maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

लिव्‍हप्‍युअरची २३३ कोटी रूपयांची निधी उभारणी

मुंबई, २६ ऑगस्ट २०२४: लिव्‍हप्‍युअर या भारतातील आघाडीच्‍या व विश्‍वसनीय ग्राहकोपयोगी वस्‍तू ब्रँडने आज घोषणा केली की, कंपनीने आपल्‍या कॅटालिस्‍ट गुंतवणूक धोरणाच्‍या माध्‍यमातून एमअँडजी इन्‍व्‍हेस्‍टमेंट्सकडून २०८ कोटी रूपयांचा निधी आणि एनक्‍यूबेट कॅपिटल पार्टनर्सकडून जवळपास २५ कोटी रूपयांची गुंतवणूक प्राप्‍त केली आहे.

हा फंडिंग राऊंड लिव्‍हप्‍युअरसाठी महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे, जेथे कंपनीने विकास व विस्‍तारीकरणाच्‍या पुढील टप्‍प्‍याची सुरूवात केली आहे. भांडवलामधील ही वाढ लिव्‍हप्‍युअरच्‍या श्रेणी विस्‍तारीकरण, आरअँडडी व नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून उत्‍पादन विकासाला गती देण्‍याच्‍या, ऑफरिंग्‍जमध्‍ये विविधता आणण्‍याच्‍या, बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्‍याच्‍या आणि होम श्रेणीमधील ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍याच्‍या योजनांना गती देईल. एमअँडजीचे कॅटालिस्‍ट धोरण जगातील काही सर्वात मोठ्या पर्यावरणीय व सामाजिक आव्‍हानांमध्‍ये नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सची भर करते.

लिव्‍हप्‍युअरचे सह-संस्‍थापक व अध्‍यक्ष नवनीत कपूर म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याला गती देण्‍यासाठी एमअँडजीच्‍या कॅटालिस्‍ट टीमसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. ही गुंतवणूक आम्‍हाला जलदपणे नाविन्‍यता आणण्‍यामध्‍ये, आमचा उत्‍पादन पोर्टफोलिओ व रिटेल उपस्थिती विस्‍तारित करण्‍यामध्‍ये आणि आमचे उच्‍च दर्जाचे होम सोल्‍यूशन्‍स अधिकाधिक भारतीयांना उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये साह्य करेल.”

लिव्‍हप्‍युअरचे व्यवस्‍थापकीय संचालक राकेश कौल म्‍हणाले, ”या गुंतवणूकीसह आम्‍ही अत्‍याधुनिक उत्‍पादने विकसित करण्‍यावरील आमचा फोकस अधिक दृढ करू, जी भारतीय ग्राहकांच्‍या वाढत्‍या गरजांची पूर्तता करतील. आम्‍ही विशेषत: आमच्‍या वॉटर-अॅज-ए-सर्विस ऑफरिंग, तसेच होम व किचन ऑफरिंग्‍जमधील इको-फ्रेण्‍डली शाश्‍वत सोल्‍यूशन्‍स अधिक वाढवत आहोत.”

Related posts

व्हिएतजेट अॅडलेड आणि पर्थला व्हायब्रंट हो ची मिन्ह सिटीशी जोडते, प्रवाशांसाठी रोमांचक संधी उघडते

Shivani Shetty

कोस्‍टा कॉफीकडून शरद ऋतूमधील बेस्‍ट-केप्‍ट सिक्रेट ‘मॅपल हेझल’ मेनू लाँच

Shivani Shetty

मुंबई की भावना, सर्वसमावेशिता और एकता को संरक्षित करने के लिए मुंबई फेस्टिवल 2024 में ‘हर किसी को आमंत्रित’

Shivani Shetty

Leave a Comment