maharashtraprimenews
ठळक बातम्या
चित्रपटठळक बातम्याबॉलीवूड

पठाणकरिता जॉन आमची पहिली आणि एकमेव पसंती होती!’ : सिद्धार्थ आनंद

पठाणच्या टीझरमध्ये जॉन अब्राहमने प्रत्येकाला थक्क केलं आहे, त्यात तो शाहरूख खानच्या हाडवैऱ्याची भूमिका करत असल्याचे उघड झालं! जॉनला एका अतिशय हटके अवतारात सादर करण्यात आले आहे, हा खलनायक कठोर निर्दयी असून शत्रूच्या संपूर्ण नाशाची इच्छा ठेवणारा आहे. केवळ जॉनच मोठ्या ताकदीने ही भूमिका साकारू शकतो आणि त्याने पठाणसाठी होकार कळविल्यावर आपण रोमांचित झाल्याचं सिद्धार्थने सांगितलं!

सिद्धार्थ म्हणाला, “पठाणला लार्जर दॅन लाईफ बनवण्यासाठी, आम्हाला त्याच तोडीचा सशक्त खलनायक पाहिजे होता. जो चुकीला माफ करणारा नसेल आणि स्क्रीनवरची अदाकारी सौम्य तरीही दिलखेच झाली पाहिजे! त्यामुळे जॉन अब्राहम डोक्यात ठेवूनच पठाणमधील खलनायक उभा केला.”

तो पुढे माहिती देतो, “तोच (जॉन अब्राहम) आमची पहिली आणि पसंती होता, आणि आम्हाला भूमिका अजरामर करणारा खलनायक पाहिजे होता. शाहरूख खानला रक्तबंबाळ करणारा, नसानसांत प्रतिशोधाचा निखार असलेल्या जॉनला चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आनंद वाटतो. त्याची व्यक्तिरेखा शक्य त्या अंगाने अद्भूत ठरली आहे. स्क्रीनवर पठाणच्या विरुद्ध उभा असलेला जॉन शोभून दिसतो आणि आम्ही त्यांचा प्रतिस्पर्धी ‘लूक’ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा केला आहे. दोन व्यक्तिरेखांमधील विखाराची ज्वाला भलतीच रंगणार आहे.”

पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमीळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

Related posts

डीबीएस शस्त्रक्रियेनंतर येमेनच्या तरुणीला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागले*

Shivani Shetty

बिग बॉस फेम अर्शी खान, पंकज बेरी स्टारर दुष्यंत प्रताप सिंग यांच्या “त्राहिमम” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Shivani Shetty

YRF लाँच करणार पुढचा मोठा सिंगिग सुपरस्टार – भजन कुमार!

Shivani Shetty

Leave a Comment