maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगचे सर्कल टू सर्च वैशिष्‍ट्य असलेले गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी आता २५,९९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीपासून उपलब्‍ध

गुरूग्राम, भारत – ऑगस्‍ट, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी स्‍मार्टफोन्‍सच्या अभूतपूर्व किमतीची घोषणा केली. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये सॅमसंगचे सर्वोत्तम फ्लॅगशिप मोबाइल इनोव्‍हेशन्‍स आहेत आणि आता सर्कल टू सर्च विथ गुगल या एआय वैशिष्‍ट्यासह येतात.
लिमिटेड पीरियड ऑफर अंतर्गत गॅलॅक्‍सी ए५५ ५जी ३३,९९९ रूपयांच्‍या निव्‍वळ सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी २५,९९९ रूपयांच्‍या निव्‍वळ सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल.
गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये अनेक प्रमुख वैशिष्‍ट्यांसह गोरिला ग्‍लास विक्‍टस+, एआयद्वारे सुधारण्‍यात आलेली कॅमेरा वैशिष्‍ट्ये, सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट, चार ओएस अपडेट्स आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत.
ग्राहक आघाडीच्‍या बँकांच्‍या क्रेडिट कार्ड्सचा वापर करत या स्‍मार्टफोन्‍सची खरेदी करताना गॅलॅक्‍सी ए५५ ५जी वर ६००० रूपये आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी वर ५००० रूपये आकर्षक बँक कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. तसेच, ते जवळपास सहा महिन्‍यांपर्यंतच्‍या ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात.
ग्राहक गॅलॅक्‍सी ए५५ ५जी वर जवळपास ६००० रूपयांच्या आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी वर जवळपास ५००० रूपयांच्या अपग्रेड बोनसचा देखील आनंद घेऊ शकतात. पण, ग्राहक बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस यापैकी एकाचाच आनंद घेऊ शकतात.
सर्कल टू सर्च
गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी सर्कल टू सर्च वैशिष्‍ट्यासह येतात, जे पारंपारिक शोध घेण्‍याच्‍या पद्धतींच्‍या तुलनेत डिस्‍कव्हरीचा परिवर्तनात्‍मक अनुभव देते. गुगलसोबत सहयोगासह सादर करण्‍यात आलेले हे वैशिष्‍ट्य उपयुक्‍तता व सर्वोत्तमता सुधारण्‍यासाठी सतत विकसित होत आहे. गॅलॅक्‍सी एआयच्‍या सर्वात लोकप्रिय वैशिष्‍ट्यांपैकी एक सर्कल टू सर्च वापरकर्त्‍यांना साध्‍या गेस्‍चरसह जसे हाताच्‍या बोटाने टेक्‍स्‍टभोवती सर्कल करत किंवा स्क्रिनवरील वस्‍तूवर स्क्रिबलिंग करत स्क्रिनवर शोध घेण्‍याची सुविधा देते, ज्‍यासाठी अॅप्‍स स्विच करण्‍याची गरज भासत नाही. उदाहरणार्थ, वापरकर्त्‍यांना सोशल मीडिया पोस्‍टवर आवडणारे पोशाख दिसल्‍यास ते सर्कल टू सर्चचा वापर करत त्‍यांच्‍याभोवती सर्कल करत त्‍याच प्रकारच्‍या उत्‍पादनांचा ऑनलाइन त्‍वरित शोध घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमध्‍ये सर्वोत्तम ठरलेले वैशिष्‍ट्य सर्कल टू सर्च दैनंदिन टास्‍क्‍समध्‍ये मदत करू शकते, जसे ठिकाण ओळखणे, अनटॅग वस्‍तूंसाठी शॉपिंग करणे किंवा व्हिडिओमधील माहिती एक्‍स्‍प्‍लोअर करणे.
ऑसम कॅमेरा
गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये अनेक आकर्षक वैशिष्‍ट्यांसह गॅलॅक्‍सीच्‍या फ्लॅगशिप कॅमेरा इनोव्‍हेशन्‍समधून प्रेरित फोटोग्राफी क्षमता आणि आकर्षक ६.६-इंच स्क्रिन डिस्‍प्‍ले आहे, जो व्हिजन बूस्‍टरसह वापरकर्त्‍यांच्‍या सभोवतालच्‍या वातावरणाशी जुळून जातो. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेनसह ओआयएस आणि १२ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा आहे, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेनसह ओआयएस आणि ८ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा आहे. दोन्‍ही स्‍मार्टफोन्‍समध्‍ये ५ मेगापिक्‍सल मॅक्रो आहे. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये ३२ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये १३ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे. तसेच डिवाईसेसमध्‍ये व्‍हीडीआयएसमुळे ४के स्‍टेबिलायझेशन + अॅडप्टिव्‍ह व्‍हीडीआयएस (व्हिडिओ डिजिटल इमेज स्‍टेबिलायझेशन) आणि ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन) अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जी चालता-फिरता फोटो व व्हिडिओ सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर होण्‍याची खात्री देतात. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी वरील सुधारित नाइटोग्राफी वैशिष्‍ट्य अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटो कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आहेत, जे फुल एचडी क्‍लेअरिटी आणि सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतात.
तसेच, गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी स्‍मार्टफोन्‍समध्‍ये विविध नाविन्‍यपूर्ण एआय सुधारित कॅमेरा वैशिष्‍ट्ये आहेत, जे वापरकर्त्‍याच्‍या कन्‍टेन्‍ट गेमला नव्‍या उंचीवर नेतात. फोटो कॅप्‍चर केल्‍यानंतर एआय एडिट्सचा सल्‍ला देते, जसे फोटो रिमास्‍टर वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या फोटोना अधिक आकर्षक करते, पोर्ट्रेट इफेक्‍ट महत्त्वपूर्ण असलेल्‍या गोष्‍टींवर फोकस करण्‍यास मदत करते आणि ऑब्‍जेक्‍ट इरेजर वैशिष्‍ट्य सर्व फोटो-बॉम्‍बर्स व प्रतिबिंबांना दूर करण्‍यास वापरता येऊ शकते. अत्‍यंत लोकप्रिय इमेज क्लिपर कोणत्‍याही इमेजची क्लिप तयार करण्‍यास आणि त्‍याचा स्टिकर म्‍हणून वापर करण्‍यास मदत करते. अॅडजस्‍ट स्‍पीड वैशिष्‍ट्य देखील अद्भुत आहे, जेथे ते व्हिडिओंची गती बदलण्‍यास मदत करते आणि व्‍यावसायिकदृष्‍ट्या शूट केलेल्‍या क्लिप्‍सप्रमाणेच ड्रॅमॅटिक आऊटपुट्सची निर्मिती करते.
ऑसम डिझाइन आणि टिकाऊपणा
हे डिवाईसेस आयपी६७ प्रमाणित आहेत, म्‍हणजेच ते १ मीटर फ्रेश वॉटरमध्‍ये जवळपास ३० मिनिटे टिकून राहू शकतात. तसेच, हे डिवाईसेस धूळ व वाळूला विरोध करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे कोणत्‍याही स्थितीसाठी अनुकूल आहेत. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी चे नकळतपणे पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षणासाठी पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास विक्‍टस+ संरक्षण आहे.
ऑसम कार्यक्षमता
४ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेले नवीन एक्झिनॉस १४८० प्रोसेसर गॅलॅक्‍सी ए५५ ५जीला शक्‍ती देते, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ५ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या एक्झिनॉस १३८० प्रोसेसरसह अपग्रेड करण्‍यात आला आहे. हे पॉवर-पॅक स्‍मार्टफोन्‍स विविध एनपीयू, जीपीयू व सीपीयू अपग्रेड्ससह ७० टक्‍क्‍यांहून अधिक मोठ्या कूलिंग चेम्‍बरसह येतात, ज्‍यामधून गेम असो किंवा मल्‍टी-टास्‍क असो सुलभ आऊटपुटची खात्री मिळते.
अभूतपूर्व ऑसम सुरक्षितता
गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये पहिल्‍यांदाच फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी डिवाईसेसपासून गॅलॅक्‍सी ए सिरीजच्‍या वापरकर्त्‍यांसाठी सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट आहे. हार्डवेअर-आधारित व टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट सिक्‍युरिटी सोल्‍यूशन सुरक्षित अंमलबजावणी वातावरण निर्माण करत हार्डवेअर व सॉफ्टवेअर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते, जे सिस्‍टमच्‍या मुख्‍य प्रोसेसर व मेमरीपासून प्रत्‍यक्ष वेगळे आहे. यामुळे डिवाईसमधील सर्वात महत्त्वपूर्ण डेटासह लॉक स्क्रिन क्रेडेन्शियल्‍स जसे पिन कोड्स, पासवर्ड्स आणि पॅटर्न्‍सचे संरक्षण होते. सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट डिवाईस एन्क्रिप्‍शन कीजचे देखील संरक्षण करते, ज्‍यामुळे डिवाईसवर स्‍टोअर करण्‍यात आलेल्‍या वापरकर्त्‍यांच्‍या खाजगी डेटाचे एन्क्रिप्ट होते. योग्‍य लॉक स्क्रिन क्रे‍डेन्शियल्‍स असलेले वापरकर्ते डिवाईस हरवला किंवा चोरी झाला तरी त्‍यांचा डेटा मिळवू शकतात.
अधिक सुरक्षिततेसाठी गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी स्‍मार्टफोन्‍समध्‍ये ऑटो ब्‍लॉकर आहे, जे कार्यान्वित केल्‍यास अनऑथोराइज्‍ड स्रोतांकडून अॅप इन्‍स्‍टॉलेशन्‍सना ब्‍लॉक करू शकते, संभाव्‍य मालवेअर ओळखण्‍यासाठी अॅप सुरक्षितता तपासते आणि यूएसबी केबलशी कनेक्‍टेड असताना डिवाईसमधील संभाव्‍य मालिशियस कमांड्स व सॉफ्टवेअर इन्‍स्‍टॉलेशन्‍सना ब्‍लॉक करते.
गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी डिवाईसेस Samsung.com, सॅमसंग स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून खरेदीसाठी उपलब्‍ध आहेत. गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ऑसम लिलाक, ऑसम आइस ब्‍ल्‍यू व ऑसम नेव्‍ही या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे, तर गॅलॅक्‍सी ए५५ ५जी ऑसम आइस ब्‍ल्‍यू आणि ऑसम नेव्‍ही या दोन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.
मॉडेल ए५५ ५जी ए३५ ५ी
मूळ किंमत (८ जीबी/ १२८ जीबी) ३९,९९९ रूपये ३०,९९९ रूपये
ऑफर ६००० रूपये ५००० रूपये
एनईपी (निव्‍वळ किंमत) ३३,९९९ रूपये २५,९९९ रूपये

Related posts

२०४७ पर्यंत पूर्णत: सक्रिय भारतीयांमुळे जीडीपीमध्‍ये वार्षिक १५ ट्रिलियन रूपयांपेक्षा जास्‍त वाढ होऊ शकते: स्‍पोर्टस् अँड फिजिकल अॅक्टिव्‍हीटी (एसएपीए) बाबत डालबर्ग अहवाल

Shivani Shetty

आयएचसीएल चे पर्यटकांसाठी ‘इमर्सिव्ह एक्सपिरियन्स’ गोवा

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून एसयूव्‍ही सर्वोत्तमतेमधील नवीनयुगाचा शुभारंभ

Shivani Shetty

Leave a Comment