maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इंडियन बँकेने व्‍यावसायिक वाहन फायनान्सिंगसाठी टाटा मोटर्ससोबत केला करार

मुंबई, १७ ऑक्‍टोबर २०२४: इंडियन बँक या भारतातील आघाडीच्‍या सार्वजनिक क्षेत्र बँकेने भारतातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी टाटा मोटर्ससोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत देशभरातील टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन ग्राहक आणि अधिकृत डिलरशिप्‍सना आकर्षक फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येतील. बँक स्‍पर्धात्‍मक व्‍याजदर आणि सुव्‍यवस्थित क्रेडिट प्रक्रियेसह सानुकूल फायनान्शियल पॅकेजेस् देईल. हा सहयोग टाटा मोटर्सच्‍या संपूर्ण व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओसह एलएनजी (लिक्विफाईड नॅच्‍युरल गॅस) आणि व्‍यावसायिक वाहनांच्‍या इलेक्ट्रिक श्रेणीसाठी सर्वोत्तम फायनान्शियल सोल्‍यूशन्‍स देईल. टाटा मोटर्स आणि इंडियन बँक डिलर फायनान्सिंगसाठी त्‍यांच्‍या सहयोगामध्‍ये अधिक वाढ देखील करेल.

 

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक श्री. आशुतोष चौधरी म्‍हणाले, ”आम्‍हाला टाटा मोटर्ससोबत त्‍यांचे डिलरशिप्‍स आणि फ्लीट ऑपरेटर्सना सर्वोत्तम फायनान्शियल सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍याचा आनंद होत आहे. आमचे फायनान्शियल पॅकेजेस् ग्राहक व डिलर्सना त्‍यांची व्‍यवसाय उद्दीष्‍टे संपादित करण्‍यास मदत करतील, तसेच एकूण आर्थिक कार्यक्षमता वाढवतील. आम्‍ही टाटा मोटर्ससोबत सहयोगाने काम करत त्‍यांच्‍या ग्राहकांना व्‍यवसाय ध्‍येये संपादित करण्‍यास मदत करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

 

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”आम्‍हाला इंडियन बँकेसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍याचा आनंद होत आहे. हा सहयोग ग्राहकांना सुलभ फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यामध्‍ये मदत करेल. सहजपणे क्रेडिट उपलब्‍ध करून देत आणि विनासायास फायनान्सिंग पर्याय देत आमचा आमच्‍या डिलर नेटवर्कसाठी फायनान्शियल इकोसिस्‍टम प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांचे व्‍यवसाय अधिक दृढ करण्‍यास मदत होईल, तसेच बहुमूल्‍य ग्राहकांना अधिक सोयीसुविधा मिळतील.”

 

टाटा मोटर्सचा व्‍यापक व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओ आहे, ज्‍यामध्‍ये सब-१-टन ते ५५-टन कार्गो वेईकल्‍स आणि १०-सीटर ते ५५-सीटर मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा समावेश आहे. या प्रबळपणे डिझाइन केलेल्‍या व्‍यावसायिक वाहनांना सर्वसमावेशक वेईकल जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी त्‍यांच्‍या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्‍या माध्‍यमातून मूल्‍यवर्धित सेवांच्‍या श्रेणीचे पाठबळ आहे. सानुकूल ताफा व्‍यवस्‍थापनासाठी टाटा मोटर्सचा कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म ‘फ्लीट एज’ ऑपरेटर्सना त्‍यांच्‍या वेईकल्‍सचा अपटाइम वाढवण्‍यास सक्षम करतो आणि एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करतो, तसेच भारतातील सर्वात मोठ्या सर्विस नेटवर्ककडून २४x७ सपोर्ट देतो. टाटा मोटर्सने सर्वांगीण परिवहन सोल्‍यूशन्‍समध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करणे सुरू ठेवले आहे.

 

१५ ऑगस्‍ट १९०७ रोजी स्‍थापना करण्‍यात आलेली इंडियन बँक भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्र बँक आहे, जेथे भारत सरकारचे ७३.८४ टक्‍के शेअर्स आहेत (३० जून २०२४ रोजी). १९८९ मध्‍ये मद्रासमध्‍ये एटीएम इन्‍स्‍टॉल करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्र बँक म्‍हणून ओळखली जाणारी इंडियन बँक विविध प्रांतांमध्‍ये ५८४६ शाखांचे (३ डिजिटल बँकिंग युनिट्ससह) कार्यसंचालन पाहते, ज्‍यापैकी १,९८३ शाख ग्रामीण भागात, १,५३१ शाखा अर्ध-शहरी भागात, १,१७३ शाखा शहरी भागात आणि १,१५९ शाखा मेट्रो भागात आहेत. बँकेच्‍या ३ ओव्‍हरसीज शाखा आणि १ आंतरराष्ट्रीय बँकिग युनिट (आयबीयू) देखील आहे. आपल्‍या डिजिटल परिवर्तन मोहिमेचा भाग म्‍हणून इंडियन बँक प्रोजेक्‍ट वेव्‍ह अंतर्गत ग्राहक अनुभवांना नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे आणि सेवा सानुकूल करत आहे. आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत बँकेने डिजिटल माध्‍यमांद्वारे प्रभावी ३६,६७८ कोटी रूपयांचा महसूल निर्माण केला, तसेच मोबाइल बँकिंग आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्‍यांच्‍या आकडेवारीत मोठी वाढ देखील होत आहे. सप्‍लाय चेन फायनान्‍स अंतर्गत बँक डिलर्स व विक्रेत्‍यांच्‍या खेळते भांडवल गरजांची पूर्तता करण्‍यासाठी ऑनलाइन प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून एण्‍ड-टू-एण्‍ड फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देते. बँकेच्‍या सप्‍लाय चेन फायनान्‍स उत्‍पादनाने अलिकडील काळात मोठी प्रगती केली आहे आणि ऑटोमोबाइल व इतर क्षेत्रांमधील अनेक आघाडीच्‍या कंपन्‍यांना ऑन-बोर्ड केले आहे.

Related posts

कोका-कोला इंडियाकडून १०० टक्‍के रिसायकल्‍ड पीईटी (आरपीईटी) बॉटल्‍ससह अफोर्डेबल स्‍मॉल स्‍पार्कलिंग पॅकेज (एएसएसपी) लाँच

Shivani Shetty

फिल्म फॉर थॉट: मानसिक आरोग्याच्या सकारात्मक चित्रणाची शक्ती

Shivani Shetty

मुंबईत प्रथमच संतोकबा मानवतावादी पुरस्काराचे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment