मुंबई, १९ ऑक्टोबर २०२३: २०२३: इन्शुरन्सदेखो या भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक कंपनीने सध्या चाललेल्या सीरिज बी निधीउभारणी फेरीतून ६ कोटी (६० दशलक्ष) डॉलर्स एवढा निधी उभा केला आहे. भारतावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बीम्स फिनटेक फंडने या फेरीचे नेतृत्व केले. तर जपानमधील दिग्गज कंपनी मित्सुबिशी यूएफजे फायनान्शिअल ग्रुप इंक (‘एमयूएफजी’) आणि विमा कंपनी बीएनपी परिबास कार्डिफ या कंपन्या त्यांच्या युरोपातील गुंतवणूक कंपनी युराझिओद्वारे व्यवस्थापित इन्शुअरटेक फंडामार्फत तसेच योगेश महान्सारिया फॅमिली ऑफिसमार्फत नवीन गुंतवणूकदार म्हणून कंपनीमध्ये दाखल झाल्या.
बीम्स फिनटेक फंडाचे व्यवस्थापकीय भागीदार सागर अगरवाल म्हणाले, “इन्शुअरटेक क्षेत्रात बराच काळ घालवलण्यामुळे आम्ही आता भारतातील विमा क्षेत्रातील उत्पादन व वितरणातील आव्हाने ओळखू शकतो. विम्याबाबत सर्वसामान्यांमध्ये पुरेशी जागरूकता नसणे, विश्वासाचा अभाव, चुकीच्या पद्धतीने होणारी विक्री, मर्यादित उपलब्धता, परवडण्याजोग्या पर्यायांचा अभाव या भारतातील विमाक्षेत्रापुढील प्रमुख समस्या आहेत. या जटील क्षेत्रात आम्हाला अंकित अग्रवाल आणि इश बब्बर यांच्या कमालीच्या प्रतिभावान टीमच्या नेतृत्वाखाली चालणारी इन्शुरन्सदेखो ही कंपनी सापडली. त्यांनी विमा सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहेच, शिवाय, लक्षावधी भारतीयांमधील विश्वास वृद्धिंगत करण्याचा व त्यांना मन:शांती पुरवण्याचा उद्देशही यामागे आहे. भारतातील वैविध्यपूर्ण व वाढत असलेल्या विमा बाजारपेठेत संरक्षण व आर्थिक सुरक्षितता हे घटक सर्वोच्च महत्त्वाचे आहेत. या बाजारपेठेत वाढीची संभाव्यता अमाप आहे आणि इन्शुरन्सदेखो या संधीचा लाभ घेण्यासाठी एक दमदार प्लॅटफॉर्म उभा करत आहे.”