maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग इंडियाकडून ऑसम इंटेलिजन्‍स असलेले गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी लाँच

भारत – मार्च ४, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ऑसम इंटेलिजन्‍स असलेले गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सर्जनशीलतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी अद्भुत सर्च व व्हिज्‍युअल अनुभव आहेत. ऑल-न्‍यू डिझाइनशैली असलेल्‍या नवीन गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सुधारित टिकाऊपणा व कार्यक्षमता, तसेच प्रबळ सुरक्षितता आणि गोपनीयता संरक्षण देखील आहे.

ऑसम इंटेलिजन्‍स
गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मध्‍ये ऑसम इंटेलिजन्‍स उपलब्‍ध आहे, जे भारतातील ग्राहकांसाठी एआयचे लोकशाहीकरण सक्षम करते. सर्वसमावेशक मोबाइल एआय सूट ऑसम इंटेलिजन्‍स प्रगत एआय वैशिष्‍ट्ये सादर करते, जसे गॅलॅक्‍सीची फॅन-फेव्‍हरेट एआय वैशिष्‍ट्ये. गुगलचे सुधारित सर्कल टू सर्च वैशिष्‍ट्ये फोनच्‍या स्क्रिनवरून सर्च व डिस्‍कव्‍हर अधिक सोपे करते. सर्कल टू सर्चमधील सुधारणांसह वापरकर्ते त्‍यांना ऐकायला येणारी गाणी त्‍वरित सर्च करू शकतात, ज्‍यासाठी अॅप्‍समध्‍ये स्विच करण्‍याची गरज भासणार नाही. त्‍यांच्‍या फोनमधून सोशल मीडियावर गाणे प्‍ले करायचे असो किंवा त्‍यांच्‍याजवळ असलेल्‍या स्‍पीकर्समधून ऐकू येणारे संगीत असो, सर्कल टू सर्च कार्यान्वित करण्‍यासाठी फक्‍त नेव्हिगेशन बारवर लॉंग प्रेस करून ठेवा, त्‍यानंतर गाण्‍याचे नाव व आर्टिस्‍ट ओळखण्‍यासाठी म्‍युझिक बटनवर टॅप करा.

ऑसम इंटेलिजन्‍समध्‍ये इंटेलिजण्‍ट व्हिज्‍युअल एडिटिंग वैशिष्‍ट्यांची श्रेणी देखील आहे, जसे ऑटो ट्रिम, बेस्‍ट फेस, इन्‍स्‍अण्‍ट स्‍लो-मो आणि इतर अनेक. ऑटो-ट्रिम व बेस्‍ट फेस फ्लॅगशिप-लेव्‍हल एआय वैशिष्‍ट्ये आहेत, जी आता गॅलॅक्‍सी ए५६ ५जी सह लोकशाहीकरण होत आहेत. नवीन स्‍मार्टफोन्‍समध्‍ये ऑब्‍जेक्‍ट एरेजर देखील आहे, जे वापरकर्त्‍यांना फोटोजमधून नको असलेले व्‍यत्‍यय काढून टाकण्‍याची सुविधा देते. तसेच, फिल्‍टर्स फोटोंमधील रंग व स्‍टाइल्‍स बदलत सानुकूल फिल्‍टर निर्मिती करते, ज्‍यामुळे वापरकर्ते मूड व आवडीनुसार अद्वितीय आणि वैयक्तिकृत इफेक्‍ट देऊ शकतात.

ऑसम डिझाइन
गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी ऑल-न्‍यू डिझाइन शैलीसह येतात, जी आता गॅलॅक्‍सी ए सिरीजसाठी मापदंड स्‍थापित करते. नवीन डिझाइनशैलीमध्‍ये लिनियर फ्लोटिंग कॅमेरा मॉड्यूल आणि ‘रॅडियन्‍स’ प्रेरित कलर थीम आहे. गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी आतापर्यंतचे सर्वात स्लिम गॅलॅक्‍सी ए सिरीज डिवाईसेस आहेत, ज्‍यांची रुंदी फक्‍त ७.४ मिमी आहे.

ऑसम डिस्‍प्‍ले
गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मध्‍ये उच्‍च दर्जाचा, सर्वोत्तम व्‍युइंग अनुभवासाठी डिझाइन करण्‍यात आलेला मोठा डिस्‍प्‍ले आहे. दोन्‍ही डिवाईसेसमध्‍ये ६.७-इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह जवळपास १२०० नीट्सपर्यंत पोहोचणाऱ्या ब्राइटनेस लेव्‍हल्‍स आहेत. नवीन स्टिरिओ स्‍पीकर्स विशाल, संतुलित साऊंडसह गाणी ऐकण्‍याच्‍या अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात.

ऑसम कॅमेरा
गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी स्‍मार्टफोन्‍स कॅमेरा अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातात, जेथे गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मधील शक्तिशाली ट्रिपल-कॅमेरा सिस्‍टममध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेन लेन्‍स आणि १०-बीट एचडीआर फ्रण्‍ट लेन्‍स आहे, ज्‍यामधून आकर्षक व सुस्‍पष्‍ट सेल्‍फीज कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते. गॅलॅक्‍सी ए५६ ५जी मध्‍ये १२ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स आहे आणि नाइटोग्राफीमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच १२ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेऱ्यामध्‍ये लो नॉईज मोडची भर करण्‍यात आली आहे आणि अतिरिक्‍त वाइड कॅमेरा सपोर्ट आहे, ज्‍यामधून अंधुक प्रकाशात देखील आकर्षक फोटोज व व्हिडिओज कॅप्‍चर करता येतात.

ऑसम कार्यक्षमता
दोन्‍ही मॉडेल्‍स विनासायास मल्‍टी-टास्किंगसाठी सुधारित कार्यक्षमता देतात. गॅलॅक्‍सी ए५६ ५जी मध्‍ये एक्झिनॉस १५८० चिपसेटची शक्‍ती आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी स्‍नॅपड्रॅगन®️ जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्मवर कार्यरत आहे. दोन्‍ही डिवाईसेसमधील मोठे वेपर चेम्‍बर शाश्‍वत कार्यक्षमतेमध्‍ये मदत करतात, ज्‍यामुळे सुलभ गेमप्‍ले व व्हिडिओ प्‍लेबॅकची खात्री मिळते.

ऑसम बॅटरी
५,००० एमएएच बॅटरी असलेले गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी वापरकर्त्‍यांच्‍या दैनंदिन टास्‍क्‍सची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मध्‍ये ४५ वॅट चार्जिंग पॉवर व सुपर-फास्‍ट चार्ज २.० तंत्रज्ञान आहे, जे अधिक वापरासाठी गतीशील चार्जिंग देते.

ऑसम टिकाऊपणा
गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी मध्‍ये आयपी६७ धूळरोधक व जलरोधक रेटिंग आहे. तसेच, प्रगत कॉर्निंग®️ गोरिला विक्‍टस+ ग्‍लास टिकाऊपणाची अधिक खात्री ओरखडे व क्रॅक्‍सपासून संरक्षण करते. तसेच अँड्रॉईड ओएसच्‍या सहा जनरेशन्‍स आणि सहा वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्ससह नवीन गॅलॅक्सी ए सिरीज सॉफ्टवेअर लॉंजेव्हिटीवरील फोकस अधिक दृढ करते. हे अपडेट्स डिवाईसेसचे जीवनचक्र सानुकूल करण्‍यासाठी अधिक सपोर्ट देतात, ज्‍यामुळे वापरकर्ते वर्षानुवर्षे सुलभ व विश्‍वसनीय अनुभवाचा आनंद घेऊ शकण्‍याची खात्री मिळते.

ऑसम सुरक्षितता व गोपनीयता
पहिल्‍यांदाच गॅलॅक्‍सी ए सिरीजमध्‍ये वन यूआय ७ चा समावेश करण्‍यात आला असल्‍यामुळे सॅमसंग प्रबळ सुरक्षितता आणि गोपनीयतेला अधिक पाठिंबा देत आहे. सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍टसह गॅलॅक्‍सी ए सिरीज डिवाईस सुरक्षितता, पारदर्शकता व युजर चॉईसचा अतिरिक्‍त, फोर्टिफाईड स्‍तर देते, ज्‍यामधून संवेदनशील डेटाचे नेहमी संरक्षण होण्‍याची खात्री मिळते. आधुनिक वन यूआय७ सुरक्षितता व गोपनीयता वैशिष्‍ट्ये (latest One UI 7 security and privacy features) असलेली गॅलॅक्‍सी ए सिरीज वापरकर्त्‍यांना सर्वांगीण संरक्षण देते, जेथे थेफ्ट डिटेक्‍शन, मोअर सिक्‍युरिटी सेटिंग्‍ज आणि इतर वैशिष्‍ट्यांमध्‍ये अधिक सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत.

व्‍हेरिएण्‍ट्स, किंमत, रंग आणि ऑफर्स
लाँच ऑफर्सचा भाग म्‍हणून गॅलॅक्‍सी ए५६ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३००० रूपये किमतीचे स्‍टोरेज अपग्रेड मोफत मिळेल, ज्‍यामुळे ही ऑसम डिल आहे. ग्राहकांना विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट आणि ८ जीबी १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळेल.
गॅलॅक्‍सी ए५६ ५जी
मेमरी किंमत निव्‍वळ प्रभावी किंमत लॉंच ऑफर रंग
१२ जीबी २५६ जीबी ४७,९९९ रूपये ४४,९९९ रूपये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा. ऑसम ऑलिव्‍ह, ऑसम लाइटग्रे, ऑसम ग्रॅफाईट
८ जीबी २५६ जीबी ४४,९९९ रूपये ४१,९९९ रूपये ८ जीबी १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा.
८ जीबी १२८ जीबी ४१,९९९ रूपये ४१,९९९ रूपये लागू नाही

गॅलॅक्‍सी ए३६ ५जी
मेमरी किंमत निव्‍वळ प्रभावी किंमत लाँच ऑफर रंग
१२ जीबी २५६ जीबी ३८,९९९ रूपये ३५,९९९ रूपये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा. ऑसम ब्‍लॅक, ऑसम लव्‍हेंडर, ऑसम व्‍हाइट
८ जीबी २५६ जीबी ३५,९९९ रूपये ३२,९९९ रूपये ८ जीबी १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा.
८ जीबी १२८ जीबी ३२,९९९ रूपये ३२,९९९ रूपये लागू नाही

गॅलॅक्‍सी ए५६ ५जी ऑसम ऑलिव्‍ह, ऑसम लाइट ग्रे व ऑसम ग्रॅफाईट या रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल, तर गॅलॅक्‍सी ए३६ ५जी ऑसम लव्‍हेंडर, ऑसम ब्‍लॅक व ऑसम व्‍हाइट या रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

अतिरिक्‍त ऑफर्स
प्रमुख स्‍टोरेज अपग्रेड ऑफर व्‍यतिरिक्‍त, ग्राहकांना २,९९९ रूपयांच्‍या मूळ किमतीच्‍या तुलनेत फक्‍त ९९९ रूपयांमध्‍ये सॅमसंग केअर+ एक-वर्ष स्क्रिन प्रोटेशन देखील मिळू शकते. ग्राहक गॅलॅक्‍सी ए५६ ५जी वर जवळपास १८ महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआयचा आणि गॅलॅक्‍सी ए३६ ५जी वर जवळपास १६ महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआयचा देखीललाभ घेऊ शकतात. तसेच ग्राहकांना निवडक व्‍यवहारांसाठी सॅमसंग वॉलेटच्‍या वापरावर जवळपास ४०० रूपयांचे अॅमेझॉन वाऊचर मिळेल.

उपलब्‍धता
गॅलॅक्‍सी ए५६ आणि गॅलॅक्‍सी ए३६ आता खरेदीसाठी Samsung.com च्‍या माध्‍यमातून, तसेच सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह व पार्टनर स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहेत.

Related posts

पेटीएम अॅप, क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स, कार्ड मशिन विनासायास कार्यरत आहेत

Shivani Shetty

बीएलएस आणि सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम : वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळ स्वयंसेवक जीव रक्षणासाठी होणार सक्षम

Shivani Shetty

वजीरएक्सने क्रिप्टो कर भरण्याची प्रक्रिया सोपी केली

Shivani Shetty

Leave a Comment