maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ऑडी इंडियाच्‍या विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची मोठी वाढ

मुंबई ४ ऑक्टोबर २०२३: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज या वर्षाच्‍या पहिल्‍या नऊमाहीत ५,५३० युनिट्सची विक्री करत विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची वाढ केल्‍याची घोषणा केली आहे. नवीन ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू३ व ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅकच्‍या लाँचसह ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू५ आणि टॉप-ऑफ-द-लाइन कार्स ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी ए८ एल, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी ई-ट्रॉन जीटी व ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांच्‍यासाठी सतत होत असलेल्‍या मागणीमुळे सकारात्‍मक वाढ झाली आहे. याच कालावधीमध्‍ये एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये मोठी १८७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे आणि परफॉर्मन्स व लाइफस्‍टाइल कार्ससह ई-ट्रॉन श्रेणीमध्‍ये ४२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी इंडियाने ५,५३० युनिट्सची विक्री करत प्रबळ ८८ टक्क्यांच्‍या वाढीची नोंद केली. तसेच आमच्‍या एसयूव्‍हींमध्‍ये १८७ टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ दिसण्‍यात आली आहे. आगामी सणासुदीच्‍या काळासह आम्‍हाला आमच्‍या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्स जसे ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, क्‍यू५, ऑडी क्‍यू७ व ऑडी क्‍यू८ साठी मागणी कायम राहण्‍यासह ही वाढ सुरू राहण्‍याची अपेक्षा आहे. आमच्‍या नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या कार्स ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन (उद्योगामध्‍ये सर्वोत्तम असलेल्‍या प्रभावी ११४ केडब्ल्‍यूएच बॅटरीसह ऑफर करण्‍यात आलेली) यांसह आमचा विभागातील सर्वात मोठा ईव्‍ही पोर्टफोलिओ आहे. आम्‍हाला सणासुदीच्‍या काळादरम्‍यान आमच्‍या इलेक्ट्रिक श्रेणीसाठी उत्तम मागणी मिळण्‍याचा विश्‍वास आहे, ज्‍यामध्‍ये भारतातील पहिल्‍या ईव्‍ही सुपरकार्स – ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांचा देखील समावेश आहे.”

श्री. धिल्‍लों पुढे म्‍हणाले, “मोठी मागणी, लक्‍झरी कार विभागामधील विस्‍तारीकरण, सर्वसमावेशक डेमो‍ग्राफिक्‍स आणि अनुकूल आर्थिक स्थितींमुळे प्रबळ विक्री कामगिरी वाढीला साह्य करत आहे. आज, प्रत्‍येकी चारपैकी एक ग्राहक रिपीट ऑडी ग्राहक आहे, ज्‍यामधून आमच्‍या निदर्शनास येते की ग्राहक आनंदी आहेत. आम्‍ही विकासाच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत, जेथे शाश्‍वतता, लाभदायी व्‍यवसाय आमचे धोरण आहे आणि आम्‍हाला उच्‍च दोन-अंकी वाढीसह वर्षाची सांगता होण्‍याची अपेक्षा आहे.”

 

जानेवारी ते सप्‍टेंबर २०२३ कालावधीत ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस (पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय) ६३ टक्‍क्‍यांनी वाढला. ऑडी इंडियाने भारतातील आपला पूर्व-मालकीचा कार व्‍यवसाय ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लसचे विस्‍तारीकरण सुरू ठेवले आहे. सध्‍या देशातील सर्व प्रमुख ठिकाणी २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस सुविधांसह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड विस्‍तार करत आहे आणि २०२३ च्‍या अखेरपर्यात २७ पूर्व-मालकीच्‍या कार सुविधा असतील.

इलेक्ट्रिफिकेशन धोरणाला अधिक पुढे नेत ऑडी इंडियाने नुकतेच ईव्‍ही मालकांसाठी उद्योगातील पहिला उपक्रम – ‘मायऑडीकनेक्‍ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ची घोषणा केली. हे एक-थांबा सोल्‍यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपवर विविध इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती देते. सध्‍या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत, ज्‍यामध्‍ये पुढील काही महिन्‍यांत अधिक भर होईल.

ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू५, ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ५०, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन ५५, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५० ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ५५ ई-ट्रॉन, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.

Related posts

एसटेक 2023 मुंबई: भारताच्या वास्तूकला, रचना आणि पायाभूत सुविधात क्रांतीकारी बदल करणारे भविष्य

Shivani Shetty

व्हिएतजेटने तिरूचिरापल्ली ते हो ची मिन्ह सिटी दरम्‍यान नवीन थेट उड्डाणमार्गाच्‍या माध्‍यमातून भारत व व्हिएतनामधील कनेक्‍टीव्‍हीटी वाढवली

Shivani Shetty

आशिया कस्टमर एंगेजमेंट फोरम’ चे दोन पुरस्कार माइंड वॉर्सने पटकावले

Shivani Shetty

Leave a Comment