maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बीएलएस ई-सर्व्हिसेसची कोटक महिंद्रा बँकसह भागीदारी

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३: बीएलएस इंटरनॅशनलची उपकंपनी असलेल्या बीएलएस ई-सर्व्हिसेसने भारतभरात वित्तीय सेवांचा विस्तार करण्याच्या आपल्या मोहिमेतील एक लक्षणीय टप्पा गाठल्याची घोषणा केली आहे. कंपनीने भारताच्या काही प्रमुख बँकिंग संस्थांपैकी एक कोटक महिंद्राबरोबर मास्टर बिझनेस करस्पॉन्डन्ट अॅग्रीमेंट केले आहे. ही परिवर्तनकारी भागीदारी वित्तीय परिदृश्याची नव्याने व्याख्या करण्यासाठी व समावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यास सज्ज आहे.

३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेले व एका अतिरिक्त वर्षाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता असलेले हे मास्टर बिझनेस करस्पॉन्डन्ट अॅग्रीमेंट बँकिंग तुटपुंज्या प्रमाणात मिळणाऱ्या व या सेवा कधीही न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत सहज आणि परवडणाऱ्या दरांत पोहोचविण्याप्रती बीएलएस- ई-सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा दोहोंनीही जपलेली बांधिलकी अधिकच दृढ करणारे आहे.

या आर्थिक समावेशकतेबद्दलचा हा सर्वांगीण दृष्टिकोन सुरुवातीला पंजाब, हरयाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील १००० धोरणात्मकरित्या निवडेल्या ठिकाणी राबविला जाईल, ज्यामुळे या ठिकाणाच्या आर्थिक सक्षमीकरणास व वाढीस खतपाणी मिळेल.

बीएलएस – ई सर्व्हिसेसचे चेअरमन शिखर अग्रवाल म्हणाले, “कोटक महिंद्राबरोबर केलेली आमची नवी वाट दाखविणारी भागीदारी म्हणजे आर्थिक समावेशकतेच्या प्रांतातील एका क्रांतीकारी अध्यायाची नांदी आहे. एकत्रितपणे आम्ही सीमारेषा पार करण्याच्या आणि आपल्या थोर देशाच्या दुर्गमातिदुर्गम भागातही बँकिंग सेवेचे क्षेत्र घेऊन जाण्याच्या मोहिमेची सुरुवात करत आहोत. प्रत्येक भारतीयाला, मग तो कुठल्याही ठिकाणचा वा कोणतीही पार्श्वभूमी का असेना, त्याला एक संपन्न आणि सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी आवश्यक ती वित्तीय साधने प्राप्त करण्याची संधी आवर्जून मिळावी याची खबरदारी आम्ही आमच्या दृढ बांधिलकीद्वारे घेत आहोत. ही केवळ एक भागीदारी नव्हे; तर परिवर्तनकारी बदलास उत्प्रेरणा देणारे एक साधन आहे, सक्षमीकरणाचे माध्यम आहे आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सर्वसमावेशक भारताच्या आमच्या सामायिक स्वप्नाचे मूर्तीमंत उदाहरण आहे.”

व्यक्ती, व्यापारी संस्था आणि सरकारी विभाग व संस्थांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या वित्तीय सेवांचा संपूर्ण आवाका बीएलएस – ई सर्व्हिसेस आणि कोटक महिंद्रा बँक यांच्यातील मास्टर बिझनेस करस्पॉन्डन्ट अॅग्रीमेंटच्या कक्षेमध्ये येतो. या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत बीएलएस ई-सर्व्हिसेसद्वारे व्यक्तींसाठी सेव्हिंग खाती आणि चालू खाती तसेच सरकारी आणि संस्थात्मक विशेष खाती यांसह इतर बँकिंग उपाययोजनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देईल.

Related posts

फ्लिपकार्टचा वार्षिक इव्‍हेण्‍ट ‘द बिग बिलियन डेज’ आता क्‍लीअरट्रिपवर देखील उपलब्‍ध असणार

Shivani Shetty

इझमायट्रिपचा एचएनआयसाठी सबस्क्रिप्‍शन प्रोग्राम

Shivani Shetty

IRM एनर्जी लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर बुधवार, 18 ऑक्टोबर, 2023 रोजी सुरू होणार आहे, किंमत बँड ₹480 ते ₹505 प्रति इक्विटी शेअर सेट केला आहे.

Shivani Shetty

Leave a Comment