maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जलसकारात्मकतेच्या (Water Positivity) बळावर नाशिकच्या एबीबी (ABB) फॅक्टरीने गाठली शाश्वत उत्पादनाची नवीन पातळी

ABB आपल्या नाशिक मधील कारखान्यांपैकी एका साईटने जलसकारात्मकता (Water Positivity) मानांकन आणि Mission to Zero™️ दर्जा प्राप्त केले. ह्या कामगिरी सोबत ABB इंडिया संसाधनांच्या शाश्वत आणि जबाबदार वापरासाठी चाललेल्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे.

ताज्या पाण्याच्या स्त्रोतांमधून जितक्या पाण्याचा उपसा केला जाईल त्याहून अधिक पाणी या स्त्रोतांना परत करणे आणि जलव्यवस्थापनासाठी एक कार्यचौकट प्रस्थापित करून पाण्याच्या बचतीसाठीच्या प्रयत्नांची धुरा दीर्घकाळासाठी वाहणे या संकल्पनेला जलसकारात्मकता (Water Positivity) असे म्हणतात. जवळ-जवळ ४९००० m2 चौ.मी क्षेत्रावर उभ्या असलेल्या नाशिकच्या निर्मितीकेंद्राला भारताच्या GRIHA (ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटाट असेसमेंट) परिषदेने १.१४ जलसकारात्मकता (Water Positivity) सूचकांक प्रदान केला असून जलसकारात्मक (Water Positivity) फॅक्टरी म्हणून प्रमाणपत्र दिले आहे. मिशन टू झिरो (Mission to Zero™️) हा एबीबी (ABB) ने ऊर्जाबचतीमध्ये वाढ करण्यासाठी आणि डीकार्बनायझेशनची यंत्रणा उभारण्यासाठी राबविलेला उपक्रम आहे, ज्याअंतर्गत कंपनीच्या निर्मिती आणि उत्पादन केंद्रांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती तयार केल्या जातात.
नाशिकच्या फॅक्‍टरीमध्‍ये मीडिअम व्होल्टेज (MV) स्विचगिअर आणि सेकंडरी गॅस इन्स्लुलेडेट स्विचगिअर (GIS) उपकरणे तयार केली जातात, जी भारतभरामध्ये कार्यक्षम इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स पुरवितात. ही उपकरणे शहरीकरणाच्या निरंतर प्रक्रियेमध्ये आणि देशाच्या विद्युतीकरणामध्ये तसेच शाश्वत परिवहनासाठी लागणाऱ्या ऊर्जायंत्रणांचा पुरवठा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी आहेत.
पाणी हा देशासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी सुद्धा एक महत्त्वाचा विषय असल्याने ABB ने जलसकारात्मकता (Water Positivity) साध्य करण्यास आपले प्रमुख लक्ष्य बनविले आहे. वसुंधरेला वाचविण्यासाठी चाललेल्या लढ्यामध्ये वॉटर न्युट्रॅलिटी ही मोठ्या वेगाने कार्बन न्युट्रॅलिटी इतकीच महत्त्वाची बनत असताना आपली कार्यपद्धती भारतातील आणि जगभरातल्याही आपल्या भागीदारांसाठी आणि ग्राहकांसाठी एक आदर्श उदहारण, एक ब्लूप्रिंट बनेल, अशी कंपनीची आशा आहे.
जलसकारात्मकता (Water Positivity) साध्य करण्यासाठी नाशिक येथील प्लांट नं. १ वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेपासून ते पाणी जमिनीत न मुरता वाहून जाण्याचे प्रमाण कमी करण्यापासून ते भूजलतक्त्याच्या पुनर्भरणापासून तसेच इतर स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी साठविलेल्या पर्जन्यजलाचा पुनर्वापर करण्यापर्यंत अनेक प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. पाण्याचा किफायतशीरपणे वापर करणाऱ्या वॉटर इफिसिएंट फिक्स्चर वापर करून पाण्याचा वापर ३० टक्क्यांनी कमी केला आहे आणि साइटवर सिंचन पद्धती व सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठीचा प्लान्ट सुरू केल्याने सांडपाण्याचा सिंचनासाठी आणि इतर घरगुती कामांसाठी पुनर्वापर होत आहे. यामुळे कारखान्यांतून झीरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) साध्य झाला आहे. यंत्रणेची पर्जन्यजल संचयनाची वार्षिक क्षमता ३४,४८६ दशलक्ष लीटर्स इतकी आहे, म्हणजे या यंत्रणेमुळे दरवर्षी ऑलिम्पिकचे १४ जलतरणतलाव भरतील इतक्या पाण्याचा संचय केला जात आहे.
