नवी मुंबई, १७ ऑक्टोबर २०२४: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये क्रेनियोसायनोस्टोसिससाठी एन्डोस्कोपिक सर्जरी यशस्वीपणे केली गेली. ही एक अतिशय दुर्मिळ स्थिती आहे, यामध्ये बाळाच्या डोक्याची हाडे वेळेआधीच जुळतात. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील कन्सल्टन्ट न्यूरोसर्जरी डॉ सुमीत पवार यांनी ३ महिन्यांच्या बाळावर ही क्रांतिकारी प्रक्रिया केली. २००० पैकी फक्त १ बाळामध्ये ही दुर्मिळ स्थिती आढळून येते, यामुळे डोक्याच्या विकासामध्ये बाधा येतात. ही स्थिती वेळीच लक्षात येणे आवश्यक असते कारण वेळेवर उपचार केल्यास नंतरच्या काळात मोठ्या सर्जरीची आवश्यकता रोखली जाऊ शकते.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये एका बाळाला आणले गेले, त्याचा चेहरा, खासकरून भुवया प्रमाणबद्ध नव्हत्या असे पालकांना दिसून आले होते. तपासणीमध्ये आढळून आले की, त्या बाळाला क्रेनियोसायनोस्टोसिस हा दुर्मिळ जन्मजात आजार होता, ज्यामध्ये बाळाच्या डोक्याची हाडे खूप आधी जोडली जातात, त्यामुळे बाळाच्या सामान्य वाढीवर मर्यादा येतात आणि डोक्याचा आकार असामान्य होऊन जातो. यावर उपचार केले गेले नाहीत तर विकसनशील डोक्यावरील दबाव वाढू शकतो, वाढीमध्ये विलंब आणि न्यूरोलॉजिकल समस्या होऊ शकतात. वेळेवर सर्जरी केल्यास, डोक्याचा आकार ठीक करता येतो, डोक्यावरील दबाव कमी केला जाऊ शकतो आणि बाळाचा विकास सामान्य पद्धतीने होऊ शकतो.
डॉ सुमीत पवार, कन्सल्टन्ट न्यूरोसर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”लवकरात लवकर, खासकरून जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्ये निदान होणे गरजेचे आहे. ३ ते ६ महिन्यांच्या बाळाच्या बाबतीत फक्त २.५ सेमीची चीर देऊन एन्डोस्कोपिक पद्धतीने ही प्रक्रिया करता येते. निदान करण्यात उशीर झाला आणि बाळ ६ ते ९ महिन्यांचे झालेले असेल तर ओपन स्कल सर्जरी करावी लागते, यामध्ये २० सेमीची मोठी चीर द्यावी लागते. इतक्या कमी वयामध्ये ही सर्जरी गंभीर, धोकादायक असते. ओपन स्कल सर्जरीची आवश्यकता रोखणे, त्यासाठी ऑपरेशन लवकरात लवकर करणे आणि बाळामध्ये अधिक सुरक्षित व कमी इन्व्हेसिव्ह सुधारणा सुनिश्चित करणे हा आमचा उद्देश आहे. ही सर्जरी यशस्वी झाली याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्हाला आशा वाटते की, हे यश या भागामध्ये अशाप्रकारची स्थिती असलेल्या बाळांवरील उपचारांचा मार्ग खुला करेल. या प्रक्रियेमध्ये रक्तस्त्राव कमीत कमी झाला आणि बाळाला फक्त एक रात्र आयसीयूमध्ये ठेवावे लागले.”
सर्जरीनंतर बाळाला एक कस्टम थ्रीडी प्रिंटेड हेल्मेट घातले गेले. हे हेल्मेट पुढील दोन वर्षांमध्ये डोक्याच्या विकासाला निश्चित दिशा देण्यासाठी आणि आकार सुव्यवस्थित करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. नियमित फॉलो-अप व्हिजिटदरम्यान याची काळजी घेतली जाईल की हेल्मेट डोक्याच्या सामान्य विकासासाठी योग्य प्रकारे अड्जस्ट करण्यात आले आहे.
श्री मृगेंद्र प्रताप, भोपाळहून नवी मुंबईमध्ये आणण्यात आलेल्या बाळाचे वडील म्हणाले,”आम्हाला आमच्या बाळाचा चेहरा असामान्य असल्याचे आढळून आले आणि त्यावर योग्य, तज्ञ उपचारांचा शोध घेणे आम्ही लगेचच सुरु केले. डॉ सुमीत याच्यासोबत चर्चा केली तेव्हा आम्हाला क्रेनियोसायनोस्टोसिसबद्दल समजले. आम्हाला उपचारांमध्ये उशीर करून धोका पत्करायचा नव्हता, कारण त्यामुळे आमच्या बाळाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असता. एन्डोस्कोपिक स्कल सर्जरीचा निर्णय योग्य ठरला, आणि त्यानंतर आमच्या बाळाची जी उल्लेखनीय रिकव्हरी झाली ती पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. आमच्या बाळाला नवजीवन प्रदान केल्याबद्दल आम्ही डॉ सुमीत आणि अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे आभारी आहोत.”