मुंबई, १७ मे २०२४: भारतातील आघाडीची एकीकृत पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.ने आज ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या आर्थिक निकालांची घोषणा केली.
कंपनीच्या एकत्रित महसूलात गतवर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १०.२ टक्क्यांची वाढ झाली असून महसूल १०७८९ दशलक्ष रुपये झाला आहे. कंपनीचा ईबीआयडीटीए १२.८ टक्क्यांनी वाढून १४३६ दशलक्ष रुपये झाला आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५.४ टक्क्यांच्या वाढीसह १०३३ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीच्या स्वतंत्र महसूलात गतवर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ७.२ टक्क्यांची वाढ झाली असून महसूल ९५३९ दशलक्ष रुपये झाला आहे. कंपनीचा ईबीआयडीटीए १.१ टक्क्यांनी वाढून ११७३ दशलक्ष रुपये झाला आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १०.७ टक्क्यांच्या वाढीसह ८२० दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत अग्रवाल म्हणाले की, टीसीआयने उत्तम कामगिरी केली आहे, ज्याचे श्रेय ऑटोमोबाइल्स, इंजीनिअरिंग, टेम्परेचर-सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट्स अशा प्रमुख विभागांमधील वाढीला, तसेच आधुनिक व्हर्टिकल्समधील उदयोन्मुख विकासांना जाते. ३पीएल, वेअरहाऊसिंग, इनबाऊंड-आऊटबाऊंड लॉजिस्टिक्स, क्रॉस-बॉर्डर, रेल आणि कोस्टल मल्टीमोडल सोल्यूशन्स अशा आमच्या बहुतांश सेवांसाठी नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात प्रबळ पाइपलाइनसह झाली आहे. यामधून आमचे क्लायण्ट्स टीसीआयला त्यांची पसंतीची लॉजिस्टिक्स सहयोगी मानत असल्याचे दिसून येते.”
श्री. विनीत अग्रवाल पुढे म्हणाले “आम्ही ईव्ही आणि एलएनजी सारख्या पर्यायी इंधनांचा अवलंब करत सस्टेनेबिलिटी क्षेत्रात सोल्यूशन्स निर्माण करत आहोत. तसेच, टीसीआय-आयआयएमबी सप्लाय चेन सस्टेनेबिलिटी लॅबने आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला, तसेच उद्योगाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ईएसजी पद्धतींना प्रगत करण्याप्रती टीमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करत आहे. कंपनीची नाविन्यता व सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धता त्यांच्या डिजिटल उपक्रमांमधून दिसून येते, ज्यांचा सानुकूल सोल्यूशन्ससह व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, कंट्रोल टॉवर, यूएलआयपी व ओएनडीसीसोबत सहयोग इत्यादी प्रदान करण्याचा मनसुबा आहे. आम्ही आमच्या सर्व ग्राहक व इतर भागधारकांसोबत सर्वोत्तम परस्परसंवादासाठी नुकतेच आमची नवीन वेबसाइट लाँच केली आहे. अधिक पुढे जात निवडणूक-नंतरच्या काळामध्ये आम्हाला आमच्या कामगिरीमध्ये प्रबळ सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.”