maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अप आणि शाहरूख खान यांनी टीम इंडियाच्‍या विजयाबाबत जागृत केला विश्‍वास

मोहिम ‘तेरे अंदर का हर शक मिटाएंगे, तूफान हैं, कप तो हम ही उठाएंगे’मध्‍ये आहे बॉलिवुड सुपरस्‍टार शाहरूख खान, जेथे ‘वॉईस ऑफ बीलीफ’ क्रिकेटप्रेमींना टीम इंडियावर विश्‍वास ठेवण्‍यास प्रेरित करते

टीव्‍हीसीसाठी लिंक:

https://www.youtube.com/watch?v=pV4sCMR6pf8&ab_channel=ThumsUpOfficial

राष्‍ट्रीय, १० ऑक्‍टोबर: थम्‍स अप या कोका-कोला इंडियाच्‍या भारतातील स्‍वदेशी बेव्‍हरेज ब्रॅण्‍डला आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपसोबतच्‍या सहयोगांतर्गत आणखी एक मोहिम ‘तेरे अंदर का हर शक मिटाएंगे, तूफान हैं, कप तो हम ही उठाएंगे’ लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. ही मोहिम बिगेस्‍ट फॅन व ‘वॉईस ऑफ बीलीफ’ म्‍हणून बॉलिवुड सुपरस्‍टार शाहरूख खानसोबत टीम इंडियासाठी उत्‍कट पाठिंब्‍याला दाखवते.

जाहिरातीमध्‍ये शाहरूख खान डबल रोलमध्‍ये पाहायला मिळेल. या दोन्‍ही भूमिका प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे मन व हृदयामधील विश्‍वासाला सादर करतील, जेथे शेवटी मनावर हृदयातील विश्‍वास विजयी ठरत टीम इंडियासाठी अविरत पाठिंबा दिसण्‍यात येतो.

क्रिकेट हा फक्‍त खेळ नसून भारतीय संस्‍कृतीचा महत्त्वपूर्ण भाग असल्‍याचे ओळखत थम्‍स अप या अविश्‍वसनीय प्रवासामध्‍ये प्रत्‍येक क्रिकेटप्रेमीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. क्रिकेटप्रेमींशी संलग्‍न होत त्‍यांच्‍या अंतर्गत दुविधेला दूर करण्‍यापासून टीम इंडियामधील खेळाडूंचा निर्धार दाखवण्‍यापर्यंत, तसेच अधिक उत्‍कट संवादांना चालना देणारी डिस्नी+ हॉटस्‍टारवर ‘थम्‍स अप फॅन पल्‍स’ लाँच करण्‍यापर्यंत थम्‍स अपने क्रिकेटप्रेमींमध्‍ये टीम इंडियाच्‍या विजयाबाबत विश्‍वास असण्‍याची खात्री घेतली आहे.

स्‍पर्धा सुरू होण्‍यासह मंच सजलेला आहे आणि टीम सर्वोत्तम खेळ सादर करण्‍यासाठी सज्‍ज असताना सर्व शंका दूर होत हा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. शाहरूख खान यांच्‍या करिष्‍माई सादरीकरणासह आमचा क्रिकेटप्रेमींमध्‍ये विश्‍वास जागृत करण्‍याचा मनसुबा आहे, तसेच टीम इंडियावरील त्‍यांचा विश्‍वास अधिक दृढ करत विजयाच्‍या दिशेने प्रवास अधिक उत्‍साहवर्धक करण्‍याचा मनसुबा आहे.

उत्‍साहामध्‍ये अधिक भर करत क्रिकेटप्रेमींना शाहरूख खान बीलीव्‍हर बॉटसह आनंददायी सरप्राईज मिळेल, ज्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्‍यात येईल. हे एआय-समर्थित बॉट टीम इंडियाबाबत माहितीपूर्ण तथ्‍ये सादर करेल, जी शाहरूख खान यांच्‍या वॉईस ऑफ बीलीफमध्‍ये सादर केली जातील, कोणत्‍याही शंकांचे प्रभावीपणे निराकरण केले जाईल आणि सोशल मीडियावरील चाहत्‍यांशी संलग्‍न होईल.

या मोहिमेबाबत आपले मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सचे सीनियर कॅटेगरी डायरेक्‍टर टिश कोन्‍डेनो म्‍हणाले, ”आमचा विश्‍वास आहे की, आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप देशातील सर्वात मोठा स्‍पोर्टिंग इव्‍हेण्‍ट आहे. आयसीसीसोबतचा सहयोग आम्हाला विविध सहयोगात्‍मक फॉर्मेट्सच्‍या माध्‍यमातून ग्राहक, ब्रॅण्‍ड्स व क्रिकेटला एकत्र करण्‍याची अद्वितीय संधी देतो. आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप मोहिमेसह थम्‍स अपच्‍या सहयोगासाठी ‘वॉईस ऑफ बीलीफ’ म्‍हणून शाहरूख खान यांच्‍यासोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून अतूट विश्‍वासामधील प्रत्‍येक शंकेचे निराकरण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

शाहरूख खान थम्‍स अपसोबतच्‍या सहयोगाबाबत म्‍हणाले, ”आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपसोबत थम्‍स अपच्‍या सहयोगासाठी ‘वॉईस ऑफ बीलीफ’ असण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामधून अब्‍जो क्रिकेटप्रेमींच्‍या मनातील विश्‍वासाला सादर केले जाते. वर्ल्‍ड कप आपल्‍या देशामध्‍ये खेळवला जात असताना भारतीय संघासाठी अत्‍यंत खास आहे आणि आपण आपल्‍या तूफान्‍सना पुन्‍हा एकदा इतिहास रचण्‍यासाठी पाठिंबा दिला पाहिजे.”

