मुंबई, १२ डिसेंबर २०२३: घर शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे हाऊसिंग डॉटकॉम या भारतातील प्रसिद्ध रिअल इस्टेट प्लॅटफॉर्मने एक एआयद्वारे चालणारे प्राइस ट्रेण्ड इंजिन आणले आहे. हे अत्याधुनिक साधन मशिन लर्निंग (एमएल) व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांचा उपयोग करून वापरकर्त्यांना महत्त्वाची किंमतविषयक आकडेवारी व सूक्ष्म माहिती देऊ करते आणि त्यायोगे घर खरेदी, विक्री किंवा भाड्याने घेण्यासंदर्भात अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. सुरुवातीला हे फीचर मुंबई, गुरूग्राम, बेंगळुरू व हैदराबाद या शहरांमध्ये उपलब्ध आहे. ही सेवा अन्य प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्याचीही योजना आहे. यामुळे देशभरातील ऑनलाइन घर शोधण्यामध्ये नवीन मानके प्रस्थापित होत आहेत.
हाऊसिंग डॉटकॉम ने स्वत: विकसित केलेले अल्गोरिदम हे फीचर सुरू करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यात बाजारपेठेतील केवळ वर्तमान किमत दिल्या जात नाहीत, तर गेल्या २-३ वर्षांतील किमतींमधील चढउतारांचेही तपशीलवार विश्लेषण दिले जाते.
हे साधन वापरकर्त्याला विशिष्ट भागांमधील तसेच वसाहतींमधील किमतींचे आयाम खोलवर समजून घेण्यात मदत करते. लगतच्या भागांमधील किमतींशी तुलना करण्याची मुभा देऊन हाऊसिंग डॉटकॉम वापरकर्त्यांचे ज्ञान वाढवते आणि त्यायोगे दर अधिमूल्यनाबाबत (किंमतवाढींबाबत) अंदाज बांधण्यात तसेच मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी योग्य वेळ ओळखण्यात मदत होते. आपल्या घर खरेदीच्या वेळेनुसार आर्थिक नियोजन व तरतूद करण्यासाठी हे साधन ग्राहकाला उपयुक्त ठरते.
हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. ध्रुव अगरवालम्हणाले, “ग्राहकाला श्रेष्ठ दर्जाचा अनुभव पुरवण्याप्रती अविचल बांधिलकी ही आमच्या तत्त्वाच्या हृदस्थानी आहे. सध्याच्या गतीशील तंत्रज्ञानात्मक वातावरणात, एआय हा सर्व क्षेत्रांमधील नवोन्मेषाला चालना देणारा मुलभूत घटक झाला आहे. कोणत्याही प्रगतीशील तांत्रिक उद्योगासाठी एआय व एमएलचे एकात्मीकरण ऐच्छिक राहिलेले नसून, ती धोरणाची आवश्यकता झाली आहे. एआय आपल्या जगासोबतच्या आंतरक्रियांमध्ये बदल घडवून आणत असतानाच, या तंत्रज्ञानाचा लाभ घेणे हे स्पर्धात्मकदृष्ट्या सरस ठरण्यापुरते मर्यादित नाही, तर अपवादात्मक दर्जाचे ग्राहक अनुभव निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.”
एआय-एनेबल्ड प्राइड ट्रेण्ड फीचर आणून हाऊसिंग डॉटकॉम ने पुन्हा एकदा रिअल इस्टेट क्षेत्रातील नवोन्मेष्कारी कंपनी म्हणून आपली ओळख अधोरेखित केली आहे. हे फीचर वापरकर्त्याला बाजारपेठेबद्दल अमूल्य माहिती पुरवते आणि मालमत्ता व्यवहारांबाबतचा दृष्टीकोन बदलण्यातही मदत करते.