maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

‘आम्‍ही पेटीएम सोडत नाही आहोत’ असे बिबा, हॉटस्‍पॉट रिटेल प्रा. लि. आणि अरविंद लिमिटेड यांसारखे कंपनीचे सर्वात मोठे मर्चंट्स म्‍हणाले; सर्वोत्तम पेमेंट्ससाठी कंपनीवरील विश्‍वास कायम

रिटेलपासून मनोरंजनापर्यंत विविध क्षेत्रांमधील आघाडीच्‍या उद्योग कंपन्‍या पेटीएमच्‍या नाविन्‍यपूर्ण पेमेंट सोल्‍यूशन्‍सचा अवलंब करतात, ज्‍यामधून विश्‍वसनीय पेमेंट सहयोगी म्‍हणून पेटीएमचा दर्जा अधिक दृढ झाला आहे. टॉप ब्रॅण्‍ड्स जसे अरविंद लिमिटेड स्‍मॅश (Smaaash), बिबा आणि पेटीएम उत्‍पादनांचे दीर्घकाळापासून वापरकर्ते असलेल्‍या इतर ब्रॅण्‍ड्सनी कंपनीच्‍या सर्वोत्तम सेवांसाठी कंपनीप्रती पाठिंबा व्‍यक्‍त केला आहे, ज्‍यामधून पेमेंट्समध्‍ये कोणतेही अडथळे न येण्‍याची खात्री मिळते आणि पेटीएम अधिकाधिक प्रबळ होण्‍याची अपेक्षा आहे.

देशभरातील मर्चंट्स पेटीएमला त्‍यांच्‍या पेटीएम सेवांसाठी पाठिंबा देत आहेत, जेथे पेटीएम पेमेंट गेटवे सेवेवर कोणताच परिणाम झालेला नाही आणि ऑनलाइन पेमेंट ऑफरिंग्‍ज जसे पेटीएम क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व कार्ड मशिन कार्यरत आहेत. व्‍यवसायांच्‍या मते, ते सोईस्‍कर व प्रभावी पेमेंट अनुभवासाठी पेटीएमवर अवलंबून आहेत आणि कंपनीच्‍या भविष्‍याबाबत आशावादी आहेत.

पेटीएमच्‍या नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांवर विश्‍वास आणि समाधान व्‍यक्‍त करत हॉटस्‍पॉट रिटेल प्रायव्‍हेट लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सत्‍या एन सत्‍येंद्र म्‍हणाले, ”आम्‍ही दोन वर्षांपासून पेटीएमसोबत काम करत आहोत आणि ते नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने व सेवांसंदर्भात नेहमीच अग्रस्‍थानी राहिलो आहोत. मी सर्वांना पूर्वीप्रमाणे पेटीएम सेवांचा वापर करत राहण्‍याची ठामपणे शिफारस करतो.”

अद्वैत ह्युंदाईमधील रामा कृष्‍णा यांनी डेबिट व क्रेडिट कार्ड पेमेंट्ससाठी विश्‍वसनीय सहयोगी म्‍हणून पेटीएमचे कौतुक केले, तसेच नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या नियामक निर्देशांनंतर देखील सेवा विनाव्‍यत्‍यय सुरू राहण्‍याचे सांगितले.
आघाडीच्‍या कंपन्‍यांनी पेटीएमच्‍या दीर्घकालीन वापराबाबत समाधान व्‍यक्‍त केले, तसेच पेटीएमच्‍या पेमेंट उत्‍पादनांचा फायदा घेत राहण्‍याच्‍या योजनांबाबत सांगितले. ”एफईसी (फॅमिली एंटरटेन्‍मेंट सेंटर) ब्रॅण्‍ड म्‍हणून आम्‍ही पेटीएमचे नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स जसे क्‍यूआर व कार्ड मशिन्‍सचा उपयोग करत आहोत, तसेच आमच्‍या विक्री व विपणन प्रक्रियेमध्‍ये त्‍यांचा एकसंधीपणे समावेश करत आहोत. ब्रॅण्‍ड म्‍हणून आम्‍हाला पेटीएमकडून परिपूर्ण पाठिंबा मिळाला आहे आणि आम्‍ही त्‍यांच्‍या सेवांबाबत अत्‍यंत समाधानी आहोत,” असे स्‍मॅश (Smaaash) चे कन्‍सल्टिंग चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनिश अग्रवाल म्‍हणाले.

