maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नितांशी गोयलला IMDb स्टारमीटर पुरस्कार प्राप्त

मुंबई, भारत—14 मे 2024— जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या सर्वांत व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार लापता लेडीज कलाकार Nitanshi Goel मिळत असल्याची घोषणा केली आहे. ह्या पुरस्कारामध्ये IMDB app वर सर्वाधिक परफॉर्म करणा-या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणा-या 25 कोटीपेक्षा विजिटर्सचे वास्तविक पेज व्ह्यूज लक्षात घेतले जातात व हा निकष करीअरमध्ये कोणता कलाकार ब्रेकथ्रू मूमेंटच्या जवळ आहे, ह्याचे अतिशय अचूक प्रेडीक्शन करणारा ठरला आहे. 16 वर्षांची गोयल ही IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळवणारी आजवरची सर्वांत युवा कलाकार ठरली आहे.

गोयलने किरण रावची विनोदी नाट्य असलेल्या लापता लेडीजमध्ये व अमित रविंदरनाथ शर्मांच्या चरित्रात्मक क्रीडा नाट्य असलेल्या मैदानमध्ये भुमिका केली आहे. एप्रिलमध्ये पूर्वीच्या स्ट्रीमिंग रिलीझनंतर, गोयल तीनदा लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले, ज्यात गेल्या आठवड्यात पहिल्या स्थानावर आणि या आठवड्यात 2 क्रमांकावर पोहोचले. लापता लेडीजला सध्या सर्वोच्च नामांकन असलेल्या भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सध्या 25 वे स्थान प्राप्त आहे व IMDb युजर रेटींग 8.5/10 असे आहे. गोयलने आधी केलेल्या भुमिकांमध्ये एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, थपकी प्यार की, आणि दयान. ह्यांचा समावेश होतो.

“मला IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार दिल्याबद्दल IMDb ला धन्यवाद,” गोयल म्हणाली. “लापता लेडीजसाठी हा माझा पहिला पुरस्कार आहे आणि मला आत्ताच कळाले की, हा पुरस्कार मिळवणारी मी सर्वांत तरुण कलाकार ठरले आहे. मी अजूनही हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करते आहे! हे खरंच स्पेशल आहे, व त्यासाठी‌ IMDb ला धन्यवाद.”

गोयलला पुरस्कार देतानाचा व्हिडिओ इथे पाहा. IMDb युजर्स गोयलच्या चित्रपट यादीतील चित्रपट व इतर शीर्षके www.imdb.com/watchlist इथे त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात.

आधीच्या IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार विजेत्यांमध्ये मेधा शंकर, भुवन अरोरा, अंगीरा धर, आदर्श गौरव, ऍशले पार्क, नताशा भारद्वाज, एयो एदेबिरी आणि रेगे- जाँ पेज ह्यांचा समावेश आहे.
IMDb स्टारमीटर पुरस्कारांबद्दल अधिक माहिती इथे वाचा imdb.com/starmeterawards.

Related posts

द बॉडी शॉपने विशेष फुल फ्लॉवर्स कलेक्‍शन लाँच केले

Shivani Shetty

अपोलो नवी मुंबईने सुरु केले संडे क्लिनिक

Shivani Shetty

सॅमसंगकडून २०२४ क्रिस्‍टल ४के विविड, क्रिस्‍टल ४के व्हिजन प्रो आणि क्रिस्‍टल ४के विविड प्रो टीव्‍ही सिरीज लाँच, किंमत ३२९९० रूपयांपासून

Shivani Shetty

Leave a Comment