maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इन्श्युरन्सदेखोद्वारे विमा एजन्ट्सचे सक्षमीकरण

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३: इन्श्युअरदेखो ही भारतातील अग्रगण्य इऩ्श्युअरटेक कंपनी विमाखरेदी आणि विम्याचा दावा करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणून विमाक्षेत्राचे लोकशाहीकरण करत आहे. विमाक्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याबरोबरच आपल्या फुल-स्टॅक डिजिटल मंचाच्या माध्यमातून आपल्या एजंट पार्टनर्ससाठी अनेक प्रकारच्या संधी निर्माण करण्याचे कामही इन्श्युअरदेखोकडून केले जात आहे. अंबरनाथ इथले बिझनेसमन चेतन माळी यांनी या उद्योगक्षेत्रामध्ये घडत असलेल्या बदलांचं स्वागत करण्याचं धाडस दाखवलं. या परिवर्तनादरम्यानच त्यांना इन्श्युरन्सदेखोचा शोध लागला, जिथे मिळालेल्या भरपूर संधींमुळे त्यांच्या कारकिर्दीला एक नवी ऊर्जा मिळाली.

गेल्या तीन वर्षांपासून चेतन इन्श्युरन्सदेखोशी संलग्न आहेत आणि त्यांच्या रिलेशनशिप मॅनेजरने या प्रवासात त्यांचे मार्गदर्शन केले आहे. या मंचामुळे चेतन यांना १० वेगवेगळ्या कंपन्यांच्या विमायोजनांमध्ये तुलना करता येते आणि जास्तीत-जास्त लाभ देणाऱ्या व हप्त्याची रक्कम कमी असलेल्या सर्वोत्तम विमायोजनांचा पर्याय निवडता येतो. पेमेंटपासून पॉलिसी जारी करण्यापर्यंत ज्या गोष्टींना पूर्वी कित्येक दिवस लागायचे तेच काम आता काही तासांत होऊन जाते. अगदी एकेकाळी खूप किचकट वाटणारी अंडररायटिंगची प्रक्रियाही अधिक शिस्तबद्ध आणि सोपी करण्यात आली आहे. या अभिनव मंचामुळे आता चेतन आपल्या ग्राहकांशी अधिक कार्यक्षमतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय संवाद साधू शकतात.

त्यांनी सांगितले की, “इन्श्युरन्सदेखोमुळे मला आर्थिक स्थैर्य तर मिळालेच, पण त्याचबरोबर फावला वेळही मिळण्याची चैनही करता आली. हा मंच आपल्या एजंट पार्टनर्सना प्रचंड पाठबळ देणारा आहे. झटपट सेवा, तत्पर पे अवर्स आणि जोमदार आधारयंत्रणा यांच्यामुळे माझ्या व्यावसायिक प्रवासाला गती मिळालीच, पण माझ्यात सुरक्षितता आणि आत्मविश्वासाची भावनाही निर्माण झाली. सातत्यपूर्ण फीडबॅक आणि मार्गदर्शनाच्या मदतीने माझ्या उत्पन्नात वाढ झाली आहे आणि घर व गाडीमध्ये पैसे गुंतविणे मला शक्य झाले आहे. आजच्या जगात जिथे सारे काही डिजिटली घडत आहे, तिथे आता मला आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांशी कोणतीही तडजोड न करता आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करता येत आहे.”

ते पुढे म्हणाले, “नजिकच्या भविष्यात मला इन्श्युरन्सदेखो सोबत काम सुरू ठेवायला आवडेल. पॉलिसी वेगाने तयार करणे आणि विम्याच्या रकमेचा दावा करण्याची वेगवान प्रक्रिया या इन्श्युरन्सदेखोच्या वैशिष्ट्यांमुळे मला आपल्या ग्राहकांच्या गरजा अधिक कार्यक्षम पद्धतीने पुरविणे शक्य झाले आहे. या कार्यक्षमतेमुळे माझ्या कामाच्या विश्वासार्हतेमध्ये वाढ झाली आहे आणि माझ्या क्लाएन्ट्समधील खात्री व विश्वासाच्या भावनेस खतपाणी मिळाले आहे.”

Related posts

भारतभरातील तसेच सहमतीने निश्चित अन्य प्रदेशांतील ग्राहकांपर्यंत आरोग्य विज्ञान न्युट्रास्युटिकल पोर्टफोलिओ पोहोचवण्यासाठी नेस्ले इंडिया आणि डॉ. रेड्डीज यांच्यातर्फे जॉइंट व्हेंचरची स्थापना

Shivani Shetty

डॉ. बत्रा’जने न्‍यूट्रिगुड गम्‍मीज लाँच केले

Shivani Shetty

‘मामला लीगल है’ आणि ‘लापता लेडीज’ मधील कलाकार या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत

Shivani Shetty

Leave a Comment