maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

सॅमसंगकडून ११ किग्रॅ एआय इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सची नवीन श्रेणी लाँच, जी जवळपास ७० टक्‍क्‍यांपर्यंत वीजेची बचत करते, ५० टक्‍के कमी वॉश टाइम आणि ४५.५ टक्‍के सर्वोत्तम फॅब्रिक केअर देते

गुरूग्राम, भारत – मार्च 13, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज एआय इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सची नवीन श्रेणी लाँच केली. वॉशिंग मशिन्‍सची ही नवीन श्रेणी एआय वॉश, क्‍यू-ड्राइव्‍हTM व ऑटो डिस्‍पेन्‍स अशी प्रगत वैशिष्‍ट्ये असलेली ११ किग्रॅ विभागातील पहिली श्रेणी आहे, ज्‍यामुळे ५० टक्‍के जलदपणे कपडे धुतले जातात, ४५.५ टक्‍के सर्वोत्तम फॅब्रिक केअर मिळते आणि जवळपास ७० टक्‍के अधिक ऊर्जा-कार्यक्षम आहे.
एआय इकोबबलTM सॅमसंगच्‍या क्‍यू-बबलTMआणि क्विकड्राइव्‍हTMतंत्रज्ञानांचे परिपूर्ण संयोजन आहे, जे वॉशिंगला अधिक सर्वोत्तम करण्‍यासह कपडे धुण्‍यासाठी वेळ कमी लागण्‍याची खात्री देतात. क्‍यू-बबल™️ तंत्रज्ञानामध्‍ये जलदपणे डिटर्जंट सामावून जाण्‍यासाठी अधिक प्रमाणात बबल्‍स निर्माण करण्‍याकरिता अतिरिक्‍त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन समाविष्‍ट आहे. क्विकड्राइव्‍हTM वॉश टाइम जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी करते. ही वैशिष्‍ट्ये एआय इकोबबलची कार्यक्षमता सुधारित व शाश्‍वत करतात, तसेच पाणी व वीजेची मोठ्या प्रमाणात बचत करतात.
ऑटो डिस्‍पेन्‍स आणि एआय वॉश असलेली नवीन श्रेणी सर्वोत्तम व स्‍मार्ट आहे. एआय वॉश वैशिष्‍ट्य कपड्यांचा भार ओळखते आणि त्‍यानुसार आवश्‍यक पाणी व डिटर्जंटचा वापर करते. तसेच ते कपड्याचा सॉफ्टनेस ओळखत कपड्यांच्‍या संरक्षणासाठी वॉश व स्पिन वेळ समायोजित करते.
”सॅमसंगमध्‍ये आमचा सर्वोत्तम व शाश्‍वत तंत्रज्ञान सादर करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे. आम्‍ही विविध ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा लक्षात घेत नवीन श्रेणी डिझाइन केली आहे. ११ किग्रॅ फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍स विभागातील आमची पहिली श्रेणी अत्‍यंत ऊर्जा कार्यक्षम आहे. ऑटो डिस्‍पेन्‍स, एआय वॉश आणि क्‍यू-ड्राइव्‍हTM यांसारखी वैशिष्‍ट्ये वॉशिंगला अधिक सोपे व सुलभ करतात,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेस व्‍यवसायाचे वरिष्‍ठ संचालक पुष्‍प बाईशाकिया म्‍हणाले.
”आम्‍हाला विश्‍वास आहे की, एआय इकोबबलTM वॉशिंग मशिन्‍सच्‍या आमच्‍या नवीन श्रेणीच्‍या माध्‍यमातून सॅमसंग आजच्‍या ग्राहकांची जीवनशैली उत्‍साहित करण्‍यासह त्‍यांच्‍या जीवनात मूल्‍याची भर करेल,” असे ते पुढे म्‍हणाले.
