maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची ५वी आवृत्ती सादर केली

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३: वझीरएक्स ने आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर असा प्लॅटफॉर्म राखण्याच्या दृष्टीने आपले उपक्रम प्रदर्शित करण्यासाठी, त्यांचा 5 वा पारदर्शकता अहवाल जारी केला. जागतिक स्तरावर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींसोबत १००% अनुपालन करण्याच्या त्यांच्या सततच्या रेकॉर्ड व्यतिरिक्त, त्यांनी आपल्या व्यासपीठावर व्यापार आणि गुंतवणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये जारी केली आहेत. अहवालात समाविष्ट केलेल्या घडामोडी या एप्रिल २०२३ आणि सप्टेंबर २०२३ दरम्यान घडलेल्या आहेत. नियामक आणि अन्य सरकारी संस्थांकडून माहितीसाठीच्या विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी लागलेला सरासरी टर्नअराउंड कालावधी पहिल्या प्राथमिक प्रतिसादासाठी २२ मिनिटे होता.

वझीरएक्सचे अनुपालन प्रमुख, मुथुस्वामी एन अय्यर म्हणाले, “जागतिक स्तरावर अनेक उपक्रमांबाबत विचार होत असण्यादरम्यान, नियामक संस्थांसोबत सहकार्य करण्याचा आणि व्यस्त राहण्याचा आमचा यशाचा दर कायम राखल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. क्रिप्टो परिसंस्थेतील प्रमुख नियामक प्रयत्नांच्या दिशेने भारत सरकारने काही मोठी पावले उचलली त्याचे आम्ही साक्षीदार आहोत आणि अशा वातावरणात, आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अनुपालन उपक्रमांचे पूर्ण पालन सुनिश्चित केले.”

या कालावधीत वझीरएक्सने ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे आपली वैशिष्ट्ये सुधारणे सुरू ठेवले. वापरकर्त्यांसाठी केवायसी इतिहास वैशिष्ट्य सुरु केले. या वैशिष्ट्यामुळे, वापरकर्त्याचे केवायसी सत्यापित होण्यापूर्वी /नाकारले जाण्यापूर्वी वापरकर्त्याने केलेल्या सर्व हालचालींचा मागोवा घेणे शक्य होईल. स्टेटसमधील प्रत्येक बदलाचा मागोवा घेतला जाईल, रेकॉर्ड केला जाईल आणि सखोल तपासणी करण्यासाठी तो बदल आमच्या केवायसी आणि अनुपालन टीमला उपलब्ध असेल. वापरकर्त्यांना सदर अॅपची नवीनतम अद्यतने आणि सुधारणा यांच्याविषयी माहिती देण्यासाठी ‘नवीन काय आहे’ पॉपअप सुरु केले.

‘सर्वाधिक सक्रिय’ विभाग सुरु केला, जो मागील २ तासांमधील व्यापाराचे प्रमाण आणि बदलती किंमत या दोन्हींच्या आधारे, व्यासपीठावर ८ सर्वात सक्रिय आयएनआर बाजार दर्शवितो. अॅपवर कॉइन मेटाडेटा माहिती सादर केली जी व्यापाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना आवश्यक टोकन माहिती मिळविण्यात मदत करेल, अशाप्रकारे डीवायओआर (स्वतः संशोधन करा-डू युवर ओन रिसर्च) ची सुविधा प्रदान करेल आणि त्यासाठी प्रोत्साहन देईल. सर्व वापरकर्त्यांना १० दिवसांपूर्वीच्या नवीनतम सूचींबद्दल अद्यतनित केले जात आहे हे सुनिश्चित करण्यासाठी मुख्यपृष्ठावर ‘नवीन सूची’विभाग जोडला.

 

Related posts

इझमायट्रिपची कॉर्पोरेट ग्राहकांसाठी विशेष ऑफर

Shivani Shetty

लिंक्‍डइनने भारतातील नवीन पदवीधरांसाठी झपाट्याने वाढत असलेले रोजगार, कार्य व उद्योगांना निदर्शनास आणले

Shivani Shetty

हाऊसिंगडॉटकॉम इझीलोनमध्‍ये गुंतवणूक करणार

Shivani Shetty

Leave a Comment