maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

१४व्या शिकागो दक्षिण आशियाई महोत्सवात क्लोजिंग नाईटसाठी स्टोरीटेलर चित्रपटाची निवड

विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपला झेंडा रोवल्यानंतर, अनंत महादेवन दिग्दर्शित, जिओ स्टुडिओजचा ‘द स्टोरीटेलर’ हा चित्रपट आता 22 सप्टेंबर रोजी 14 व्या शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात क्लोजिंग नाईटसाठी निवडला गेला आहे. या चित्रपटात परेश रावल, आदिल हुसैन, तनिष्ठा चॅटर्जी, जयेश मोरे आणि रेवती यांच्यासह अनेक नावाजलेले कलाकार आहेत. हा सिनेमा दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या ‘गोल्पो बोलिये तारिणी खुरो’ या लघुकथेवर आधारित आहे.

अनंत महादेवन यांनी शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत असे म्हणाले की , “द स्टोरीटेलर हा दिग्गज कथाकार सत्यजित रे यांना योग्य श्रद्धांजली म्हणून उदयास आला आहे. चित्रपट महोत्सव हे केवळ आपल्या कामाचे प्रदर्शन करण्यासाठी नसतात; ते कथा आणि सिनेमातील जादूचा उत्सव साजरा करण्यासाठी असतात. आमच्या चित्रपटाची प्रतिष्ठित शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात क्लोजिंग नाईट फिल्म म्हणून निवड झाली आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो आणि आमच्या सर्वांसाठी हा सर्वात आनंदाचा क्षण आहे कारण ही एक संधी आहे जिथे आमच्या कथा मोठ्या पडद्यावर जिवंत राहतात, प्रेक्षकांशी संपर्क साधतात आणि संभाषण सुरू ठेवतात. मुळात जगभर गाजत असलेले आणि सत्यजित रे ना एकमताने मिळालेले कौतुक हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि संपूर्ण नवीन पिढी त्यांच्या कार्यात सहभागी होत आहे!”

बुसान, पाम स्प्रिंग्स, इफ्फी, ह्यूस्टनचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव, IFFK केरळ, RIFF आणि चेन्नई चित्रपट महोत्सव यांसह अनेक जागतिक आणि भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये द स्टोरीटेलर ने सकारात्मक प्रतिक्रिया आणि प्रशंसा मिळवली आहे. हे एका श्रीमंत उद्योगपतीची कथा सांगते जो निद्रानाशावर मात करण्यासाठी कथाकाराची नियुक्ती करतो आणि त्यात ट्विस्ट जोडले गेल्याने ते अधिक मनोरंजक होते. मूळ बंगाली लघुकथा गोलपो बोलिये तारिणी खुरो ही रे यांनी लिहिलेल्या कथांच्या मालिकेपैकी एक आहे, जी त्यांनी तयार केलेल्या तारिणी खुरो या गूढ पात्रावर आधारित आहे.

हा चित्रपट दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या एका लघुकथेवर आधारित आहे, ही एका धनाढ्य व्यावसायिकाची कथा आहे जो त्याच्या निद्रानाशावर मात करण्यासाठी एका कथाकाराची नियुक्ती करतो, ह्यात खूप सारे ट्विस्ट आणि वळणे समाविष्ट असल्याने हि कथा अधिक आकर्षित बनते. मूळ बंगाली लघुकथा गोलपो बोलिये तारिणी खुरो ही रे यांनी लिहिलेल्या कथांच्या मालिकेपैकी एक आहे, जी तारिणी खुरो यांनी तयार केलेल्या रहस्यमय पात्रावर आधारित आहे.

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘द स्टोरीटेलर’ ची निर्मिती जिओ स्टुडिओने पर्पज एंटरटेनमेंट आणि क्वेस्ट फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे.

Related posts

सणासुदीच्या काळात भारतातच पर्यटनाचा आनंद घेण्‍याची भारतीयांची इच्‍छा: कायक

Shivani Shetty

आशा स्‍कूल्‍सच्‍या विकासाकरिता रेलिगेअर एंटरप्राइजेसचा पुढाकार

Shivani Shetty

कौशल्यवाढीसाठी मोंडेलेझ इंडियाचाएनएसडीसीसोबत करार

Shivani Shetty

Leave a Comment