maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मुंबईतील विद्यार्थ्‍यांनी सॅमसंग ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ रोडशोमध्‍ये सहभाग घेतला; पर्यावरणासंबंधित समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा

मुंबई,भारत – मे, २०२४: सॅमसंग इंडियाने मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्‍नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्‍हीजेटीआय) येथे रोडशोचे आयोजन केले, जेथे इन्स्टिट्यूटच्‍या इन्‍क्‍यूबेटरमधील इंजीनिअरिंग विद्यार्थ्‍यांनी जगभरातील प्रचलित समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोमध्‍ये सहभाग घेण्‍याचा त्‍यांचा हेतू दाखवला. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो ही राष्‍ट्रीय शैक्षणिक व नाविन्‍यपूर्ण स्‍पर्धा आहे, जिचा देशाच्‍या भावी पिढीमध्‍ये नाविन्‍यपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण संस्‍कृती बिंबवण्‍याचा मनसुबा आहे.
विद्यार्थ्‍यांनी पुढाकार घेऊन कचरा व्‍यवस्‍थापन आणि ऊर्जास्रोत म्‍हणून पर्यायी कच्‍च्या मालाचा वापर यांसारख्‍या वास्‍तविक विश्‍वामधील समस्‍यांचे निराकरण करण्‍याप्रती कटिबद्धता दाखवली. ते म्‍हणाले की त्‍यांना सॅमसंगच्‍या ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ सारख्‍या प्‍लॅटफॉर्मची आवश्‍यकता आहे, जे त्‍यांना त्‍यांच्‍या संकल्‍पनांना प्रत्‍यक्षात आणण्‍यास आणि व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासाठी मदत करण्‍यासाठी मार्गदर्शन व पाठिंबा देऊ शकते.
AiRTHच्‍या नाविन्‍यपूर्ण एअर प्‍युरिफिकेशन उत्‍पादनांच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला श्‍वासोच्‍छ्वासासाठी शुद्ध हवा मिळवून देण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडवून आणत असलेले AiRTH चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रवी कौशिक यांनी विद्यार्थ्‍यांची भेट घेतली आणि AiRTH ची निर्मिती करण्‍यासह त्‍यांच्‍या यशोगाथा व सामना केलेल्‍या आव्‍हानांना सांगितले. त्‍यांनी विद्यार्थ्‍यांना वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांचा विचार करण्‍यास देखील प्रेरित केले.
सॅमसंगने ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’च्‍या तिसऱ्या सीझनसाठी नुकतेच मिनिस्‍ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (एमईआयटीवाय)चे स्‍टार्टअप हब आणि फाऊंडेशन फॉर इनोव्‍हेशन अँड टेक्‍नॉलॉजी ट्रान्‍सफर (एफआयटीटी), आयआयटी दिल्‍ली यांच्‍यासोबत सहयोगाची घोषणा केली आहे.
यंदा ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ उपक्रमाने दोन विशिष्‍ट ट्रॅक्‍स – स्‍कूल ट्रॅक व युथ ट्रॅक सादर केले आहेत. हे प्रत्‍येक ट्रॅक विशिष्‍ट थीमला चालना देण्‍याप्रती समर्पित आहेत आणि विविध वयोगटातील व्‍यक्‍तींवर लक्ष्‍य करतात. दोन्‍ही ट्रॅक्‍स एकाच वेळी राबवण्‍यात येतील, ज्‍यामधून सर्व विद्यार्थ्‍यांना समान संधी व समान खेळाच्या मैदानाची खात्री मिळेल.
स्‍कूल ट्रॅक १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो ‘कम्‍युनिटी अँड इन्‍क्‍लुजन’ थीमवर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक वंचित समूहांची प्रगती करण्‍याचे, सामाजिक नवोन्‍मेष्‍कारांच्‍या माध्‍यमातून सर्वांना आरोग्‍य व सामाजिक सर्वसमावेशकता उपलब्‍ध करून देण्‍याचे महत्त्व सादर करतो, म्‍हणून ‘सॉल्‍व्‍हींग फॉर इंडिया’ आहे.
दुसरीकडे, युथ ट्रॅक १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींवर लक्ष्‍य करण्‍यासह थीम ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड सस्‍टेनेबिलिटी’वर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यासाठी व शाश्‍वततेला चालना देण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना महत्त्व देतो, म्‍हणून ‘सॉल्‍व्‍हींग फॉर वर्ल्‍ड’ आहे.
तरूण व्‍यक्‍त्ती ९ एप्रिल २०२४ पासून ३१ मे २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत www.samsung.com/in/solvefortomorrow या वेबसाइटवर सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करू शकतात.

Related posts

बीएलएस ई-सर्विसेसद्वारे अॅडीफिडेलिस सोल्‍यूशन्‍सचे अधिग्रहण

Shivani Shetty

नेस्‍ले इंडियाच्‍या ‘बायोडायजेस्‍टर प्रोजेक्‍ट’ने दुग्‍ध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या शाश्‍वत भविष्‍याचा मार्ग सुकर केला

Shivani Shetty

७२ टक्‍के नियोक्‍त्यांचा फ्रेशर्सना नियुक्‍त करण्याकडे कल: टीमलीज एडटेक

Shivani Shetty

Leave a Comment