maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या १७व्‍या नॅशनल बालपरिषदेने वंचित विद्यार्थ्‍यांना भारतातील झोपडपट्ट्यांमधील गंभीर समस्यांबद्दल बोलण्यासाठी दिले व्‍यासपीठ

मुबई, ६ फेब्रुवारी २०२३: सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या (एसबीएफ) १७व्या नॅशनल बालपरिषदेने भारतातील शहरी झोपडपट्ट्यांमधील किशोरवयीन मुलांनी वाढवलेले प्रतिबंधात्मक आरोग्य उपाय तंबाखूचा वापर, पोषण आणि मानसिक आरोग्य यावर प्रकाश टाकला. एसबीएफच्‍या प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य उपक्रमाचा भाग असलेल्‍या ३८० हून अधिक सरकारी व सरकारी अनुदानित शालेय विद्यार्थ्‍यांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि त्यांच्या शाळा व समुदायांबद्दलच्या त्यांच्या समस्या संबंधित भागधारकांपर्यंत मांडल्या, तसेच ऑन-ग्राऊंड उपाय सुचवले.

बालपरिषदेची संकल्पना सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रमांतर्गत करण्यात आली होती, जी २००२ मध्ये विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर ठेवण्यासाठी एक उपक्रम म्हणून सुरू झाली. तेव्हापासून फाऊंडेशनने आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रत्येक पैलूचा समावेश केला आहे: तंबाखूच्या वापरास प्रतिकार, पोषणाबद्दल जागरूकता आणि त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे. बालपरिषदेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रमाने हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संबंधित धोरणकर्ते आणि भागधारकांसोबत काम करण्यास सक्षम केले आहे. हे नेतृत्व आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक पोर्टल उघडण्यासाठी आरोग्‍यदायी पद्धतींबाबत जागरूकतेच्‍या पलीकडे आहे.

खाजगी शाळांमधील मॉडेल युनायटेड नेशन्‍स (एमयूएन) सारखी असलेल्‍या या बालपरिषदेला अनेक मान्‍यवर उपस्थित होते, जसे डॉ. कृष्णा मेठेकर (उपसंचालक, एफएसएसएआय, भारत सरकार), श्रीम. रंजना राव (शिक्षण अधिकारी, प्रादेशिक उप संचालक कार्यालय मुंबई), आणि डॉ.ओमप्रकाश वालेपवार,सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारताच्‍या विविध भागांमधून सरकारी व सरकारी अनुदानित शालेय विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला. बालपरिषदेमधील चेंज एजंट्स म्‍हणून व्‍यासपीठाने विद्यार्थ्‍यांना प्रशासकीय भागधारक व धोरणकर्त्‍यांसोबत परस्‍पर संवाद साधण्‍याची सुविधा दिली. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील व्‍यासपीठाने आपल्‍या समुदायांच्‍या उज्‍ज्‍वलतेप्रती लक्षणीय योगदान दिलेले तरूण चेंज-मेकर्स/ हेल्‍थ मॉनिटर्सना प्रशंसित केले. हेल्थ मॉनिटर्सनी एसबीएफच्या बहुविध सामुदायिक आउटरीच हस्तक्षेपांमधून मिळालेल्या माहितीचा व जागरूकतेचा पुरेपूर फायदा घेतला आणि तंबाखूमुक्त शाळा धोरण, तंबाखूमुक्त सार्वजनिक जागा, सीओटीपीए, पोषण, शहरामध्‍ये हरित जागांची कमतरता, मानसिक आरोग्‍य यासंबंधी काही महत्त्वपूर्ण प्रश्न निदर्शनास आणून दिले.

याप्रंसगी बोलताना सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या प्रोजेक्‍ट्सच्या (प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य व संशोधन) उपाध्‍यक्ष त्‍शेरिंग डी. भुतिया म्‍हणाले, ‘‘बालपरिषद हे आपल्या भावी तरुण चेंज लीडर्ससाठी त्यांच्या समस्या आणि विचार सत्तेत असलेल्यांपर्यंत पोहोचवण्याचे अनोखे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ लहान मुलांनी भारतातील शहरी झोपडपट्ट्यांमधील मुलांसाठी तयार केले आहे. हा उपक्रम संबंधित अधिकाऱ्यांशी विचारशील चर्चा करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा, पोषण व व्यसनाचे घातक परिणाम यांसारख्या प्राथमिक समस्यांबद्दल त्यांचे मत मांडण्यास मदत करतो. या उपक्रमाद्वारे, आमचे विद्यार्थी स्थिर प्रभाव निर्माण करण्यात मदत करू शकतात, जे आता त्यांच्या समुदायांमध्ये माहिती आणि जागरूकता पसरविण्यास सक्षम आहेत. याव्यतिरिक्त, विविध स्तरांवर धोरणकर्ते व संबंधित भागधारकांसोबतचा संवाद त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि प्रत्येक टप्‍प्‍यावर त्यांचा आवाज ऐकण्यास सक्षम बनविण्यामध्‍ये मदत करतो.’’

आपला अनुभव सांगत मुंबईतील काळाकिल्‍ला महापालिका शाळेमधील इयत्ता ८वी ची विद्यार्थीनी काजल प्रजापती म्‍हणाली, ‘‘मी तीन वर्षांपासून सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या बालपरिषदेचा भाग आहे आणि दरवर्षी मी तितकीच उत्साही असते. वर्षभरात आपल्याला भेडसावणाऱ्या व संकलित केलेल्या विविध समस्या लक्षात आणून देण्‍याकरिता आणि बदल घडवून आणण्यात मदत करू शकतील अशा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्‍याकरिता हे आमच्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आमचे प्रयत्न जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे.’’

Related posts

कल्याणने सहा ‘व्हॅलेन्टाईन्स-डे’ स्पेशल दागिने प्रस्तुत केले

Shivani Shetty

गोदावरी मराठी क्रेडीट लिस्ट

Shivani Shetty

संपूर्ण जग पाहण्यासाठी भारतीय दैनंदिन खर्चात कपात करण्यास तयार: कायक

Shivani Shetty

Leave a Comment