आधुनिक काळातील भारतीय ग्राहक वॉशिंग चक्रांची संख्‍या कमी करणारे, पाण्‍याची बचत करणारे आणि बेडिंग्‍ज/पडदे यांसारख्‍या हेवी लाँड्रीसाठी पुरेशी जागा असणा-या लाँड्री सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत आहेत. नवीन लाँच करण्‍यात आलेली वॉशिंग मशिन्‍सची एआय इकोबबलTM श्रेणी ग्राहकांना लाँड्रीसाठी आवश्‍यक असलेल्‍या सोयीसुविधा व वॉश केअर प्रदान करेल.
एआय इकोबबलTM वॉशिंग मशिन्‍सची नवीन श्रेणी तुमच्‍या स्‍मार्टफोनवरील सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज अॅपच्‍या माध्‍यमातून कधीही व कुठूनही देखरेख व नियंत्रित करता येऊ शकते. ही श्रेणी वैयक्तिकृत वैशिष्‍ट्यांसह येते, जसे हॅबिट लर्निंग आणि इन्‍फॉर्मेटिव्‍ह डिस्‍प्‍ले, जे ग्राहकांना वापरण्‍याच्‍या पद्धतींची आठवण करून देतात, सायकल्‍सबाबत सल्‍ला देतात आणि वेळेवर माहिती दाखवतात. सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज अतिरिक्‍त वॉश प्रोग्राम्‍ससह सायकल्‍स, प्‍लानिंग व समस्‍येबाबत सल्‍ला देते. ते आपोआपपणे कपडे सुकण्‍याच्‍या कालावधीला देखील निवडते*.
नवीन लाइन-अप अद्वितीय स्‍पेसमॅक्‍सTM तंत्रज्ञानासह देखील येते, जे बाहेरील आकारमान न वाढवता आतील बाजूस अधिक जागा निर्माण करते.
डिझाइन व रंग
इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन श्रेणीमध्‍ये मॉडर्न डिझाइनसह रिअर कंट्रोल पॅनेल असेल आणि काळ्या रंगामध्‍ये उपलब्‍ध असेल.
किंमत व उपलब्‍धता
नवीन श्रेणी ७ मार्च २०२४ पासून ६७९९० रूपये ते ७१९९० रूपयांपर्यंतच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल.
निवडक मॉडेल्‍स सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप, रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ईकॉमर्स व्‍यासपीठांवर उपलब्‍ध असतील.
वॉरंटी व ऑफर्स
डिजिटल इन्‍वर्टर टेक्‍नॉलॉजीसह सुसज्‍ज नवीन मॉडेल्‍स २० वर्षांच्‍या वॉरंटीसह येतात.
जवळपास ७० टक्‍के वीजबचतीसाठी एआय इकोबबल™️
नवीन मॉडेलमध्‍ये अत्‍यंत कार्यक्षम व इको-फ्रेण्‍डली तंत्रज्ञान एआय इकोबबल™️ आहे, जे डिटर्जंटला बबल्‍समध्‍ये बदलते. यामुळे कमी तापमानामध्‍ये देखील कपड्यांवरील धूळ जलदपणे निघून जाते आणि जवळपास ७० टक्‍के वीजेची बचत होते, तसेच मातीचे डाग २४ टक्‍क्‍यांनी कमी होतात आणि ४५.५ टक्‍के सर्वोत्तम फॅब्रिक केअरची खात्री मिळते. एआय इकोबबल™️ विविध कपडे व त्‍यांच्‍या गुणधर्मांना ओळखते आणि अनेक डेटा पॅटर्न्‍समधून योग्‍य वॉश सायकल ऑप्टिमाइज करते. यामुळे फॅब्रिक सेन्सिंगसह कपड्यांचे जवळपास २० टक्‍के संरक्षण होण्‍यास मदत होते.
अधिक स्‍पेससाठी स्‍पेसमॅक्‍स™️ डिझाइन
