मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, ऑल-न्यू नेक्सॉन (आयसीई) याभारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीला नुकतेच आघाडीचा जागतिक कार मूल्यांकन उपक्रम ग्लोबल एनसीएपीकडून प्रौढ प्रवाशी सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग (३२.२२/३४ पॉइण्ट्स) आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग (४४.५२/४९ पॉइण्ट्स) मिळाले आहे. या यशामधून टाटा मोटर्सची सुरक्षिततेप्रती स्थिर समर्पितता दिसून येते, जेथे त्यांच्या सर्व नवीन एसयूव्ही मॉडेल्सना ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे.
या महत्त्वपूर्ण संपादनाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स येथील चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. मोहन सावरकर म्हणाले, ”सुरक्षितता आमच्या डीएनएमध्ये सामावलेली आहे आणि आम्हाला सुधारित २०२२ प्रोटोकॉलनुसार नवीन नेक्सॉनसाठी ग्लोबल एनसीएपीकडून प्रतिष्ठित ५-स्टार रेटिंग मिळण्याचा अभिमान वाटतो. २०१८ मध्ये जीएनसीएपीकडून ५ स्टार रेटिंग मिळणारी ही भारतातील पहिली कार होती आणि या कारने हा वारसा कायम ठेवला आहे, ज्यामधून नाविन्यता व सर्वोत्तमतेप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. या यशासह आमच्या सर्व नवीन एसयूव्हींना जीएनसीएपी ५-स्टार रेटिंग प्रमाणन मिळाले आहे आणि भारतातील सुरक्षित एसयूव्हींसाठी स्तर उंचावला आहे. आम्ही अपेक्षांची पूर्तता करण्यासह रस्त्यावरील प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे वेईकल्स वितरित करण्याप्रती समर्पित आहोत.”
नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागातील सर्वोत्तमतेचे प्रतीक आहे, लाँच झाल्यापासून विशिष्ट दर्जा प्राप्त केला आहे आणि ६ लाखांहून अधिक कुटुंबांकडून प्रशंसा मिळवली आहे. टाटा मोटर्सने नवीन नेक्सॉनसह ग्राहकांना आनंदित केले आहे, ज्यामधून ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
नवीन नेक्सॉनची प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये:
• सहा एअरबॅग्ज
• सर्व प्रवाशांसाठी थ्री-पॉइण्ट सीटबेल्ट्स
• ISOFIX प्रतिबंध
• इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी)
• इमर्जन्सी (ई-कॉल) असिस्टण्स
• ब्रेकडाऊन (बी-कॉल) असिस्टण्स
• ३६०-डिग्री सराऊंड व्ह्यू सिस्टम
|
• ब्लाइण्ड व्ह्यू मॉनिटरिंग
• फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स
• ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम
• टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
• फ्रण्ट फॉग लॅम्पसह कॉर्नरिंग फंक्शन
• रिअरव्ह्यू कॅमेरा
|