तसेच जलसंवर्धनासाठी साजेशी कृती हाती घेण्यास वाव मिळावा यासाठी एबीबी (ABB) ने वॉटर मॉनिटरिंग आणि अनॅलिसिस यंत्रणे स्थापित केली. जवळपासच्या ग्रामीण भागांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळावे या हेतूने ओढ्यांतील पावसाचे पाणी अडविण्यासाठी कंपनीने पाणीटंचाई असलेल्या स्थानिक भागांमध्ये जलव्यवस्थापनासाठीची बांधकामे उभारण्यातही गुंतवणूक केली आहे.
GRIHA वॉटर पॉसिटीव्हिटी प्रमाणपत्राची व्याप्ती ही केवळ साइटपुरतीच मर्यादित असून या प्रमाणनासाठी होणाऱ्या वॉटर पॉसिटीव्हिटी विश्लेषणामध्ये उर्ध्वगामी पुरवठा साखळीचा यात upstream supply chainचा समावेश नाही.
एक जबाबदार संसाधन व्यवस्थापनाच्या ABB या दृष्टीकोनातून ऊर्जेचा वापर व कार्बन उत्सर्ग कमी करणे या उदिष्टाचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिक येथील कारखान्याने ऊर्जावापराच्या बाबतीत संपूर्ण दृश्यमानता प्राप्त केली आहे. यासाठी एबीबी एबिलिटी (ABB Ability™️) मॅनेजर या क्लाउड आधारित उपाययोजनेचा वापर केला जात आहे, ज्यात ऊर्जावापरावर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्रुटी ओळखण्यासाठी ७६ सेन्सर्सद्वारे डेटा गोळा केला जातो.
उत्सर्गाचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी एबीबी (ABB) च्या नाशिकमधील कारखान्याने ऐलइडी (LED) प्रकाशयोजनेचा वापर, इन्सुलेटेड वॉल्स आणि कोटेड रूफ, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा, लाइटिंग आणि मीटिंग रूम्समध्ये कूलिंग मागणीनुसार पुरविण्याची यंत्रणा यांचा वापर करण्यासारख्या ऊर्जेची अधिक प्रमाणात बचत करणाऱ्या उपाययोजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. या सर्व यंत्रणांचे व्यवस्थापन केएनएक्स (KNX) आणि साइलॉन (Cylon) बिल्डिंग व्यवस्थापन यंत्रणेद्वारे केले जाते. १ MWp क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनल्स इन्‍स्‍टॉल करण्‍यात आले, जे कारखाना चालविण्यासाठी वर्षाकाठी लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ३५ टक्के ऊर्जेचा पुरवठा ग्रिडमधून मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत कितीतरी कमी किंमतीत प्राप्त करून देते. कारखान्याच्या कामकाजामध्ये १०० टक्के हरित इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो, यापैकी ३५ टक्के ऊर्जा सौरप्रकल्पातून तर उर्वरित ६५ टक्के ऊर्जा इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी सर्टिफिकेट (IREC) द्वारे प्राप्त केली जाते. या सर्व उपाययोजनांच्या एकत्रित परिणामाने नाशिकच्या प्लांट नं १ ला इंडियन ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलकडून (IGBC) ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग, प्लॅटिनम रेटिंग सर्टिफिकेट मिळाले आहे.
एबीबी इंडियाच्या (ABB India) इलेक्ट्रिफिकेशन बिझनेस, डिस्ट्रिब्युशन सोल्युशन्स विभागाचे प्रेसिडंट गणेश कोठावडे म्हणाले, “ऊर्जेचा वापर आणि कार्बन उत्सर्ग कमी करण्याचे महत्त्व हा आमच्या Mission to Zero™️ वाटचालीचा महत्त्‍वाचा भाग आहे. अर्थात, जलसकारात्मकता (Water Positivity) ही पर्यावरणाशी संतुलन साधत काम करणाऱ्या शाश्वत इमारतींच्या उभारणीतील नवा अग्रेसर मुद्दा असणार आहे. देशाच्या ऊर्जा परिवर्तनाला पाठबळ देण्यासाठी पर्यावरण पूरक उत्पादनाचे काम अत्यंत प्रभावीपणे कसे करता येईल हे ABB ने दाखवून दिले आहे आणि यशस्वीतेची ही ब्लूप्रिंट आम्ही आमच्या स्थानिक आणि जागतिक भागीदारांनाही देणार आहोत, जेणेकरून अधिकाधिक उत्पादकांना आपापल्या ऊर्जा व जलवापराच्या पद्धतींविषयी पुनर्विचार करण्यास प्रोत्साहन मिळेल.”
नाशिक फॅक्‍टरी चीन, फिनलंड, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि यु.एस.ए. साइट्सच्या मिशन टू झिरो केंद्रांच्या यादीत दाखल झाले आहे.

Related posts

सेन्‍चुरी मॅट्रेसेसकडून क्‍यू-जेल मॅट्रेस’ लाँच

Shivani Shetty

स्पिनी मोटरस्पोर्टसह आयआयटी-मुंबई येथे ड्रायव्हिंगचा मूड

Shivani Shetty

इकोफायची विद्युतसह हातमिळवणी

Shivani Shetty

Leave a Comment