maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

पेटीएमने यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित केले

मुंबई, १९ मे २०२४: भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएम आता यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित करत आहे. कमी मूल्याच्या दैनंदिन पेमेंट्ससाठी वॉलेटला पसंती देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे. पेटीएम यूपीआय लाइट ऑन-डिव्हाइस वॉलेटप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे वापरकर्ते यावर पैसे जमा करून ठेवू शकतात आणि झटपट पेमेंट करू शकतात. पिनची गरज नसल्याने पेमेंट्स विजेच्या वेगाने होतात आणि कधीच असफल ठरत नाहीत. यात वापरकर्त्यांना दिवसातून दोनदा २,००० रुपयांपर्यंत रक्कम वॉलेटमध्ये भरण्याची लवचिकता आहे. त्यामुळे दिवसभरात भरली जाणारी एकूण रक्कम ४,००० रुपयांपर्यंत जाते.

पेटीएमचे यूपीआय लाइट वॉलेट जलद, सुरक्षित व खात्रीशीर पेमेंट्सच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ५०० रुपयांपर्यंतची पेमेंट्स तत्काळ तसेच अपयशी न ठरणाऱ्या व्यवहाराद्वारे करण्याची मुभा मिळते. किराणा मालाची खरेदी, पार्किंग शुल्क भरणे किंवा प्रवासाचे भाडे चुकते करणे अशी छोटी पेमेंट्स वारंवार करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सेवा विशेषतत्वाने उपयुक्त आहे. यात कितीही पेमेंट्स केली तरी एण्ट्री एकदाच होत असल्यामुळे बँक स्टेटमेंट सुटसुटीत राहते. आर्थिक नोंदी सुटसुटीत ठेवण्यास प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांच्या दृष्टीने हे अत्यंत सोयीस्कर आहे. अशा शिस्तबद्ध पद्धतीमुळे वापरकर्त्यांना बँकेच्या पासबुकमध्ये असंख्य एण्ट्रीजची कटकट न लावून घेता छोटे दैनंदिन खर्च कार्यक्षमतेने करता येतात. यात पेमेंटसाठी पिनची गरज नसते. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुटसुटीत व सुलभ होतात.

पेटीएम अॅपवर यूपीआय लाइट पेमेंट्स एनेबल करण्याच्या पायऱ्या

१. पेटीएम अॅपवर जा आणि होमपेजवरील ‘यूपीआय लाइट अॅक्टिव्हेटआयकॉनवर क्लिक करा

२. तुम्हाला यूपीआय लाइटसोबत वापरायचे असलेले बँकखाते निवडा

३. पेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला यूपीआय लाइटवर जी रक्कम जमा करायची आहे, ती भरा

४. यूपीआय लाइट खाते तयार करण्यासाठी एमपीआयएनची पडताळणी करा

५. सुलभ व वन-टॅप पेमेंट्ससाठी तुमचे यूपीआय लाइट खाते तयार झाले आहे

त्यापुढे यूपीआय लाइट वॉलेट वापरून पेमेंट्स करण्यासाठी कोणताही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करा किंवा मोबाइल क्रमांक भरा किंवा फोनच्या कॉण्टॅक्ट यादीतून इच्छित क्रमांक निवडा. वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) आणि अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि येस बँक यांच्यासारख्या आघाडीच्या पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर्समधील (पीएसपी) सहयोगामुळे तुमच्या यूपीआय व्यवहारांसाठी एक ठोस व खात्रीशीर चौकट मिळते आणि वापरकर्त्यांना पेमेंटचा अखंड व सुरळीत अनुभव मिळवून देण्यात मदत होते.

Related posts

इझमायट्रिपचा लीप इअर ट्रॅव्‍हल सेल लाँच

Shivani Shetty

डिजिकोअर स्टुडिओजद्वारे एंजल इन्व्हेस्टमेन्ट शो ‘इंडियन एंजल्स’ची घोषणा

Shivani Shetty

आशिया कस्टमर एंगेजमेंट फोरम’ चे दोन पुरस्कार माइंड वॉर्सने पटकावले

Shivani Shetty

Leave a Comment