maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नवीन घरांच्‍या विक्रीत २०२३ मध्ये ३३ टक्‍क्‍यांची वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम

मुंबई, ७ जानेवारी २०२४: देशातील आघाडीची ऑनलाइन रिअल इस्‍टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमच्‍या नवीन अहवालानुसार भारतातील निवासी रिअल इस्‍टेट विक्री २०१३ मध्‍ये सर्वोच्‍च होती, ज्‍यामध्‍ये कॅलेंडर वर्ष २०२३ दरम्‍यान वार्षिक ३३ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे आणि एकूण ४.१० लाख सदनिकांची विक्री झाली आहे.

आघाडीचा प्रॉपटेक प्‍लॅटफॉर्म हाऊसिंग डॉटकॉमची मालक असलेली आरईए इंडियाचा भाग असलेल्‍या प्रॉपटायगर डॉटकॉमचा अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – अॅन्‍युअल राऊंड-अप २०२३ (जानेवारी – डिसेंबर) नुसार, भारताने कॅलेंडर वर्ष २०२३ मध्‍ये मागणी व नवीन पुरवठ्यामध्‍ये दोन-अंकी वाढीची नोंद केली, तसेच नवीन पुरवठा आतापर्यंतचा सर्वोच्‍च आहे आणि विक्रीमधील वाढ कायम राहिली आहे. 

२०२३ मध्‍ये एकूण ५,१७,०७१ सदनिका लाँच करण्‍यात आल्‍या, ज्‍यामध्‍ये २०२२ मधील ४,३१,५१० सदनिकांच्‍या तुलनेत वार्षिक २० टक्‍क्‍यांची वाढ झाली. २०२३ मध्‍ये नवीन पुरवठ्याच्‍या संदर्भात मुंबई, पुणे व हैदराबाद अग्रस्‍थानी राहिले आहेत, जेथे २०२३ मध्‍ये एकूण नवीन लाँचमध्‍ये त्‍यांचा एकत्रित हिस्‍सा ७० टक्‍के होता.

स्थिर व्‍याजदरांमुळे घरांच्‍या विक्रीमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे विकासकांमधील आत्‍मविश्‍वास वाढेल, तसेच ते सणासुदीच्‍या काळाव्‍यतिरिक्‍त नववर्षात अधिक आकर्षक ऑफरिंग्‍ज सादर करू शकतील. आपण २०२४ मधील विकासाच्‍या नवीन टप्‍प्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना या स्थिरतेने रिअल इस्‍टेट क्षेत्रासाठी सकारात्‍मक स्थिती निर्माण केली आहे.

या आकडेवारीमध्‍ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्‍नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्‍ली-एनसीआर (गुरूग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद व फरिदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई व ठाणे) आणि पुणे या अव्‍वल आठ शहरांसाठी कॅलेंडर वर्षामधील चारही तिमाहींकरिता विक्री आकडेवारींचा समावेश आहे.

हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वाधवान म्‍हणाले “वाढते व्‍याजदर, वाढता इनपुट खर्च आणि जगभरातील अनिश्चिततेदरम्‍यान घरांच्‍या वाढत्‍या किमती अशी सुरूवातीची आव्‍हाने असताना देखील क्षेत्राने अपवादात्‍मक स्थिरता दाखवली. महामारीनंतर मागणीमध्‍ये झालेली वाढ प्रमुख स्रोत ठरली, ज्‍यामुळे मालमत्ता बाजारपेठेत अनपेक्षित वाढ झाली. भारतीय रिझर्व्‍ह बँकेने एप्रिल २०२३ मध्‍ये दरवाढ थांबवण्‍याच्‍या घेतलेल्‍या निर्णयाने ग्राहकांचा गृहखरेदीप्रती आत्‍मविश्‍वास वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली.”

