maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपने स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी लाँच केली

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम हे भारतातील सर्वात मोठे ट्रॅव्‍हल टेक व्‍यासपीठ उल्‍लेखनीय इनोव्‍हेशन – इझमायट्रिप स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजीसह ट्रॅव्‍हल बुकिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे. या नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यामधून कंपनीची प्रत्‍येक भारतीय प्रवाशाला गतीशील व विनासायास प्रवास अनुभव देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. प्रगत एआय व एमएल तंत्रज्ञानाचा अवलंब करत इझमायट्रिपने वॉईस असिस्‍टण्‍स टूल सादर केले आहे, जे प्रवाशांच्‍या प्रवासाचे नियोजन व बुकिंग करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याची खात्री देते.

आजच्‍या प्रवाशांच्‍या सर्वसमावेशक पसंती व अपेक्षा लक्षात घेत इझमायट्रिपने ही अत्‍याधुनिक स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन सिस्‍टम विकसित केली आहे. यामध्‍ये टचलेस रिकमण्‍डेशन व बुकिंग इंजिन आहे, जे ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या इन-हाऊस विकसित करण्‍यात आलेल्‍या सिस्‍टममध्‍ये सानुकूल नॅच्‍युरल लँग्‍वेज प्रोसेसिंग (एनएलपी) इंजिन आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक परस्‍परसंवादादरम्‍यान अचूकता व कार्यक्षमतेची खात्री मिळते.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी म्‍हणाले, “आजच्‍या गतीशील ट्रॅव्‍हल इकोसिस्‍टममध्‍ये प्रत्‍येक पर्यटक गतीशील व एकसंधी बुकिंग अनुभवाचा शोध घेतो. बुकिंगसाठी कमी वेळ व अधिक महत्त्वाकांक्षेसह प्रवासी प्रवासाचे नियोजन करताना अधिक सोयीसुविधांची अपेक्षा करतात. आमची स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी त्‍यांच्‍यासाठी मार्गदर्शक आहे, जी त्‍यांच्‍या सर्व प्रवास गरजांसंदर्भात मार्गदर्शन करते. आम्‍हाला हे इनोव्‍हेशन सादर करण्‍याचा आनंद होत आहे, जे प्रत्‍येक भारतीयाचा प्रवास सुलभ करण्‍याच्‍या आमच्‍या मिशनशी संलग्‍न आहे.”

सुलभ संवादाप्रमाणे इझमायट्रिप स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी तुमच्‍या सर्व प्रवास गरजांसाठी सर्वसमावेशक सोल्‍यूशन देते. प्रवासी सोप्‍या भाषेत त्‍यांच्‍या गरजा व्‍यक्‍त करू शकतात, जसे “मला उद्यासाठी दिल्ली ते मुंबई फ्लाइट शोधायची आहे, ‘मला उद्या दिल्लीत स्‍टेसाठी हॉटेल पाहिजे’ किंवा ‘मला पुढच्या आठवड्यात दुबईसाठी हॉलिडे पॅकेज पाहिजे’ हे अत्‍याधुनिक इंजिन फ्लाइट्स, निवास, वेकेशन पॅकेजेस्, ट्रेन व बस सुलभ बुकिंग प्रक्रियेसाठी उत्‍पादन शिफारशी देते.

या इनोव्‍हेशनचे महत्त्वपूर्ण वैशिष्‍ट्य म्‍हणजे हिंदीसह विविध भारतीय भाषांमधील संवाद समजण्‍याची आणि त्‍यांना प्रतिक्रिया देण्‍याची क्षमता. मेड इन इंडिया ब्रॅण्‍ड इझमायट्रिपला विविध भारतीय भाषा व संपन्‍न संस्‍कृतीचे महत्त्व माहित आहे. ही वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी व्‍यासपीठाची सर्व भारतीय प्रवाशांना सर्वसमावेशक सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करते.

Related posts

मेटाकडून GenAI च्‍या माध्‍यमातून भारतातील ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेमध्‍ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी एनएलएसआययू – आयआयटी बॉम्‍बे रिसर्च प्रोजेक्‍टला मदतीचा हात

Shivani Shetty

मधुमेह असताना आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना

Shivani Shetty

व्हिएतजेट अॅडलेड आणि पर्थला व्हायब्रंट हो ची मिन्ह सिटीशी जोडते, प्रवाशांसाठी रोमांचक संधी उघडते

Shivani Shetty

Leave a Comment