मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल तंत्रज्ञान व्यासपीठाने आर्थिक वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रबळ कामगिरी केली. कंपनीने आपली प्रबळ विकासगती कायम राखत ४७१.८ दशलक्ष रूपयांच्या (वार्षिक ६७.२ टक्क्यांची वाढ) करोत्तर नफ्याची नोंद केली. कंपनीने २०,२५५.८ दशलक्ष रूपयांचा ग्रॉस बुकिंग रेव्हन्यू संपादित केला आणि आधुनिक काळातील काही लाभदायी कंपन्यांमध्ये सामील आहे.
इझमायट्रिपची आर्थिक वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीमधील आकडेवारी पाहिल्यास कंपनीच्या एअर सेगमेंट बुकिंग्ज वार्षिक २.३ टक्क्यांच्या वाढीसह २९.० लाखांपर्यत पोहोचल्या आहेत. हॉटेल नाइट्स बुकिंग्ज १,२४,८६२ पर्यंत पोहाचेल्या, ज्यामध्ये वार्षिक ६०.२ टक्क्यांची वाढ झाली. अदर्स सेगमेंटमधील बुकिंग्ज वार्षिक ९८.५ टक्क्यांच्या वाढीसह २,७२,६०० पर्यंत पोहोचल्या. तसेच कंपनीचे ग्रॉस बुकिंग रेव्हन्यू १९,७७६.९ दशलक्ष रूपयांवरून वार्षिक २.४ टक्क्यांच्या वाढीसह २०,२५५.८ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचले. तर ईबीआयटीडीए वार्षिक ६८.१ टक्क्यांच्या वाढीसह ६७६.५ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचले. पीएटी (करोत्तर नफा) वार्षिक ६७.२ टक्क्यांच्या वाढीसह ४७१.८ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला आहे.
इझमायट्रिपच्या आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या सहामाहीमधील कामगिरीवर नजर टाकल्यास दिसते की कंपनीच्या एअर सेगमेंट बुकिंग्ज वार्षिक २०.४ टक्क्यांच्या वाढीसह ६१.१ लाखांपर्यत पोहोचल्या आहेत. हॉटेल नाइट्स बुकिंग्ज २.९ लाखांपर्यंत पोहाचेल्या, ज्यामध्ये वार्षिक ९०.५ टक्क्यांची वाढ झाली. तर ट्रेन्स, बसेस व अदर्स सेगमेंटमधील बुकिंग्ज वार्षिक ६६.८ टक्क्यांच्या वाढीसह ५.० लाखांपर्यंत पोहोचल्या. तसेच ग्रॉस बुकिंग रेव्हन्यू ३६,४०७.५ दशलक्ष रूपयांवरून वार्षिक २०.८ टक्क्यांच्या वाढीसह ४३,९६५.४ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचले. ईबीआयटीडीए वार्षिक २२.७ टक्क्यांच्या वाढीसह १,०५१.५ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचले. कंपनीचा पीएटी (करोत्तर नफा) वार्षिक १९.३ टक्क्यांच्या वाढीसह ७३२.० दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला आहे.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “मला सांगताना आनंद होत आहे की, आर्थिक वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीमधील आमचा करोत्तर नफा गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत ६७.२ टक्क्यांनी वाढून ४७१.८ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला. तसेच आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या सहामाहीमधील आमचा करोत्तर नफा वार्षिक १९.३ टक्क्यांच्या वाढीसह ७३२.० दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान ट्रॅव्हल उद्योगामध्ये मंदीचे वातावरण असताना देखील ईझी ट्रिप प्लानर्सने प्रबळ कामगिरी केली, जेथे आम्ही २०,२५५.८ दशलक्ष रूपयांच्या ग्रॉस बुकिंग रेव्हन्यूची नोंद केली. तसेच, कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ३०.६ टक्क्यांच्या आणि मागील तिमाहीच्या तुलनेत १४.२ टक्क्यांच्या वाढीसह १,४१६.९ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला.