maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नेस्ले इंडियाने मंच चोको फिल्स सिरिअल बाजारात विस्तार

मंच चोको फिल्स हे ब्रेकफास्ट सीरिअल्स प्रवर्गातील नवीनतम उत्पादन सर्वांपुढे आणताना नेस्ले इंडियाला आनंद होत आहे. हे उत्पादन आता भारतभरात उपलब्ध आहे. कुरकुरीत बाह्यकवच आणि आतमध्ये भरलेले चॉकलेट या चविष्ट संगतीच्या माध्यमातून ब्रेकफास्टची मजा वाढवण्यास हे सीरिअल सज्ज आहे. सकाळचा नाश्त्याचा अनुभव सुखद करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हे उत्पादन उत्तम आहे.
मिल्क चॉकलेटच्या भरगच्च फिलिंगमुळे नेस्ले मंच चोकोचा प्रत्येक घास लज्जतदार झाला आहे. हे चोको फिल्स खऱ्या अर्थाने ‘बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये वितळून जाण्याएवढे मऊ’ आहेत.
नेस्ले इंडियाच्या ब्रेकफास्ट सिरिअल्स विभागाचे संचालक श्री. वरुण सेतुरामन या नवीन उत्पादनाबद्दल म्हणाले, “भारतभरातील ब्रेकफास्ट टेबल्सवर नवीन काहीतरी व खास आणण्यासाठी नेस्लेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असतो. दिवसाची सुरुवात आनंदी व्हावी म्हणून गंमतशीर आणि चविष्ट नाश्त्याच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी मंच चोको फिल्स उत्तम उत्पादन आहे. आमच्या रोमांचक मंच सिरिअल पोर्टफोलिओमध्ये मंच चोको फिल्सची भर घालणे आमच्यासाठीही उत्साह वाढवणारा अनुभव आहे. त्यामुळे ग्राहकांना सकाळी सकाळी अधिक आनंद आणि अधिक वैविध्य मिळणार आहे.”
नेस्ले मंच चोको फिल्स सर्व आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. भारतीयांच्या चवीनुसार तयार केलेली वैविध्यपूर्ण नाश्त्याच्या उत्पादने देत राहण्याच्या नेस्लेच्या प्रवासातील हा एक नवीन टप्पा आहे.

Related posts

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाद्वारे स्थानिक स्तरावर ५ लाख इंजिन्सचे उत्पादन

Shivani Shetty

भारतातील ८२ टक्‍के प्रोफेशनल्स २०२५ मध्‍ये नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत, पण शोध पूर्वीपेक्षा अधिक आव्‍हानात्‍मक आहे

Shivani Shetty

अपोलोने ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी आणले ‘झॅप-एक्स’ तंत्रज्ञान

Shivani Shetty

Leave a Comment