maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून रोडसाइड असिस्टंस प्रोग्रामची घोषणा

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज ईव्‍ही तीन-चाकी इब्‍लू रोझीसाठी अद्वितीय रोडसाइड असिस्टंस प्रोग्रामची घोषणा केली. कंपनी नोव्‍हेंबर महिन्‍यामध्‍ये खरेदी केलेल्‍या सर्व इब्‍लू रोझीवर ३ वर्षांचे मोफत रोडसाइड असिस्टंस ऑफर करत आहे. आरएसए देशभरातील कंपनीच्‍या सर्व टचपॉइण्‍ट्सवर उपलब्‍ध असेल.

२४x७ रोडसाइड असिस्टंस प्रोग्राम ग्राहकांना विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये मन:शांती देतो. या प्रोग्राममधून अनेक फायदे मिळतील, जसे फ्लॅट टायर असिस्टंस, बॅटरी जम्‍पस्‍टार्ट, लॉकआऊट सर्विस, मायनर रिपेअर्स व टोईंग सर्विस. तसेच ग्राहकांना कोणत्‍याही अनपेक्षित आपत्‍कालीन स्थितीत साह्य करण्‍यासाठी समर्पित दिवस-रात्र हेल्‍पलाइन क्रमांक असेल. समर्पित हेल्पलाइन क्रमांक ग्राहकांना साह्य करेल आणि कुशल टेक्निशियन्‍स ग्राहकांना त्‍यांच्‍या लोकेशनला मदतीसाठी पाठवण्‍यात येतील, तसेच आवश्‍यक असल्‍यास टोईंग ट्रक सपोर्ट देखील देण्‍यात येईल. मोठ्या ब्रेकडाऊन स्थितीमध्‍ये जवळच्‍या ऑथोराइज्‍ड सर्विस सेंटरमधून जवळपास ४० किमी अंतरापर्यंत टोईंग सपोर्ट देण्‍यात येईल.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, “आमचा सुस्‍पष्‍ट ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आहे, देशामध्‍ये ईव्‍ही अवलंबतेचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि गेल्‍या काही वर्षांपासून ईव्‍हींबाबतचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात सुधारत आहे. आम्‍ही इब्‍लू रोझी ग्राहकांसाठी काळजीपूर्वक आरएसए प्रोग्राम डिझाइन केला आहे आणि कमी टर्नअराऊंड वेळेमध्‍ये ग्राहकांच्‍या कोणत्‍याही समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी आमच्‍या टेक्निशियन्‍सना प्रशिक्षित केले आहे. आम्‍ही ग्राहकांसाठी ईव्‍ही मालकीहक्‍क सुधारित करत राहू आणि शाश्‍वत अजेंडाला चालना देण्‍यासाठी सर्वांगीण इकोसिस्‍टमची निर्मिती करू.”

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे देशभरात ५० डिलरशिप्‍स आहेत आणि या वर्षाच्‍या अखेरपर्यंत १०० डिलरशिप्‍स असण्‍याचा मनसुबा आहे. कंपनी सध्‍या ईव्‍ही उत्‍पादनांच्‍या व्‍यापक श्रेणीची विक्री करते, ज्‍यामध्ये इब्‍लू फिओ स्‍कूटर, इब्‍लू स्पिन व थ्रिल ई-बायसिकल श्रेणी आणि इब्‍लू रायनो लोडरचा समावेश आहे.

Related posts

गुन्हा, षडयंत्र आणि भ्रष्टाचार: ‘मनी माफिया सीझन ३’ ७ एप्रिल रोजी डिस्कव्हरी चॅनलवर

Shivani Shetty

१४व्या शिकागो दक्षिण आशियाई महोत्सवात क्लोजिंग नाईटसाठी स्टोरीटेलर चित्रपटाची निवड

Shivani Shetty

युनिव्‍हर्सिटी लिव्हिंगकडून स्‍टडी अब्रॉड बडी लाँच

Shivani Shetty

Leave a Comment