105 क्लासिक वापरकर्त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना कार्यक्षम ठेवण्यासाठी डिझाइन केलेल्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये वायरलेस एफएम रेडिओ असून त्यामुळे वापरकर्त्यांना हेडसेटशिवाय त्यांच्या आवडीचे रेडिओ स्टेशन ऐकता येऊ शकते.

मजबूत बांधणी
नोकियाला टिकाऊपणाचे महत्त्व समजले आहे आणि प्रत्येक नोकिया फोनची दैनंदिन वापरातील आव्हानांना तोंड देऊ शकेल याची खात्री करत काळजीपूर्वक चाचणी केली जाते. नोकिया 105 क्लासिकही त्याला अपवाद नसून उत्कटतेने बनवलेला आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही अतुलनीय कामगिरी पार पाडण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

किंमत आणि उपलब्धता
नोकिया 105 भारतात आजपासून सिंगल सिम आणि ड्युअल सिम, चार्जरसह आणि चार्जरशिवाय, अशा चार प्रकारांमध्ये ९९९ रुपयांपासून उपलब्ध होईल. नोकिया 105 चारकोल आणि निळा अशा दोन रंगात उपलब्ध आहे.
-समाप्त-

प्रॉडक्ट इमेज साठी लिंक
Nokia 105 Classic – https://we.tl/t-Cmog8fvtvi
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा
एचएमडी ग्लोबल इंडिया प्रेस ऑफिस : hmd@adfactorspr.com

About HMD Global

Headquartered in Espoo, Finland, HMD Global Oy (“HMD”) is the home of Nokia phones. HMD’s mission is providing accessible connectivity for everyone. HMD designs and markets a range of smartphones and feature phones and an expanding portfolio of innovative service offerings. With an ongoing commitment to security, durability, reliability, and quality across its range, HMD is the proud exclusive licensee of the Nokia brand for phones and tablets. For further information, see www.hmdglobal.com.

Related posts

मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरीचे अनावरण

Shivani Shetty

एटंेरोहल्ेथकेयरसोल्यशुन्सलिलिटेडनेसबेीकडेडीआरएचपीफाईिकेिे

Shivani Shetty

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून रोडसाइड असिस्टंस प्रोग्रामची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment