maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भांडुप पश्चिमेकडील ३ एकर जमीन आर्केड डेव्हलपर्स लि.ने कॉपर रोलर्स प्रा.लि.कडून १०३.८८ कोटींना विकत घेतली

सप्टेंबर २७, २०२३ : आर्केड डेव्हलपर्स लि.ने (पूर्वी आर्केड डेव्हलपर्स प्रा.लि. या नावाने ओळखले जात होते) पूर्व उपनगरातील भांडुपच्या पश्चिमेकडील जवळपास तीन एकर जमिनीचे संपादन पूर्ण केले आहे. व्यावसायिक वापरासाठीची ही जागा कॉपर रोलर्स प्रा.लि. यांच्याकडून घेण्यात आली आहे.

२६ सप्टेंबर २०२३ रोजी विक्रोळी येथे केलेल्या कन्व्हेयन्स डीडच्या नोंदणीशी संबंधित दस्तऐवजाचा आम्ही अभ्यास केला आहे. हा व्यवहार संमिश्र असून १०३.८८ कोटींचा आहे. ९८ कोटी अधिक मुद्रांक शुल्क रु. ५.८८ कोटी असा हा व्यवहार आहे. कन्व्हेयन्स डीडनुसार या जमिनीचा ताबा आर्केडकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आणि त्याचा संपूर्ण मोबदला विक्रेत्याला मिळाला आहे.

आर्केड यांनी यंदाच फेब्रुवारी महिन्यात मुलुंड पश्चिमेला जमीन खरेदी केली होती. या भूसंपादनाव्यतिरिक्त, पुनर्विकास प्रकल्पांसाठी चार सोसायट्यांकडून आरकडे यांना इरादा पत्र पाठवण्यात आले आहे. एवढेच नवे तर मुंबई महानगर प्राधिकरणातील प्रकल्पांसाठी विकासक म्हणून त्यांना सर्वाधिक पसंती आहे.

सध्या आर्केड डेव्हलपर्स १.८ दशलक्ष चौ.फूट एरिया असलेल्या ५ प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. यातील ४ प्रोजेक्ट हे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.  तर उर्वरित १ प्रकल्प ३० जून २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासोबतच विलेपार्ले पूर्व आणि मालाड पश्चिम येथे ०.४ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर आर्केड २ प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे.

आर्केड डेव्हलपर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री अमित जैन यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. “आम्ही एमएमआरच्या पूर्वेकडे दोन आणि तीन बीएचके असणारा एक प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. एमएमआरच्या पूर्वेकडे आपले काही प्रोजेक्ट्स असावेत, या आमच्या धोरणाच्या अनुषंगाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे आर्केडने या महिन्याच्या सुरुवातीला इक्विटी शेअर्समधून ४३० कोटी उभे करण्यासाठी सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा ड्राफ्ट दिला आहे.

Related posts

फिजिक्‍सवालाने युजीसी नेट २०२४ साठी ‘मिशन जेआरएफ’ सिरीज लाँच केली

Shivani Shetty

डॉ. बत्रा’जने न्‍यूट्रिगुड गम्‍मीज लाँच केले

Shivani Shetty

माझा नवीन मॅजिक मँगो लस्‍सीसह देत आहे अनोख्या स्‍वादाचा अनुभव; अनन्‍या पांडे टीव्‍हीसीमध्ये झळकणार

Shivani Shetty

Leave a Comment