मुंबई, २० नोव्हेंबर, २०२४ : शिक्षकांच्या सन्मानासाठी हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम डॉ. विशाल कडणे यांनी आयोजित केला आहे. असे अनेक सामाजिक कार्यक्रम विशाल नेहमी करत असतात, त्यांचे यात खूप चांगले योगदान आहे. त्यांनी असेच सामाजिक कार्य करत राहावे,” असे कौतुक भाजपचे विधानसभेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी केले.
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:०० वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे राज्यस्तरीय शिक्षक स्नेह मेळावा संपन्न झाला. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विशाल कडणे होते. यावेळी आ. दरेकर उपस्तिथ होते.
“हि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हजारो शिक्षक आय इथे हजर होते. त्यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात,त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या कार्यासाठी अनेक दिगज्जांचे मला मार्गदर्शन लाभेल, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे,” असे विशाल कडणे, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणाले.
या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, टीचर ऑफ द ईअर, प्रिन्सिपल ऑफ द ईअर, आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. या मेळाव्यास अंदाजे ११०० हून अधिक शिक्षक उपस्थितहिते होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्मार्टफोनचे दुष्परिणाम आणि घरातील सुसंवाद या चर्चासत्राने झाली. त्यानंतर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि निबंध वाचनाचा कार्यक्रम पार पडला. वर्ष २०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १११ शिक्षकांचा सन्मान देखील मेळाव्यात करण्यात येऊन जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक इत्यादी विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमात आ. निरंजन डावखरे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठी, दै. तरुण भारतचे संपादक किरण शेलार, टीजीएसपी बँकेचे डीजीएम राजीव मिश्रा, मुंबई शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर, लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, सिनेनिर्माते दिलीप जाधव, सोमैया विद्यापीठाचे अधिष्ठाता, डॉ. गजानन रत्नपारखी, ठाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत आणि अनेक मान्यवर उपस्तिथ होते.
- स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा, अक्षरांचा लळा लावणे इत्यादी लोकोपयोगी वृत्तींचा प्रचार करणार्या आजीबाई जोरात नाटकाची टीम शिक्षकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमात आजीबाई जोरातचे टीम सदस्य अभिनेत्री निर्मिती सावंत, सिंघम सिनेमा लेखक क्षितिज पटवर्धन, अभिनेता जयवंत वाडकर हजर होते.