मुंबई, ३ डिसेंबर, २०२३: भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्याज्वेलरी कंपन्यांपैकी एक कल्याण ज्वेलर्सने आज मुंबईतील गोरेगाव व वांद्रे येथेदोन नवीन शोरूम्स सुरु केली. बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरने दोन्ही शोरूम्सचेउदघाटन केले. जागतिक स्तरावरील वातावरणामध्ये दागिने खरेदीचा अद्भुत वशानदार अनुभव मिळवण्याची सुवर्णसंधी मुंबईकर ग्राहकांना उपलब्ध झालीआहे.
गोरेगावचे शोरूम एमजी रोडवर काबरा डीएमोन्तेमध्ये आणि वांद्रयातील शोरूमजंक्शन ऑफ वॉटरफील्ड व गुरुनानक रोडवर आहे. या नवीन शोरूम्समुळे आतादेशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या शोरूम्सची संख्या ११वर पोहोचली आहे. या भागात कंपनी सातत्याने रिटेल विस्तार करत आहे आणिआपला ब्रँड जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
लॉन्च ऑफर म्हणून ग्राहकांना सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर २०% पर्यंतचीसूट दिली जाईल. “कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट” चे लाभ देखील त्यांनामिळवता येतील, हा मार्केटमधील सर्वात कमी रेट असून कंपनीच्या सर्वशोरूम्समध्ये स्टँडर्डाइज्ड आहे. येथील प्रत्येक ग्राहकाला सहजपणे दागिनेखरेदीचा आणि तत्पर सेवांचा अनुभव मिळवता येईल.
बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरने सांगितले, “कल्याण ज्वेलर्सच्या शानदार शोरूमलॉन्च सोहळ्यामध्ये सहभागी होणे हा मी माझा सन्मान मानते. कल्याणज्वेलर्सच्या शानदार कलेक्शन्समध्ये सौंदर्य आणि आपल्या देशातील विविधपरंपरांचा उत्कृष्ट संगम आहे. विश्वास आणि पारदर्शकतेच्या पायावरउभारण्यात आलेला आणि ग्राहक समाधानाप्रती बांधिलकी जपणाऱ्या याप्रतिष्ठित ब्रँडची मी प्रतिनिधी आहे याचा मला अभिमान वाटतो. मला खात्रीआहे की, येथील ग्राहकांकडून कल्याण ज्वेलर्स ब्रँडला भरघोस प्रतिसादमिळेल.”
नवीन शोरूम्सबद्दल कल्याण ज्वेलर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री रमेशकल्याणरमण यांनी सांगितले, “एक कंपनी म्हणून आम्ही अनेक महत्त्वाचे टप्पेपार केले आहेत आणि ग्राहकांचा दागिने खरेदीचा अनुभव वाढवण्यासाठीव्यापक इकोसिस्टिम तयार करण्यासाठी महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. वांद्रे आणि गोरेगावमध्ये दोन नवीन शोरूम्सच्या लॉन्चची घोषणा करतानाआम्हाला खूप आनंद होत आहे. वृद्धीच्या वाटचालीच्या पुढील टप्प्यामध्ये प्रवेशकरताना, या क्षेत्रामध्ये विस्तार करताना आम्ही आमच्या ग्राहकांना श्रेणीतीलसर्वोत्तम शॉपिंग अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विश्वासआणि पारदर्शकता या कंपनीच्या पायाभूत मूल्यांचे पालन करण्यासाठी आम्हीसदैव प्रयत्नशील आहोत.”
कल्याण ज्वेलर्समध्ये विकले जाणारे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क्ड असतातआणि अनेक शुद्धता तपासण्या यशस्वीपणे पार केल्यानंतरच विक्रीसाठीठेवण्यात येतात. दागिन्यांच्या खरेदीसोबत ग्राहकांना ४–लेवल अश्युरन्ससर्टिफिकेशन मिळते ज्यामध्ये शुद्धता, दागिन्यांचे फ्री लाइफटाइम मेन्टेनन्स, उत्पादनाची तपशीलवार माहिती आणि पारदर्शक एक्स्चेंज व बाय–बॅकधोरणांची हमी दिलेली असते. हे सर्टिफिकेशन आपल्या ग्राहकांना सर्वोत्तमउत्पादने, सेवा प्रदान करण्याची ब्रँडची बांधिलकी दर्शवते.
कल्याण ज्वेलर्सने अनेक लोकप्रिय इन–हाऊस ब्रँड प्रस्तुत केले आहेत – मुहूरत(लग्नातील दागिन्यांचे विशेष कलेक्शन), मुद्रा (हातांनी घडवण्यात आलेलेअँटिक दागिने), निमाह (टेम्पल ज्वेलरी) ग्लो (डान्सिंग डायमंड्स), जिया(सॉलिटेयरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट हिरे), अपूर्व (खास प्रसंगीवापरावयाचे दागिने), अंतरा (वेडिंग डायमंड्स), हेरा (रोज वापरू शकू असेहिरे), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि नव्याने लॉन्च करण्यात आलेलेलीला (रंगीत स्टोन्स व हिऱ्यांचे दागिने) यांचा यामध्ये समावेश आहे.
ब्रँड, त्यांची कलेक्शन्स व ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या– https://www.kalyanjewellers.net/
*अटी व शर्ती लागू.
About Kalyan Jewellers
Headquartered in Thrissur in the state of Kerala, Kalyan Jewellers is one the largest jewellery retailers in India with a presence in the Middle East. The company has enjoyed a long-standing presence in the Indian market for nearly three decades and has set industry benchmarks in quality, transparency, pricing and innovation. Kalyan offers an array of traditional and contemporary jewellery designs in gold, diamonds and precious stones catering to the distinct needs of the customers. Kalyan Jewellers has over 220showrooms across India and the Middle East.