ओगील्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले, ”क्रिकेट भावनेशी संबंधित आहे. टीम चांगला खेळ खेळत असताना आपण सर्व टीमच्‍या पाठीशी असतो, पण अचानक कमी परफॉर्मन्‍स झाला असता आपण सर्व आशा गमावतो. हे कटू सत्‍य आहे. असे वाटते की आपल्‍यामध्‍ये दोन विभिन्‍न बाजू आहेत, ज्‍या एकमेकींना सतत विरोध करतात. या दोन बाजू म्‍हणते डाऊटर (संशयी) व बीलीव्‍हर (विश्‍वास ठेवणारा) आणि हे अत्‍यंत खरे आहे.

म्‍हणून, थम्‍स अप २०२३ वर्ल्‍ड कप मोहिमेसह आम्‍ही शाहरूख खान यांना डबल रोल साकारण्‍यास आणि या विरूद्ध बाजूंमधील संघर्षांना सादर करण्‍यास सांगितले. ज्‍यामधून मत स्‍पष्‍टपणे व प्रबळपणे सादर करण्‍यात आले आहे. तुमच्‍यामधील डाऊटर तुम्‍हाला दुविधेमध्‍ये टाकेल, पण तुमच्‍यामधील बीलीव्‍हर विश्‍वास जागृत करेल. चला तर मग खरे क्रिकेट चाहते बनवूया. भारतीय संघ जिंकणार असा विश्‍वास जागृत करूया.”

तसेच, थम्‍स अप वर्ल्‍ड कपमध्‍ये भारताच्‍या विजयामधील विश्‍वासाला अधिक दृढ करणारे रिअल टाइम कन्‍टेन्‍ट तयार करण्‍याकरिता टीम इंडियासाठी उत्‍कट चाहत्‍यांची सेना भारत आर्मीसोबत देखील सहयोग करणार आहे.

कोका-कोला कंपनी बाबत

भारतात कोका-कोला देशातील अग्रगण्‍य पेय कंपनी आहे, जी ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या व रिफ्रेशिंग पेय पर्यायांची श्रेणी देते. कंपनी ‘बेव्‍हरेजेस् फॉर लाइफ’ या आपल्‍या दृष्टीकोनाशी बांधील राहत उत्‍पादनांचा व्‍यापक पोर्टफोलिओ देते, ज्‍यामध्‍ये हायड्रेशन, स्‍पोर्टस्, स्‍पार्कलिंग, कॉफी, चहा, पोषण, ज्‍यूस व डेअरी आधारित उत्‍पादनांचा समावेश आहे. भारतातील कंपनीच्‍या पेय श्रेणीमध्‍ये कोका-कोला, कोला-कोला झीरो शुगर, डाएट कोक, थम्‍स अप, चार्ज्‍ड बाय थम्‍स अप, फॅन्‍टा, लिम्‍का, स्‍प्राइट, माझा आणि ज्‍यूसेसची मिनट मेड रेंज यांचा समोवश आहे. कंपनी हायड्रेशन पेय देखील देते जसे लिम्‍का स्‍पोर्टस्, स्‍मार्टवॉटर, किन्‍ले, दसानी आणि बोनाक्‍वा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व किन्‍ले क्‍लब सोडा. प्रिमिअम उत्‍पादनांमध्‍ये श्‍वेप्‍स व स्‍मार्टवॉटर यांचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त कंपनी चहा व कॉफीची कोस्‍टा कॉफी श्रेणी देते. कंपनी आपल्‍या पेयांमध्‍ये साखरेचे प्रमाण कमी करण्‍यापासून बाजारपेठेत नाविन्‍यपूर्ण नवीन उत्‍पादने सादर करण्‍यापर्यंत आपल्‍या पोर्टफोलिओमध्‍ये सातत्‍याने परिवर्तन करत आहे.

आपल्‍या स्‍वत:च्‍या मालकीची बॉटलिंग कार्यसंचालने व फ्रँचायझी बॉटलिंग सहयोगींसह कंपनीचे जवळपास ४ दशलक्ष रिटेल आऊटलेट्सचे प्रबळ नेटवर्क आहे. या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून कंपनी देशभरातील लाखो ग्राहकांना रिफ्रेश करते. कंपनी वॉटर रिप्‍लेनिशमेंट, पॅकेजिंग रिसायकलिंग, शाश्‍वत कृषी उपक्रम आणि आपल्‍या मूल्‍य साखळीमध्‍ये कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींचे जीवन, समुदाय व पर्यावरणावर सकारात्‍मक परिणाम घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करते.

जागतिक स्‍तरावर आपल्‍या बॉटलिंग सहयोगींसोबत सहयोगाने कोका-कोला कंपनीचे ७००,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहे, ज्‍यामधून जगभरातील स्‍थानिक समुदायांना आर्थिक संधी मिळण्‍यास मदत केली जात आहे. अधिक माहितीसाठी www.cocacolacompany.comयेथे भेट द्या आणि आम्‍हाला ट्विटर, इन्‍स्‍टाग्राम, फेसबुक व लिंक्‍डइनवर फॉलो करा.

Related posts

राज्यातील तरुणांच्या रोजगारक्षमतेची व्याप्ती वाढवण्यावर भर: चंद्रकांतदादा पाटील

Shivani Shetty

चौथ्‍या तिमाहीत हायरिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा: टीमलीज स्‍टाफिंग

Shivani Shetty

मुंबईत ‘कम्प्लायन्स अँड गव्हर्नन्स सिम्पोझियम’ परिषदेचे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment