maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्वांटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर ऑफर

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३: इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात तज्ञ असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप असलेल्या क्वांटम एनर्जीने एक रोमांचक दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे, जी तिच्या ग्राहकांसाठी सणासुदीचे दिवस उज्ज्वल करण्यासाठी सज्ज आहे. २० नोव्हेंबरपर्यंत, क्वांटम एनर्जी, तिच्या सर्व डीलरशिप लोकेशन्सवर, प्रत्येक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसह २० ग्रॅम चांदीचे नाणे ऑफर करीत आहे.

दिवाळीची एक अतिरिक्त भेट म्हणून, प्रत्येक खरेदीदार लकी ड्रॉमध्ये ३२ इंचाचा एलईडी टीव्ही जिंकण्याची संधी मिळण्यास पात्र ठरेल. हा लकी ड्रॉ, सर्व क्वांटम एनर्जी डीलर्सशिप्समध्ये आयोजित करण्यात येईल आणि प्रत्येक डीलरशिपमध्ये एक भाग्यवान विजेता किंवा विजेती निवडली जाईल. प्लाझ्मा, इलेक्ट्रॉन, मिलान आणि बिझिनेस मॉडेल्ससह, तिच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रभावी श्रेणीसह, क्वांटम एनर्जी भारतीय प्रवाशांच्या विविध गरजा भागवेल. हे सर्व मॉडेल्स, असाधारण कामगिरी आणि उर्जा कार्यक्षमतेचे आश्वासन देतात आणि दिवाळीच्या उत्सवामध्ये थक्क करून सोडणारा अनुभव देतात.

क्वांटम एनर्जी लिमिटेडच्या संचालिका, चेतना चुक्कापल्ली यांनी सांगितले की, “या दिवाळीत, क्वांटम एनर्जी आनंद आणि सुख पसरविण्यासाठी समर्पित आहे. आमच्या कौतुकाचे एक प्रतिक म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्या ईव्ही स्कूटरच्या प्रत्येक खरेदीसह एक विशेष भेट देत आहोत. या सणासुदीच्या दिवसांत, आमच्या ईव्ही स्कूटर्स, प्रियजनांच्या त्वरित भेटींसाठी असो, किंवा शॉपिंगच्या रोमांचक कामांसाठी असो, एक खंबीर साथीदार म्हणून काम करू शकतात. आम्ही सण साजरा करत असताना, आम्ही आमच्या सर्व समर्पित कर्मचारी, आदरणीय विक्रेते आणि पर्यावरणास अनुकूल वाहतुकीच्या गरजांसाठी ज्यांनी क्वांटमला निवडले आहे, त्या रायडर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत.”

प्रत्येक क्वांटम एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये:

प्लाझ्मा: १५०० वॅट मोटरद्वारे संचालित; ६० कि.मी./तास टॉपची गती; बॅटरीच्या एकाच पूर्ण चार्जवर १२० कि.मी.ची प्रभावी श्रेणी देते. किंमत – रु. १,२३,००० एक्स-शोरूम, भारत.

इलेक्ट्रॉन: १००० वॅट मोटरसह सुसज्ज; ५५ कि.मी./तास टॉपची गती; बॅटरीच्या एकाच पूर्ण चार्जवर ८०-९५ कि.मी.ची श्रेणी देते; किंमत – रु. ९८,३८५ एक्स–शोरूम, भारत.

मिलान: १००० वॅट मोटरद्वारे संचालित; ५५ कि.मी./तास टॉपची गती; बॅटरीच्या एकाच पूर्ण चार्जवर ८०-९५ कि.मी.ची श्रेणी देते; किंमत – रु. ९६,२९१ एक्स–शोरूम, भारत.

बिझिनेस: १२०० वॅट मोटरद्वारे मोटरद्वारे संचालित; ५५ कि.मी./तास टॉपची गती; विविध राइडिंगच्या विविध मोड्समध्ये ८०-१०० कि.मी.ची श्रेणी देते; किंमत – रु. १०३,७३१ एक्स–शोरूम, भारत.

Related posts

प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत

Shivani Shetty

मेटामास्‍क अब्‍जावधीच्या मालमत्तेचे चोरी होण्‍यापासून संरक्षण करणार

Shivani Shetty

भारतीय पर्यटक आता व्हिएतजेटच्‍या एक्‍सक्‍लुसिव्‍ह प्रमोशन ऑफर्ससह व्हिएतनाममधील अद्भुत पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात

Shivani Shetty

Leave a Comment