श्री. वाधवान पुढे म्‍हणाले, ”ग्राहक भावनेमध्‍ये सकारात्‍मक वाढ मध्‍यम-प्रिमिअम व प्रिमिअम सदनिकांसाठी प्रबळ मागणीला चालना देत आहे. दिल्‍ली व बेंगळुरूमध्‍ये नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या प्रिमिअम लाँचमधून क्षेत्राची स्थिरता दिसून येते. पण, घरांच्‍या वाढत्‍या किमतींमुळे किफायतशीर विभागाला आव्‍हानांचा सामना करावा लागू शकतो. ही स्थिती पाहता नववर्षातील यश विद्यमान गतीचा फायदा घेण्‍यावर, तसेच बाजारपेठेतील स्थितीशी जुळून जाण्‍यावर अवलंबून आहे.”

२०२३ मध्‍ये मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्‍ये अधिक मागणी दिसण्‍यात आली:

२०२३ साठी डेटा व इनसाइट्समधून निदर्शनास येते की, वर्षातील चारही तिमाहींमध्‍ये मागणीत क्रमिक व वार्षिक वाढ झाली आहे. पश्चिम व दक्षिण बाजारपेठा मुंबई, पुणे व हैदराबादमध्‍ये अधिकतम मागणी दिसण्‍यात आली, ज्‍यांचा २०२३ मध्‍ये एकूण विक्रीत एकत्रित हिस्‍सा ६७ टक्‍के होता. हैदराबादनंतर अहमदाबादमध्‍ये ५१ टक्‍क्‍यांची सर्वोच्‍च वाढ दिसण्‍यात आली आणि २०२३ मध्‍ये इतर अव्‍वल शहरांच्‍या तुलनेत विक्रीत वार्षिक ४८ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली.

२०२३ मध्‍ये निवासी मागणीमध्‍ये वाढ झाली आणि २०१३ मध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या वाढीनंतर सर्वोच्‍च होती. १ ते ३ कोटी रूपये किंमत असलेल्‍या सदनिकांचा एकूण मागणीमध्‍ये २४ टक्‍क्‍यांचा सर्वोच्‍च हिस्‍सा होता. या किंमत श्रेणीचा हिस्‍सा २०१९ मध्‍ये महामारीपूर्वीच्‍या तिमाहीमधील १५ ते १७ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मालमत्तेच्‍या किमती आणि व्‍याजदरांमधील वाढीचा गृहखरेदीदरांच्‍या सकारात्‍मक भावनेवर परिणाम होण्‍यासह हा परिणाम अल्‍पकाळासाठी राहण्‍याची अपेक्षा असल्‍यामुळे एकूण ग्राहक दृष्टीकोन सकारात्‍मक आहे.

घरांच्‍या विक्रीचा वार्षिक तक्‍ता: 

विक्री – २०२३      
शहर २०२२ २०२३ वार्षिक
अहमदाबाद २७,३१४ ४१,३२७ ५१ टक्‍के
बेंगळुरू ३०,४६७ ४४,००२ ४४ टक्‍के
चेन्‍नई १४,०९७ १४,८३६ ५ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर १९,२४० २१,३६४ ११ टक्‍के
हैदराबाद ३५,३७२ ५२,५७१ ४९ टक्‍के
कोलकाता १०,७४६ १२,५१५ १६ टक्‍के
मुंबई १०९,६७७ १४१,४८० २९ टक्‍के
पुणे ६२,०२९ ८२,६९६ ३३ टक्‍के
भारत ३०८,९४२ ४१०,७९१ ३३ टक्‍के

गृहखरेदीदारांच्‍या भावनेमुळे नवीन लाँचला चालना

गृहखरेदीदारांच्‍या भावनेमुळे देखील नवीन लाँचला चालना मिळत आहे. या वर्षात मालमत्ता लाँचमध्‍ये उल्‍लेखनीय वाढ दिसण्‍यात आली आहे, ज्‍यामधून मोठी मागणी आणि अर्थव्‍यवस्‍था प्रबळ करण्‍याबाबत ग्राहकांचा वाढता आत्‍मविश्‍वास दिसून येतो. सादर करण्‍यात आलेल्‍या बहुतांश सदनिकांची किंमत १ ते ३ कोटी रूपयांपर्यंत आहे, ज्‍यामध्‍ये अव्‍वल आठ शहरांमधील ३१ टक्‍के एकूण पुरवठ्याचा समावेश आहे.

