maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ऑडी इंडियाकडून देशातील पहिल्‍या आरई-पॉवर्ड अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज बीकेसी मुंबई येथे भारतातील पहिल्‍या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन केले. चार्जझोनसोबत सहयोगाने विकसित करण्‍यात आलेल्‍या या अल्ट्रा-फास्‍ट चार्जरची इलेक्ट्रिक वेईकलला ३६० केडब्‍ल्‍यू शक्‍ती वितरित करण्‍यासाठी एकूण ४५० केडब्‍ल्‍यूची प्रभावी क्षमता आहे. ११४ केडब्‍ल्‍यू बॅटरी असलेल्‍या ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉनला फक्‍त २६ मिनिटांमध्‍ये २० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करता येऊ शकते. उदघाटन प्रसंगी ऑडी एजीच्‍या सेल्‍स रिजन ओव्‍हरसीजचे वरिष्‍ठ संचालक अलेक्‍झांडर फॉन वाल्‍डेनबर्ग-ड्रेसेल आणि ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों उपस्थित होते.

 

मुंबई, १४ डिसेंबर २०२३: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज बीकेसी मुंबई येथे भारतातील पहिल्‍या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन केले. चार्जझोनसोबत सहयोगाने संकल्‍पना मांडण्‍यासह विकसित करण्‍यात आलेल्‍या या अल्ट्रा-फास्‍ट चार्जरची इलेक्ट्रिक वेईकलला ३६० केडब्‍ल्‍यू शक्‍ती वितरित करण्‍यासाठी एकूण ४५० केडब्‍ल्‍यूची प्रभावी क्षमता आहे आणि उच्‍च परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेच्‍या खात्रीसाठी ५०० amps लिक्विड-कूल्‍ड गनसह सक्षम आहे.

११४ केडब्‍ल्‍यू बॅटरी (भारतातील पॅसेंजर वेईकलमध्‍ये सर्वात मोठी बॅटरी) असलेल्‍या ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉनला फक्‍त २६ मिनिटांमध्‍ये २० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करता येऊ शकते. ऑडीच्‍या शाश्‍वततेवरील फोकसशी बांधील राहत अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग’ई-ट्रॉन हब’ला पूर्णत: ग्रीन एनर्जीची शक्‍ती आहे आणि सोलार रूफ आहे, जे ‘ई-ट्रॉन हब’ला प्रकाशमय करण्‍यासह पेरिफेरल इलेक्ट्रिकल आवश्‍यकतांच्‍या कार्यसंचालनांना साह्य करते. मार्च २०२४ पर्यंत ऑडी ई-ट्रॉन मालकांना मोफत चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे.

ऑडी एजीच्‍या सेल्‍स रिजन ओव्‍हरसीजचे वरिष्‍ठ संचालक अलेक्‍झांडर फॉन वाल्‍डेनबर्ग-ड्रेसेल म्‍हणाले, “ऑडीमध्‍ये आम्‍ही इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी चार्जिंग नेटवर्क विस्‍तारित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि मला आनंद होत आहे की भारतातील ऑडीने या दिशेने अग्रणी पाऊल उचलले आहे. मुंबईत भारतातील सर्वात गतीशील ईव्‍ही चार्जर स्‍थापित करणे हे मोठे यश आहे आणि त्‍यामधून देशातील ईव्‍हींची उत्‍क्रांती दिसून येते. हे फास्‍ट चार्जर मुंबई शहरातील ग्राहकांना सोईस्‍करपणे व चालता-फिरता चार्जिंगमधून फायदा होण्‍याची खात्री घेईल.”

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी इंडियाद्वारे भारतातील पहिले, अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन बहुमूल्‍य ग्राहकांसाठी सर्वसमावेशक इलेक्ट्रिक वेईकल इकोसिस्‍टम विकसित करण्‍याच्‍या आमच्‍या सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे. अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’ मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स येथे स्थित आहे, जे अधिकाधिक इलेक्ट्रिक वेईकल मालकांना सहजपणे उपलब्‍ध आहे. रेंजसंदर्भात असलेल्‍या चिंतेचे निराकरण करण्‍यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधेमध्‍ये झपाट्याने वाढ करणे महत्त्वाचे आहे, ज्‍यामधून विनासायास अनुभव आणि कमी चार्जिंग वेळेची खात्री मिळेल. आम्‍ही उद्योगामध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यासह शाश्‍वत गतीशीलतेच्‍या भवितव्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ देखील करत आहोत.”

अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशन विनासायास अनुभव आणि समाधान प्रदान करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले  आहे. या चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये उच्‍च क्षमतेच्‍या गन्‍स आहेत, ज्‍या फास्‍ट चार्जिंगची सुविधा देतात. तसेच, हबमध्‍ये ई-ट्रॉन चार्ज करणाऱ्या ई-ट्रॉन मालकांसाठी प्रिमिअम कॉफी वाऊचर्स उपलब्‍ध आहेत. अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’मध्‍ये कार चार्ज होत असताना ई-ट्रॉन मालकांसाठी आराम करण्‍याकरिता लाऊंज आहे. हबमध्‍ये प्रशिक्षित कर्मचारी असतील, जे कोणत्‍याही आवश्‍यक साह्यतेसाठी सहजपणे उपलब्‍ध होतील. ऑडी ई-ट्रॉन मालकांना त्‍यांच्‍या ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपच्‍या माध्‍यमातून अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग ‘ई-ट्रॉन हब’बाबत माहिती उपलब्‍ध होऊ शकते, ज्‍यामुळे लोकेशनवर सहज पोहोचता येऊ शकते.

चार्ज झोनेचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय हरियानी म्‍हणाले, “मला आपल्‍या देशामध्‍ये सहयोगाने सुपरचार्जिंग नेटवर्क विकसित करण्‍यासाठी ऑडी इंडिया व चार्ज झोन यांच्‍यामधील या उल्‍लेखनीय सहयोगाचा आनंद होत आहे. भारतात इलेक्ट्रिक कार्सची वाढ होत आहे, ज्यामधून स्‍पष्‍टपणे दिसून येते की ईव्‍ही वापरकर्त्‍यांना एकसंधी अनुभव देण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा एकीकृत दृष्टिकोन, अपस्‍ट्रीम रिन्‍यूएबल एनर्जी, योग्‍य ठिकाण आवश्‍यक आहेत. टीम ऑडी इंडिया डिझाइन, अभियांत्रिकी व अंमलबलावणीच्या आमच्‍या धोरणात्‍मक योजनेशी संलग्‍न असल्‍याचे पाहून आनंद होत आहे. मी हे यश शक्‍य करण्‍यासाठी आमच्‍या सहयोगींचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो.”

या वर्षाच्‍या सुरूवातीला ऑडी इंडियाने मायऑडी कनेक्‍ट अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ सादर केले. हे वन-स्‍टॉप सोल्‍यूशन ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपमध्‍ये अनेक इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती उपलब्‍ध करून देते. ‘चार्ज माय ऑडी’ हा इंडस्‍ट्री-फर्स्‍ट उपक्रम आहे, जो ग्राहकांसाठी सोयीसुविधेमध्‍ये वाढ करतो. न्‍यूमोसिटी टेक्‍नॉलॉजीज ईएमएसपी रोमिंग सोल्‍यूशनद्वारे समर्थित अॅप्‍लीकेशनमध्‍ये सध्‍या पाच चार्जिंग सहयोगींचा समावेश आहे – आर्गो ईव्‍ही स्‍मार्ट, चार्ज झोन, रिलक्‍स इलेक्ट्रिक, लायनचार्ज आणि झिऑन चार्जिंग. ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना मार्च २०२४ पर्यंत नेटवर्कमधील (झिओन चार्जिंग वगळून) कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी चार्जिंगचा फायदा मिळेल. सध्‍या, ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १,००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत आणि पुढील काही महिन्‍यांमध्‍ये अधिक चार्ज पॉइण्‍ट्सची भर करण्‍यात येईल.

ऑडी इंडियाने भारतातील ७३ शहरांमध्‍ये १४० हून अधिक चार्जर्स यशस्‍वीरित्‍या स्‍थापित केले आहेत. यामध्‍ये सर्व ऑडी इंडिया डिलरशिप्‍स, वर्कशॉप सुविधा आणि देशातील धोरणात्‍मक महामार्गांवर असलेले निवडक एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल ग्रुप ब्रॅण्‍ड डिलरशिप्‍सचा समावेश आहे, जे मालकीहक्‍क सुलभ करतात.

Related posts

सणासुदीच्या काळात भारतातच पर्यटनाचा आनंद घेण्‍याची भारतीयांची इच्‍छा: कायक

Shivani Shetty

‘आम्‍ही पेटीएम सोडत नाही आहोत’ असे बिबा, हॉटस्‍पॉट रिटेल प्रा. लि. आणि अरविंद लिमिटेड यांसारखे कंपनीचे सर्वात मोठे मर्चंट्स म्‍हणाले; सर्वोत्तम पेमेंट्ससाठी कंपनीवरील विश्‍वास कायम

Shivani Shetty

श्रेयस शिपिंग डीलिस्टिंग की 400 रुपये प्रति शेयर की काउंटर ऑफर बोली विंडो 17 अक्टूबर 2023 को होगी बंद

Shivani Shetty

Leave a Comment