maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा गोल्डन भारत ट्रॅव्हल सेल

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने गोल्डन भारत ट्रॅव्हल सेल सादर करत पर्यटकांना अतुलनीय दरांमध्‍ये जगभरात प्रवास करण्यासाठी अद्वितीय संधी दिली आहे. मर्यादित कालावधीसाठी असलेला हा सेल २६ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. हा सेल देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स हॉटेल्स, बसेस, कॅब्‍स, क्रूझेज आणि हॉलिडे पॅकेजेसवर अविश्‍वसनीय सूट देतो.

गोल्डन भारत ट्रॅव्हल सेलदरम्‍यान पर्यटक जगातील भव्‍यतेचा अनुभव घेऊ शकतात, जेथे ते अनेक आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात. देशांतर्गत फ्लाइट्स बुकिंग्‍जवर जवळपास २,०२३ रूपयांची सूट, तर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बुकिंग्‍जवर जवळपास ७,५०० रूपयांची सूट मिळवा. याव्‍यतिरिक्‍त हॉटेल बुकिंग्‍जवर जवळपास १०,००० रूपयांची सूट, बस बुकिंग्‍जवर जवळपास ५०० रूपयांची सूट आणि कॅब बुकिंग्‍जवर जवळपास २,००० रूपयांची सूट मिळवा. सर्वसमावेशक हॉलिडे अनुभवांचा शोध घेणाऱ्यांसाठी देशांतर्गत पॅकेजेस् फक्‍त १०,१९९ रूपयांपासून, आंतरराष्ट्रीय पॅकेजेस् ११,९९० रूपयांपासून आणि क्रूझ अॅडवेन्‍चर्स ५२,९९० रूपयांपासून आहेत. या मर्यादित कालावधीच्‍या सेलमधून तुम्‍हाला भारतातील अपवादात्‍मक व भव्‍य पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी आहे.

या ग्रॅण्‍ड सेलिब्रेशनमध्‍ये सहभाग घेण्यासाठी तुमच्‍या पसंतीचा ट्रॅव्हल पर्याय निवडताना कूपन कोड इएमटीभारतचा वापर करा. याव्‍यतिरिक्‍त ग्राहक २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड्सच्‍या माध्‍यमातून बुकिंग करत अधिक बचत करू शकतात.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, ”आमचा दृढ विश्‍वास आहे की, आपले सहकारी भारतीय आपल्‍या देशामध्‍ये पर्यटनाचा अधिकाधिक आनंद घेतील तेव्‍हाच भारताचा दर्जेदार पर्यटन दर्जा प्रकाशझोतात येऊ शकतो. हा सेल सर्वांसाठी हृदयस्‍पर्शी भेट आहे, ज्‍यामधून सर्वांना भारतातील अद्भुत स्‍थळांचा शोध, अनुभव व आनंद घेण्याची संधी देण्यात आली आहे. या सर्व सुविधांना इझमायट्रिपचे पाठबळ आहे. हा फक्‍त ट्रॅव्हल सेल नसून आपल्‍या मायभूमीमधील भव्‍यतेचा पुन्‍हा शोध घेण्याच्‍या दिशेने प्रवास देखील आहे. फक्‍त एवढेच नाही, आमचे सेलिब्रेशन सीमेपलीकडे देखील विस्‍तारित करण्यात आले आहे, जेथे आम्‍ही इझमायट्रिपच्या अतुलनीय सवलतींसह पर्यटकांना जगातील अद्भुत स्‍थळांबाबत जाणून घेण्यासाठी आकर्षक आंतरराष्ट्रीय डिल्स देखील दिल्‍या आहेत.’

Related posts

फिजिक्‍सवालाने एका वर्षात १ लाख तरूणांना अपस्किल केले

Shivani Shetty

आयथिंक लॉजिस्टिक्सचा इंडिया पोस्टसोबत सहयोग

Shivani Shetty

१८ शहरांतील धावपटूंचा अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉनमध्ये सहभाग

Shivani Shetty

Leave a Comment