६०० x८५० x ६०० मिमी आकार असलेली नवीन ११-किग्रॅ वॉशिंग मशिन कोणत्‍याही जागेमध्‍ये सहजपणे मावू शकते, ज्‍यामुळे लिव्हिंग स्‍पेसेस ऑप्टिमाइज करू पाहणाऱ्या आजच्‍या ग्राहकांसाठी ही वॉशिंग मशिन योग्‍य पर्याय आहे. यामधील स्‍पेसमॅक्‍स™️ डिझाइन आतील बाजूस अधिक स्‍पेस निर्माण करते, ज्‍यामुळे मोठ्या आकाराच्‍या लाँड्री वस्‍तूंचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होते.
कमी वॉशिंग वेळेसाठी क्विकड्राइव्‍ह™️
आणखी एक अद्वितीय वैशिष्‍ट्य म्‍हणजे क्विकड्राइव्‍ह, जे वॉशिंग वेळ जवळपास ५० टक्‍क्‍यांनी कमी करू शकते. अद्वितीय क्‍यू-बबल™️ तंत्रज्ञानामध्‍ये अधिक प्रमाणात शक्तिशाली बबल्‍स तयार करण्‍यासाठी अतिरिक्‍त वॉटर शॉट्ससह डायनॅमिक ड्रम रोटेशन आहे. यामुळे डि‍टर्जंट जलदपणे कपड्यांमध्‍ये सामावून जाते आणि जलदपणे व सौम्‍यपणे धुतले जातात. भर करण्‍यात आलेले क्विकड्राइव्‍ह™️ बटन वॉशिंग मशिन वापराला अधिक सर्वोत्तम व सुलभ करते.
कपड्यांची काळजी घेणारे फॅब्रिक सेन्सिंग
एआय वॉश वैशिष्‍ट्य कपड्यांचे वजन ओळखते आणि लोडनुसार मुलभूत वॉश सायकल निर्धारित करते. लोड २ किग्रॅपेक्षा कमी असल्‍यास ते कपड्यांचा सॉफ्टनेस ओळखते आणि त्‍यानुसार बबल्‍स, मोटर स्‍पीड व आवश्‍यक रिन्सिंगची खात्री देते. याव्‍यतिरिक्‍त, यामधील एआय ड्राइंग वैशिष्टय ड्राइंग प्रक्रियेदरम्‍यान कपड्यामधील ओलाव्‍याच्‍या प्रमाणाचे विश्‍लेषण करत सानुकूल ड्राइंग सायकलची निवड करते.
क्विकड्राइव्‍हTMसह सुपरस्‍पीड
लाँड्री कामाला अधिक गतीशील करत नवीन एआय इकोबबल™️ मॉडेल्‍स क्विकड्राइव्‍ह™️ तंत्रज्ञानाच्‍या मदतीने संपूर्ण लोडला ३९ मिनिटांमध्‍ये वॉश करतात. स्‍पीड स्‍प्रेचा वापर करत रिन्सिंग वेळ कमी होतो आणि स्पिन गती अधिक वाढते.
टिकाऊपणा
डिजिटल इन्‍व्‍हर्टर टेक्‍नॉलॉजी वॉशिंग मशिन्‍सच्‍या शांतमय व अधिक शक्तिशाली परफॉर्मन्‍ससाठी प्रबळ चुंबकांचा वापर करते, ज्‍यामुळे वीजेचा कमी वापर होतो. यामुळे एआय इकोबबल™️ अधि‍क विश्‍वसनीय व टिकाऊ क्‍लीनिंग पार्टनर आहे.
सहजपणे देखरेख ठेवता येते
वापरकर्त्‍यांना डिटर्जंट ड्रॉवरमध्‍ये राहिलेले चिकट अवशिष्‍ट साफ करण्‍याचा त्रास होत नाही. स्‍टे क्‍लीन ड्रॉवर त्‍याच्‍या विशेषरित्‍या डिझाइन केलेल्‍या वॉटर फ्लशिंग सिस्‍टममधील पाण्‍याच्‍या शक्तिशाली जेट्सच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक डिटर्जंट साफ होण्‍याची खात्री देते.
*वॉशर व ड्रायर एआय कंट्रोल आणि वाय-फाय कनेक्‍टेड असल्‍यास ऑटो सायकल लिंक उपलब्‍ध होते.

Related posts

बहिणीला मेसेज करुन अल्पवयीन मुलीचा टोकाचा निर्णय, सारं गाव सुन्न, कारण…

cradmin

जान्हवी कपूरने मुंबईमध्ये गोरेगावआणि वांद्रे येथे कल्याण ज्वेलर्सच्यादोन नवीन शोरूम्सचे उदघाटन केले

Shivani Shetty

यू.एस. मधील आरोग्य सेवा संस्थांसाठी प्रशासकीय, क्लिनिकल आणि आर्थिक सेवांचा सर्वात व्यापक पुरवठादार तयार करण्यासाठी IKS हेल्थने AQuity सोल्यूशन्स ताब्यात घेतले

Shivani Shetty

Leave a Comment