maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतात मेटा एआयचे आगमन: आघाडीचे एआय असिस्‍टण्‍ट आता तुमच्‍यासाठी उपलब्‍ध

मेटा लामा ३ (Meta Llama 3) सह डिझाइन करण्‍यात आलेले मेटा एआय जगातील आघाडीचे एआय असिस्‍टण्‍ट आहे, जे आधीपासून फोनमध्‍ये असण्‍यासोबत बाराहून अधिक देशांमध्‍ये मोफतपणे उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे तुमच्‍या खिशाला परवडणारे आहे. मेटा एआय भारतात इंग्रजी भाषेमध्‍ये लाँच होण्‍यास सुरूवात झाली आहे. तुम्‍ही टास्‍क्स पूर्ण करण्‍यासाठी, कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यासाठी आणि तुमच्‍यासाठी महत्त्वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टींसोबत कनेक्‍ट होण्‍यासाठी व्‍हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर व इन्‍स्‍टाग्रामवर मेटा एआयचा वापर करू शकता. आम्‍ही गेल्‍या वर्षी कनेक्‍टमध्‍ये (Connect) मेटा एआय (Meta AI)ची घोषणा केली आणि एप्रिलपासून आम्‍ही जगभरातील व्‍यक्‍तींसाठी लामा ३ सह डिझाइन केलेले मेटा एआयचे आधुनिक व्‍हर्जन सादर करत आहोत.
मेटा लामा ३ (Meta Llama 3) मुळे मेटा एआय पूर्वीपेक्षा अधिक स्‍मार्ट, अधिक जलद व अधिक मजेदार आहे.
मेटा एआयचा तुमच्‍या टास्‍क्‍ससाठी उपयोग करा
मित्रांसोबत नाइट आऊटला जाण्‍याची योजना आखत आहात? तुमच्‍यासाठी व तुमच्‍या मित्रांसाठी उत्तम व्‍ह्यूज व शाकाहारी पर्याय असलेल्‍या रेस्‍टॉरंट्सची शिफारस करण्‍याकरिता व्‍हॉट्सअॅप ग्रुप चॅटमधील मेटा आयला विचारा. वीकेण्‍ड गेटवेचे आयोजन करत आहात. रोड ट्रिपवर आनंद घेता येईल अशा स्‍थळांबाबत मेटा एआयला विचारा. परीक्षेसाठी तयारी करत आहात? तुमच्‍याकरिता बहुपर्यायी चाचणी तयार करण्‍यासाठी वेबवरील मेटा एआयला विचारा. तुमच्‍या नवीन सदनिकेमध्‍ये गृहप्रवेश करत आहात? तुम्‍हाला पाहिजे असलेल्‍या सजावटीबाबत ‘कल्‍पना करण्‍यास’ मेटा एआयला विचारा, ज्‍यामुळे तुम्‍ही फर्निचर खरेदीसंदर्भात एआय-निर्मित इमेजेस् तयार करू शकता.
फीडमध्‍ये मेटा एआय
तुम्‍ही फेसबुक फीडच्‍या माध्‍यमातून स्‍क्रॉलिंग करत असताना देखील मेटा एआयचा आनंद घेऊ शकता. तुम्‍हाला आवडणारी पोस्‍ट पाहायची आहे का? पोस्‍टमधील अधिक इन्‍फोसाठी (माहितीसाठी) मेटा एआयला विचारू शकता. तुम्‍ही उत्तरेकडील आइसलँडमधील लख्‍ख प्रकाशित दिव्‍यांचा फोटो पाहिला तर अरोरा बोरेलिस पाहण्‍यासाठी वर्षातील कोणती वेळ सर्वोत्तम आहे हे मेटा एआयला विचारू शकता.
मेटा एआयच्‍या इमॅजिन वैशिष्‍ट्यासह तुमच्‍या सर्जनशीलतेला अधिक निपुण करा
प्रत्‍यक्ष मेटा एआयसोबत किंवा ग्रुप चॅटमध्‍ये संवाद साधताना इमॅजिन शब्‍दाचा वापर करत तुम्‍ही इमेजेस् तयार करण्‍यासोबत शेअर करू शकता. इमॅजिन आमची टेक्‍स्‍ट-टू-इमेज जनरेशन क्षमता आहे, जी तुमच्‍या सर्जनशीलतेला अधिक निपुण करेल. तुम्‍ही तुमच्‍या मुलाच्‍या बर्थडे पार्टीसाठी सानुकूल मजेशीर आमंत्रण तयार करू शकता किंवा मित्रांसोबत मजेशीर इमेजेस् तयार करू शकता. आणि हा आनंद फक्‍त येथेच थांबत नाही. तुम्‍हाला आवडणारी इमेज शोधायची आहे का? त्‍या इमेजमध्‍ये अॅनिमेशन तयार करण्‍यासाठी मेटा एआयला विचारा किंवा मेटा एआयला प्रॉम्‍प्‍ट बदलण्‍यास सांगत मित्रांसोबत इमेजला नवीन रूप द्या.
आमच्‍या सर्वात प्रबळ लँग्‍वेज मॉडेलसह मेटा एआय अधिक सर्वोत्तम आहे. आम्‍हाला अधिकाधिक व्‍यक्‍तींना आमचे नेक्‍स्‍ट-जनरेशन असिस्‍टण्‍ट शेअर करण्‍याचा आनंद होत आहे आणि ते व्‍यक्‍तींचे जीवन कशाप्रकारे अधि‍क उत्‍साहित करेल हे पाहण्‍यास अत्यंत उत्सुक आहे.

Related posts

क्विक हील दोन प्रतिष्ठित पुरस्‍कारांसह सन्‍मानित

Shivani Shetty

नवीन घरांच्‍या विक्रीत २०२३ मध्ये ३३ टक्‍क्‍यांची वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम

Shivani Shetty

वारी एनर्जी लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केला

Shivani Shetty

Leave a Comment