 २०२३ मध्‍ये एकूण ५१७,०७१ सदनिका लाँच करण्‍यात आल्‍या, ज्‍यामध्‍ये वार्षिक २० टक्‍क्‍यांची वाढ झाली. नवीन लाँचची आकडेवारी सतत एक लाखांच्‍या वर राहिली आहे, जेथे नवीन लाँचसंदर्भात मागील वर्ष सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. 

नवीन घर लाँचचा वार्षिक तक्‍ता 

नवीन पुरवठा – २०२३      
शहर २०२२ २०२३ वार्षिक
अहमदाबाद ३२,६६३ ५५,८७७ ७१ टक्‍के
बेंगळुरू ४२,२१५ ४७,९६५ १४ टक्‍के
चेन्‍नई ,३१० १६,१५३ ७४ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर १५,३८२ २०,५७२ ३४ टक्‍के
हैदराबाद ८२,८०१ ७६,८१९ ७ टक्‍के
कोलकाता ,१९६ १५,३०३ ८७ टक्‍के
मुंबई १६५,६३४ १७८,६८४ ८ टक्‍के
पुणे ७५,३०९ १०५,६९८ ४० टक्‍के
भारत ४३१,५१० ५१७,०७१ २० टक्‍के

हाऊसिंगडॉटकॉम, प्रोपटायगरडॉटकॉम व मकानडॉटकॉमच्‍या संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्‍हणाल्‍या, ”भारतातील निवासी रिअॅल्‍टी उत्तम टप्‍प्‍यामध्‍ये आहे, जेथे २०१० मधील बिकट स्थितीला झुगारत मागणी व पुरवठ्यामध्‍ये वाढ होत आहे. प्रबळ आर्थिक पार्श्‍वभूमी, वाढते डिस्‍पोजेबल उत्‍पन्‍न आणि मालमत्तेमध्‍ये गुंतवणूक करण्‍याची उच्‍च भावना यामुळे विक्रीत वार्षिक ३३ टक्‍क्‍यांची वाढ होण्‍यासह नवीन पुरवठ्यामध्‍ये २० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. देशातील विकासक या स्थितीचा फायदा घेत योग्‍य उत्‍पादन लाँच करत आहेत आणि २०२४ साठी प्रबळ प्रोजेक्‍ट पाइपलाइन तयार करत आहेत. सेवा क्षेत्राचे प्रभुत्‍व असलेल्‍या शहरांमध्‍ये मागणी सर्वोच्‍च दिसण्‍यात आली, जेथे मालमत्ता किमतींमध्‍ये वार्षिक १५ ते २० टक्‍क्‍यांची वाढ निदर्शनास आली, जी देशातील सरासरीच्‍या तुलनेत दुप्‍पट आहे.”

श्रीमती सूद २०२४ साठी त्‍यांच्‍या दृष्टीकोनाबाबत सांगताना म्‍हणाल्‍या, ”२०२४ मध्‍ये भूराजकीय जोखीम कायम आहेत, पण असे असताना देखील ग्राहकांच्‍या वाढत्‍या उत्‍साहामधून मेट्रो व द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मालमत्ता बाजारपेठेत सातत्‍यता राहण्‍याचे दिसून येते.” 

Related posts

इझमायट्रिपचा विंटर कार्निवल सेल सुरु

Shivani Shetty

स्पिनी मोटरस्पोर्टसह आयआयटी-मुंबई येथे ड्रायव्हिंगचा मूड

Shivani Shetty

आझाद इंजिनियरिंग लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Shivani Shetty

Leave a Comment