राधिका आपटेने चित्रपटात येण्यापूर्वी नाटकाद्वारे तिच्या करिअरची सुरूवात केली होती. तिचे स्क्रीनवरील पदार्पण 2005 मध्ये शाहीद कपूर मुख्य भुमिकेत असलेल्या वाह! लाईफ हो तो ऐसी! द्वारे झाले होते. त्यानंतर तिने अनेक प्रसिद्ध झालेल्या भुमिका केल्या त्यामध्ये बदलापूर, फोबिया, पार्च्ड, पॅड मॅन, सेक्रेड गेम्स, आणि लस्ट स्टोरीज ह्यांचा समावेश आहे व त्यातून तिच्या अभियनातील वैविध्य दिसले. 2019 मध्ये तिला इंटरनॅशनल एमी अवार्डससाठी ‘नॉमिनेशन मेडल’ सुद्धा मिळाले होते व तेव्हा ती लस्ट स्टोरीजमधील तिच्या भुमिकेसाठी ‘ड्रामा सिरीजमधील सर्वोत्तम अभिनेत्री’ म्हणून तिला नामांकन मिळाले होते. आपटे ही स्क्रीनवर सर्वांत शेवटी मिसेस अंडरकव्हर मध्ये दिसली होती.
IMDb वरील राधिका आपटेची सर्वोच्च रेटींग असलेली टॉप 10 शीर्षके अशी आहेत:
- सेक्रेड गेम्स –5
- मेड इन हेव्हन – 8.3
- अंधाधुन – 2
- तुकाराम -8.1
- मांझी: द माउंटेन मॅन – 8.0
- पॅड मॅन -7.9
- अंतहिन – 7.9
- पर्च्ड – 7.5
- मोनिका, ओ माय डार्लिंग -7.4
- बदलापूर – 7.4
- रात अकेली है– 7.2
- शोर इन द सिटी – 7.2
- विक्रम वेधा – 7.1