maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हिएतजेटकडून भारतातील नेटवर्कमध्‍ये वाढ; अहमदाबाद ते दा नांगपर्यंत नवीन विमानमार्ग लाँच

मुंबई, १ ऑगस्‍ट २०२४) – नवी दिल्‍लीमधील व्हिएतनाम-भारत बिझनेस फोरममध्‍ये व्हिएतजेट या व्हिएतनाममधील आघाडीच्‍या आधुनिक एअरलाइनने भारतातील अहमदाबाद ते व्हिएतनाममधील दा नांग यांना कनेक्‍ट करणाऱ्या नवीन विमानमार्गाच्‍या लाचची घोषणा केली. नवीन मार्गाच्‍या कार्यसंचालनाला ऑक्‍टोबर २०२४ मध्‍ये सुरूवात होईल.

तसेच, व्हिएतनामचे पंतप्रधान फॅम मिन्‍ह चिन्‍ह यांच्‍यासह दोन्‍ही देशांमधील व्‍यवसाय समुदायाने २०० दशलक्ष प्रवाशांचा टप्‍पा गाठण्‍यासाठी व्हिएतजेटचे अभिनंदन केले. व्हिएतजेटचे २०० दशलक्षवे प्रवासी भारतीय उद्योगपती श्री. संदीप मेहता होते, ज्‍यांना व्हिएतजेटकडून ऑपरेट केल्‍या जाणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्समधून एक वर्ष मोफत प्रवास करण्‍याचे गिफ्ट मिळाले.  

या टप्‍प्‍याला साजरे करण्‍यासाठी एअरलाइन २ ऑगस्‍ट ते ८ ऑगस्‍ट २०२४ पर्यंत आठवडाभर प्रमोशन ला करत आहे, ज्‍याअंतर्गत सर्व देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय मार्गांसाठी ५,५५५ रूपयांपासून (*) सुरू होणाऱ्या २ दशलक्ष तिकिटे ऑफर करण्‍यात येत आहे. ही सवलतीची तिकिटे ४ सप्‍टेंबर २०२४ ते २२ मे २०२५ दरम्‍यान प्रवासासाठी www.vietjetair.com आणि व्हिएतजेट एअर मोबाइल अॅपवर उपलब्‍ध असतील(**).    

व्हिएतजेट व्‍यावसायिक, मैत्रीपूर्ण व समर्पित केबिन टीमकडून सेवा दिल्‍या जाणाऱ्या त्‍यांच्‍या आधुनिक एअरक्राफ्टमध्‍ये प्रवाशांचे स्‍वागत करते, जेथे ते व्हिएतनामी, भारतीय व जागतिक पाककलांचा आस्‍वाद घेऊ शकतात. तसेच, व्हिएतजेट सर्व प्रवाशांना मोफत स्‍कायकेअर विमा आणि व्हिएतजेटचा लॉयल्‍टी उपक्रम स्‍कायजॉयच्‍या माध्‍यमातून रिवॉर्डस् जिंकण्‍याच्‍या व ‘विन डेअली’च्‍या अनेक संधी देते.

२०१९ पासून व्हिएतजेट व्हिएतनाम आणि भारतदरम्‍यान थेट फ्लाइट मार्ग स्‍थापित करण्‍यामध्‍ये अग्रणी एअरलाइन आहे, जी सोईस्‍कर व परवडणारे प्रवास पर्याय देत आहे. एअरलाइन आता ५६ साप्‍ताहिक फ्लाइट्ससह सात मार्गांवर कार्यरत आहे, जेथे हनोई आणि हो ची मिन्‍ह सिटीला भारतातील प्रमुख शहरे जसे नवी दिल्‍ली, मुंबई, अहमदाबाद व कोची, तसेच लोकप्रिय गंतव्‍य जसे बोध गया व वाराणसी यांच्‍याशी कनेक्‍ट करते. व्हिएतजेटने व्हिएतनाम व भारत दरम्‍यान जवळपास १.३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आहे, तसेच १.४ बिलियन लोकसंख्‍या असलेल्‍या देशाला सेवा देत आहे.  

(*)एकमार्गी सर्वसमावेशक

(**)राष्‍ट्रीय सुट्ट्या वगळून

Related posts

वर्ल्ड प्रोटिन डे’ निमित्त मुंबईकरांसाठी जेवणाच्या डब्यासोबत फॉर्च्युन सोया चंक्सतर्फे खास सरप्राइज फॉर्च्युन सोयाची मुंबई डबेवाल्यांसोबत भागिदारी

Shivani Shetty

भारतीयांसाठी आजही रिअल इस्‍टेट गुंतवणूकीसाठी पसंतीचा मालमत्तावर्ग: हाऊसिंगडॉटकॉम

Shivani Shetty

PURE EV ने 201 KM रेंजसह ePluto 7G MAX लाँन्च

Shivani Shetty

Leave a Comment