मुंबई, २९ मार्च २०२४: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या शाश्वत शहरी गतीशीलतेमधील आघाडीच्या कंपनीला नवीन इनोव्हेशन इब्लू फिओ एक्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगामी लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. इको-फ्रेण्डली व कार्यक्षम परिवहन सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती कटिबद्धतेच्या माध्यमातून गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स इब्लू फिओ एक्ससह इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे.
इब्लू फिओ एक्स राइडर्सना अद्वितीय कार्यक्षमता, आरामदायीपणा व स्टाइल देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी राइडर्सच्या विविध गरजा व पसंतींची पूर्तता करते. शक्तिशाली २.३६ केडब्ल्यू लि-आयन बॅटरी असलेली इब्लू फिओ एक्स ११० एनएमचा सर्वोच्च टॉर्क निर्माण करते, ज्यामधून रोमांचक राइडिंग अनुभवासाठी प्रबळ शक्ती मिळते. इकॉनॉमी, नॉर्मल व पॉवर या तीन ड्रायव्हिंग मोड्ससह राइडर्स त्यांच्या ड्रायव्हिंग स्टाइलनुसार राइडिंग अनुभवामध्ये सानुकूल बदल करू शकतात, तसेच एका चार्जमध्ये ११० किमी अंतरापर्यंत प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. या स्कूटरमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील आहे, ज्यामुळे बॅटरीवरील ताण कमी होतो आणि ड्रायव्हिंग रेंज वाढते.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्हणाले, ”आम्हाला आमच्या लाइनअपमधील नवीन वेईकल इब्लू फिओ एक्सचे अनावरण करण्याचा आनंद होत आहे. आमच्या बहुमूल्य इब्लू फिओला ग्राहकांकडून मिळालेल्या बहुमूल्य अभिप्रायाचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आम्हाला त्यांची इच्छा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करणारे उत्पादन सादर करण्याचा अभिमान वाटत आहे.”
इब्लू फिओ एक्समध्ये अद्वितीय राइडिंग अनुभव देण्याचा मनसुबा असलेल्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. वाढवण्यात आलेले बूट स्पेस ते उच्चस्तरीय आरामदायीपणा, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये ते सुधारित स्थिरतेपर्यंत फिओ एक्समधील ‘एक्स’ एक्स्ट्राचे प्रतीक आहे. ही स्कूटर इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात संस्मरणीय अनुभव देते, तसेच उल्लेखनीय कार्यक्षमतेसह राइडर्सना उत्तम आरामदायीपणा व सोयीसुविधा देते.
आतील बाजूने राइडर्सना आरामदायीपणा व सोयीसुविधेसाठी डिझाइन केलेली अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील, जसे २८ लिटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेली सीट, नेव्हिगेशनसाठी ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आणि गॅस सिलिंडर सहजपणे वाहून नेता येण्यासाठी व्यापक फ्लोअरबोर्ड एैसपैस जागा. इब्लू फिओ एक्समध्ये मोबाइल चार्जिंग पॉइण्ट देखील आहे, ज्यामुळे राइडर्स राइडिंगचा आनंद घेण्यासह त्यांचे डिवाईसेस चार्ज करू शकतात. ७.४-इंच डिजिटल फुल-कलर डिस्प्ले आवश्यक वेईकल माहिती देते.
इब्लू फिओ एक्सला सोईस्करपणे व कार्यक्षमपणे चार्ज करता येते. या वेईकलसोबत ६० व्होल्ट क्षमता असलेला होम चार्जर येतो आणि फक्त ५ तास २५ मिनिटांमध्ये वेईकल संपूर्ण चार्ज होते. तसेच, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सला ३ वर्ष व ३०,००० किमीची सर्वसमावेशक वॉरंटी देण्याचा अभिमान वाटत आहे, ज्यामधून ग्राहकांना समाधान मिळते.