maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फिजिक्‍सवालाने पीडब्‍ल्‍यू आयओआय स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट सुरु केले

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२३: फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) या भारतातील आघाडीच्‍या एड-टेक व्‍यासपीठाने पीडब्‍ल्‍यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्‍हेशन (पीडब्‍ल्‍यू-आयओआय)च्‍या माध्‍यमातून आपला शैक्षणिक पोर्टफोलिओ वाढवत शिक्षणला नव्‍या उंचीवर नेण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. स्‍कूल ऑफ टेक्नॉलॉजी (एसओटी)ला मिळालेल्‍या भव्‍य यशाला अधिक पुढे घेऊन जात पीडब्‍ल्‍यू-आयओआय नाविन्‍यपूर्ण तीन-वर्षांचा यूजी रेसिडेन्शियल प्रोग्राम स्‍कूल ऑफ मॅनेजमेंट (एसओएम) लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या प्रोग्रामचा व्‍यवस्‍थापन व तंत्रज्ञान क्षेत्रांमधील व्‍यवसाय व उद्योजकतेतील भावी लीडर्सना निपुण करण्‍याचा मनसुबा आहे.

एसओएम व्‍यवसाय, उद्योजकता व तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन या डायनॅमिक क्षेत्रांमध्‍ये यशस्‍वी होण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या दूरदर्शी व्‍यक्‍तींसाठी डिझाइन करण्‍यात आलेला सर्वसमावेशक प्रोग्राम आहे. अनुभवी शिक्षक व अव्‍वल कंपन्‍यांमधील उद्योग प्रमुख असलेले प्राध्‍यापकवर्ग, उद्योग-केंद्रित अभ्‍यासक्रम, जवळपास १०० टक्‍के स्‍कॉलरशिप्‍सची संधी आणि वास्‍तविक विश्‍वातील प्रकल्‍पांसह प्रत्‍यक्ष सहभाग यांसह विद्यार्थ्‍यांना यशस्‍वी व्‍यावसायिक प्रवासासाठी पूर्णपणे सुसज्‍ज केले जाते. हा प्रोग्राम वास्‍तविक जीवनातील आव्‍हानांचे नाविन्‍यपूर्ण पद्धतीने निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे आणि विद्यार्थ्‍यांना रिअल-टाइम स्‍टार्टअप व उद्योग आव्‍हानांचे निराकरण करण्‍यास, तसेच संकल्‍पनांना कृतीत आणण्‍याकरिता ज्ञानाचा वापर करण्‍यास सक्षम करतो.

पीडब्‍ल्‍यूचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आदित्‍य अग्रवाल म्‍हणाले, “या तीन वर्षाच्‍या प्रोग्रामसाठी आमचा दृष्टीकोन अगदी स्‍पष्‍ट आहे, तो म्‍हणजे दूरदर्शी लीडर्स तयार करणे, ज्‍यांना व्‍यवसाय क्षेत्रांबाबत सखोल माहिती असेल आणि आधुनिक व्‍यावसायिक आव्‍हानांचे प्रभावीपणे निराकरण करू शकतात. आमचे मिशन सोपे, पण पोटेण्‍ट आहे – विद्यार्थ्‍यांना व्‍यवसाय व तंत्रज्ञानाच्‍या डायनॅमिक क्षेत्रांमधील अद्वितीय यशासाठी सुसज्‍ज करणे.”

एसओएम अभ्‍यासक्रम सर्वसमावेशक बाजारपेठेला आकार देणाऱ्या नवीन व्‍यवसाय व तंत्रज्ञान ट्रेण्‍ड्सशी संलग्‍न होण्‍याकरिता बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे. यामध्‍ये तंत्रज्ञानाचा समावेश आहे, तसेच स्‍कूल ऑफ टेक्‍नॉलॉजी (एसओटी) सोबतच्‍या सहयोगाला चालना देतो. याव्‍यतिरिक्‍त, विद्यार्थ्‍यांना भारतातील किंवा परदेशातील पुढील शिक्षणासाठी आणि स्‍पर्धात्‍मक परीक्षांमध्‍ये पात्र ठरण्‍यासाठी पाथवे प्रदान करत एकाच वेळी प्रतिष्ठित संस्‍थांमधून बॅचलर्स पदवी शिक्षण घेण्‍याचा पर्याय देखील आहे.

Related posts

सचिन तेंडुलकरने लिव्‍हप्‍युअरचे प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायर लाँच केले

Shivani Shetty

राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा ‘महाराष्ट्र जन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित

Shivani Shetty

एल्‍गी (ELGi) कडून भारतात कम्‍प्रेस्‍ड एअर सिस्‍टम्‍ससाठी स्‍मार्ट मॉनिटरिंग व अलर्ट सिस्‍टम ‘Air~Alert’ सादर

Shivani Shetty

Leave a Comment