मुंबई, २० ऑक्टोबर २०२३: टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही संगीत तयार करणारी भारतातील सर्वात आघाडीची म्युझिक कंपनी असून, कंपनीने ३० सप्टेंवर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले. तिमाहीतील सर्वाधिक ६०.९ कोटी रुपये एवढ्या महसुलाची केली नोंद, गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्के वाढ. पहिल्या सहामाहीतील नफा ११३.५ कोटींवर, गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ.
श्री कुमार तौराणी, चेअरमन-मॅनेजिंग डायरेक्टर, टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड निकालाबद्दल बोलताना म्हणाले की,”मला सांगताना आनंद होतोय की टिप्सने एका तिमाहीत सर्वाधिक ६१ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत यात २३ टक्के वाढ नोंदवली आहे. संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीचे हे फळ असून त्या सर्वांचे हे श्रेय आहे.”
या काळात कंपनीने एकूण १३० गाणी प्रसिद्ध केले असून त्यातील ६२ गाणी नव्या चित्रपटांतील होती तर ६८ गाणी बिगर-चित्रपटांतील होती. विविध प्रकारचे गाण्यांतून हे दिसून येते की आणि वेगवेगळ्या प्रकारचे गाणी बनवण्यात सक्षम आहोत. यातून म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आघाडीवर असल्याचे कंपनीचे स्थान पक्के होत आहे. डिजिटल क्षेत्रातही चांगली कामगिरी असून यूट्यूब चॅनेलवर सबस्क्रायबरची संख्या ८९.७ दशलक्षवर पोहोचली आहे आणि दुसऱ्या तिमाहीतील व्ह्यूज ५०.९ अब्जावर गेले आहेत. गतवर्षीच्या तुलने यात ८६ टक्के वाढ झाली आहे.
श्री हरी नायर, सीईओ, टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांना मीडिया आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राचा एकूण २५ वर्षांचा अनुभव आहे. म्युझिक क्षेत्रात त्यांना दोन दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे टीम आणखी सक्षम झाली आहे. सर्वोत्कृष्टी म्युझिक अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यातून वृद्धीचे नवनवे टप्पे गाठण्यासाठी सज्ज आहोत.
कंपनीची ठळक वैशिष्ट्ये:
· तिमाहीतील सर्वाधिक ६०.९ कोटी रुपये एवढ्या महसुलाची केली नोंद, गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्के वाढ. पहिल्या सहामाहीतील नफा ११३.५ कोटींवर, गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ
· या तिमाहीत कंटेट कॉस्ट ४.७ कोटी रुपये होती, गतवर्षी याच काळात ही कॉस्ट १७.२ कोटी रुपये होती.
· वित्त वर्ष २४च्या दुसऱ्या तिमाही कंपनीने १३० गाणी प्रसिद्ध केली. या १३० गाण्यांपैकी ६२ गाणी चित्रपटांची होती तर ६८ गाणी बिगर-चित्रपटांची होती.
· यूट्युबचे सबस्क्रायबर ८९.७ दशलक्ष झाले असून वित्त वर्ष २४च्या दुसऱ्या तिमाहीत ५०.९ अब्ज व्ह्युज मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यात ८६ टक्के वाढ झाली आहे.