दरम्‍यान केल्विन केन, टॉमी हायफिगर, अॅरो आणि यू.एस.पोलो यांसारख्‍या ब्रॅण्‍ड्सचे कार्यसंचालन पाहणारा ब्रॅण्‍ड अरविंद लिमिटेडचे कार्यकारी संचालक कुलिन लालभाई यांनी त्‍यांच्‍या स्‍टोअर फॉर्मेट्समधील पेमेंट्सना पेटीएम क्‍यूआरने दिलेल्‍या सुविधेबाबत सांगितले. तसेच, पेटीएमच्‍या अग्रणी उत्पादनांनी पेमेंट्स उद्योगामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणला असून सोयीसुविधा व नाविन्‍यतेसाठी नवीन मानक स्‍थापित करत आहेत.

पेटीएमच्‍या अग्रणी उत्‍पादनांनी पेमेंट उद्योगामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, तसेच मर्चंट्सना त्‍वरित पेमेंट, विश्‍वसनीयतेसह सुलभपणे व्‍यवसाय करण्‍याची खात्री देत आहे आणि पेमेंट्स कधीच अयशस्‍वी ठरत नाहीत.

तसेच, टॉप कंपन्‍यांनी पेटीएमच्‍या दीर्घकालीन वापराबाबत समाधान व्‍यक्‍त केले आणि पेटीएमच्‍या पेमेंट उत्‍पादनांचा फायदा घेत राहण्‍याच्‍या त्‍यांच्‍या योजना आहेत.

याबाबत मत व्‍यक्‍त करत बिबा फॅशनचे पंकज मणियार म्‍हणाले, ”आमचा बिबा स्‍टोअर पेटीएमच्‍या प्रतिष्ठित डायनॅमिक क्‍यूआर डिवाईस आणि कार्ड मशिन्‍सवर अवलंबून आहे. यामागील कारण म्‍हणजे या डिवाईसेसच्‍या माध्‍यमातनू पेमेंट्स त्वरित व सुलभपणे होते. पेटीएम आमच्‍या अतिथींचा सर्वात लोकप्रिय व विश्‍वसनीय पेमेंट्स पर्याय असल्‍यामुळे आम्‍हाला सुलभपणे व्‍यवसाय करता येत आहे.”

आव्‍हानात्‍मक स्थितीदरम्‍यान पेटीएमसाठी पाठिंब्‍यामध्‍ये वाढ होत आहे, जेथे बफेलो वाइल्‍ड विंग्‍जचे अरविंद यांनी व्‍यवसाय कार्यसंचालन आणि ग्राहक अवलंबनामध्‍ये पेटीएमच्‍या परिवर्तनात्‍मक प्रभावाबाबत प्रबळ मत व्‍यक्‍त केले आहे. यामुळे भारतातील फिनटेक क्रांतीमध्‍ये पेटीएमचा दर्जा अधिक दृढ झाला आहे.

उद्योग प्रमुखांकडून या उल्‍लेखनीय पाठिंब्‍यामधून पेटीएमची डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्‍यामधील महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते आणि भारतभरातील व्‍यवसायांसाठी विश्‍वसनीय पेमेंट सहयोगी म्‍हणून पेटीएमचे स्‍थान अधिक दृढ होते.

Related posts

हिरो मोटोकॉर्पच्‍या करिझ्मा एक्‍सएमआरला मिळाला १३,६८८ बुकिंग्‍जचा प्रतिसाद

Shivani Shetty

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Shivani Shetty

फिजिक्‍सवालाची भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० लाख रूपयांच्‍या स्‍कॉलरशिपची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment