मुंबई, १७ ऑक्टोबर २०२४: डिजी यात्रा एक अत्याधुनिक सेल्फ-सॉव्हरीन आयडेन्टिटी आधारित इकोसिस्टम आहे, जी फेस बायोमेट्रिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने विमानतळांवर संपर्करहित आणि सुरळीत प्रवासी प्रक्रिया करते. डिजी यात्राने आपल्या डी-केवायसी अभियानाच्या आरंभाची घोषणा केली आहे. हे अभियान ४ ऑक्टोबर रोजी सुरू झाले आहे.
‘डोन्ट नो यॉर कस्टमर’ बॅनरखाली, हे अभियान ग्राहकांची व्यक्तिगत माहिती संग्रहित किंवा अॅक्सेस केल्याशिवाय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याबाबत डिजीयात्राची वचनबद्धता अधोरेखित करते. डेटा उल्लंघन आणि डेटाचा दुरुपयोग या सामान्य बाबी असणाऱ्या आजच्या जगात डिजी यात्राचा दृष्टिकोन सुरक्षित आणि जबाबदार डेटा मॅनेजमेंटसाठी एक नवीन मानंदांड प्रस्थापित करतो.
डिजी यात्रा फाऊंडेशनचे सीईओ सुरेश खडकभावी म्हणाले, “आमचे अॅप वापरताना यूझर्सना सुरक्षित आणि आश्वस्त वाटेल याची खातरजमा करून प्रवास सुरळीत आणि त्रास-मुक्त बनवणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे. या अभियानाचा शुभारंभ आमच्या भावी विकासाच्या तयारीच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. भावी महत्त्वाकांक्षी प्रसार योजनांसह आम्ही आमच्या यूझर्सना डिजी यात्राच्या प्रायव्हसी बाय डिझाईन अप्रोचबद्दल शिक्षित करण्यासाठी जास्तत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित आहोत. ज्यामधून आमच्या सेवांची सुरक्षा आणि विश्वासार्हता सुनिश्चित होते.
डिजी यात्राच्या संचालनाच्या मुळाशी सेल्फ-सॉव्हरीन आयडेन्टिटीचे तत्व आणि वर्ल्ड वाइड वेब कंसोरटियम मानकांचे पालन आहे. व्हेरिफायेबल क्रेडेंशीयल्स, डिसेन्ट्रलाईझ्ड आयडेंटिफायर्स आणि डिस्ट्रीब्यूटेड लेजर टेक्नॉलॉजीच्या मदतीने ही कंपनी खातरजमा करते की, आपल्या ग्राहकांचे त्यांच्या खाजगी डेटावर पूर्ण नियंत्रण असेल. डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उच्च जागतिक मानकांचे पालन करताना विमानाने उड्डाण केल्यानंतर 24 तासांच्या आत सर्व संवेदनशील माहिती सुरक्षित पद्धतीने हटवली जाते.
कंपनीने आपल्या मार्केटिंग धोरणाचा एक भाग म्हणून ही कंपनी डोन्टनोयुअरकस्टमर आणि डिजी यात्रासारख्या हशटॅगचा उपयोग करून सोशल मीडियाच्या माध्यमातून यूझर्ना या अभियानात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करते. या अभियानात संतुष्ट ग्राहकांचे व्हिडिओ आणि अॅपची गोपनीयता वैशिष्ट्ये आणि लाभ दर्शविणारे इन्फोग्राफिक्स देखील समविष्ट असतील, ज्यांच्यामुळे डिजी यात्रा प्रवाशांचा विश्वसनीय साथीदार बनते.
६.५ मिलियन अॅप यूझर्स आणि देशभरात २४ ठिकाणी संचालनासह डिजी यात्रा विश्वासाच्या महत्त्वावर नेहमीच जोर देते आणि प्रवाशांना एक अशी इकोसिस्टम प्रदान करते, ज्यात सुविधा आणि गोपनीयता यांना एकसमान प्राधान्य दिले जाते.