नवी दिल्ली, 28 सप्टेंबर २०२३: लिम्का स्पोर्टझ या कोका-कोला इंडियाच्या स्वदेशी ब्रॅण्ड लिम्काच्या स्पोर्टसड्रिंकला भारतात नवीन व्हेरिएण्ट लिम्का स्पोर्टझ आयन४ च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. नाविन्यपूर्ण आयन४ तंत्रज्ञानासह वैज्ञानिकदृष्ट्या निर्माण करण्यात आलेले हे स्पोर्टस्ड्रिंक अॅथलीट्स व फिटनेस उत्साहींच्या हायड्रेशन व ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हे हायड्रेशन ड्रिंक चवीची पूर्तता करण्यासह व्यक्तींना ‘नेव्हर गिव्ह अप – #RukkMatt’ वृत्तीसह त्यांच्या मर्यादांना दूर करण्यासाठी प्रेरित करण्यामध्ये उत्प्रेरक देखील आहे.
लिम्का स्पोर्टझ आयन४ हे स्पोर्टस्ड्रिंक आहे, जे लो-शुगर रिहायड्रेशन देते. या स्पोर्टस्ड्रिंकमध्ये ग्लुकोज, आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम) आणि बी-व्हिटॅमिन्स आहेत, ज्यामधून सुलभ रिहायड्रेशन आणि शारीरिक व्यायामादरम्यान दीर्घकाळापर्यंत ऊर्जा मिळते. स्पेशालिट्सच्या टीमने निर्माण केलेले लिम्का स्पोर्टझ आयन४ प्रगत स्पोर्टसहायड्रेशनचे प्रतीक आहे. हे स्पोर्टसड्रिंक रिहायड्रेशन, रिव्हायटलायझेशन आणि न्यूट्रिएण्ट रिप्लेनिशमेंट या तीन महत्त्वपूर्ण पैलूंची पूर्तता करत स्पोर्टसमधील परफॉर्मन्स वाढवते.
अधिक उत्साहाची बाब म्हणजे लिम्का स्पोर्टझला प्रतिष्ठित आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ साठी ऑफिशियल स्पोर्टसड्रिंक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आपल्या भारतीय क्रिकेट संघावर लक्ष ठेवा, जेथे ते लिम्का स्पोर्टझ आयन४ सह हायड्रेटेड राहतात. या अल्टिमेट स्पोर्टसड्रिंकच्या उत्साही निळ्या रंगाला विसरू नका, जे ‘मेन इन ब्ल्यू’ला साजेसे आहे.
लिम्का स्पोर्टझच्या लाँचची घोषणा करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाचे मार्केटिंग, हायड्रेशन, कॉफी अॅण्ड टी कॅटेगरीचे संचालक कार्तिक सुब्रमणियन म्हणाले, ”लिम्का स्पोर्टझ आयन४ ग्राहकांना सर्वसमावेशक हायड्रेशन प्रदान करण्याप्रती लिम्का स्पोर्टझच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते. वैज्ञानिकदृष्ट्या निर्माण करण्यात आलेले हे स्पोर्टसड्रिंक ग्राहकांना अधिक ऊर्जा देते. आम्हाला उत्तम चव व कार्यक्षम फायदे असलेल्या आमच्या रिहायड्रेशन ड्रिंकसह अॅथलीट्स व स्पोर्टसप्रेमींना साह्य करण्याचा आनंद होत आहे.”
लिम्का स्पोर्टझ आयन४ देशभरातील आघाडीचे सुपरमार्केट्स, कन्वीनियन्स स्टोअर्स आणि ऑनलाइन व्यासपीठांवर उपलब्ध आहे.