maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

‘नाईशा’च्या ट्रेलरमध्ये भारतातील पहिले एआय संचालित सिनेस्टार्स

मुंबई, २ मार्च २०२५: ‘नाईशा’ सह एआय कथालेखनाचे नियम जणू नव्याने लिहीत आहे. नाईशा ही बॉलीवूडमधली पहिली फीचर-लेंथ फिल्म आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे एआय संचालित व्हिज्युअल्स आहेत. नाईशा या उद्योगात क्रांतीची नांदी घेऊन येत आहे आणि सर्जनशीलता आणि टेक्नॉलॉजीच्या मर्यादा रुंदावते आहे. या चित्रपटाचे बहु-प्रतीक्षित ट्रेलर नुकतेच आले आहे. या ट्रेलरमध्ये संपूर्णपणे एआय निर्मित मुख्य पात्रे नाईशा बोस आणि झैन कपूर दिसत आहेत. ही एक मनाची पकड घेणारी प्रेम कहाणी आहे, जी स्थळ-काळाच्या पलीकडे जाते.

बॉलीवूडच्या डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी ‘नाईशा’ एआय टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन कथा मांडणी सुधारते आणि दुसरीकडे आर्टिफिश्यल इंटेलिजन्स आणि मानवी भावना यांच्यातील अंतर कमी करते. अधिकृत ट्रेलरमध्ये एआय संचालित व्हिज्युअल्स, हृदयस्पर्शी कथानक आणि वेधक साऊंडट्रॅक आपल्याला खुणावतात. हा चित्रपट म्हणजे नवीन प्रकारचा सिनेमॅटिक अनुभव देण्यास वचनबद्ध असलेल्या अमेझिंग इंडियन स्टोरीज या नवीन एआय कंटेंट स्टुडिओचा पहिला उपक्रम आहे.

हा चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक विवेक अंचलिया यांनी आपले कथा मंडणीचे कौशल्य या अभूतपूर्व चित्रपटात दाखवले आहे. तिकडम (जिओ हॉटस्टार) चे दिग्दर्शन आणि राजमा चावल (नेटफ्लिक्स) च्या सह-लेखनाबद्दल प्रसिद्ध झालेल्या विवेक अंचलिया यांच्या मते ‘नाईशा’ हा बॉलीवूड द्वारे एआयच्या अंगिकाराच्या प्रक्रियेतील टर्निंग पॉइंट आहे.

विवेक अंचलिया म्हणाले, “‘नाईशा’द्वारे आम्ही मानवी कथाकथन आणि भारतीय संगीताची शक्ती यांचे एआय या तांत्रिक चमत्काराशी संयोजन करून लोकांना आवडेल अशी कथा सादर करत आहोत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सिनेमा आणि डिजिटल एन्टरटेन्मेंट विकसित झाले आहेतच, पण ही एक संपूर्ण नवीन आघाडी आहे. काल जे अशक्य होते ते संभव बनवण्यासाठी एआय आम्हाला आमच्या कक्षा रुंदावण्यास मदत करत आहे.”

ते पुढे म्हणतात, “नाईशामध्ये आजच्या युगाच्या तरुणांची गोष्ट आहे. हा युवा वर्ग स्वातंत्र्य आणि आपल्या मुळांशी असलेले नाते यांच्या कात्रीत सापडला आहे. एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्ही असे समकालीन विषय शोधत आहोत, जे तरुण भारतीयांना जवळचे वाटतील.

‘नाईशा’मध्ये विविध गीते आहेत, ज्यामध्ये चित्रपट उद्योगातील मोठमोठ्या हस्तींनी योगदान दिले आहे. अंधाधुन, जॉनी गद्दार, मेरी ख्रिसमस, बेलबॉटम, बवाल आणि अशा इतर काही चित्रपटाचा आरिजिनल स्कोअर रचणाऱ्या डॅनियल बी. जॉर्ज ने ‘मनमानियां’ आणि ‘रूहानियां’ (गायक- मधुवंती बागची, जिने स्त्री 2 मध्ये ‘आज की रात’ म्हटले आहे) ही दोन गाणी तयार केली आहेत. या व्यतिरिक्त, प्रोतीज्योती घोष आणि उज्ज्वल कश्यप यांनी अनुक्रमे ‘चीटर सैंया’ आणि ‘जाणे कहां’ ही गाणी कंपोझ केली आहेत. चित्रपटाची सांगीतिक बाजू बळकट करण्यात या प्रसिद्ध कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहे.

ट्रेलरमध्ये नाईशा या स्वच्छंदी बंगाली-मिझो मुलीची आणि कोलकाता, पॅरिस आणि स्वित्झर्लंडपर्यंत मुशाफिरी करणाऱ्या झैन या एका बंडखोर रॅपरचा परिचय करून दिला आहे. भूतकाळ आणि भविष्य यांच्या ओढाताणीत अडकलेल्या या दोन जीवांची पुनर्भेट होते तेव्हा प्रेम, पॅशन आणि ओळख यांचे सत्य त्यांच्या समोर येते.

पोरी भुयान, श्वेता शर्मा अंचलिया आणि जोसेफ फ्रँकलीन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि हा चित्रपट एआय प्रेरित चित्रपटांचे नवे युग सुरू करत मे २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Here is the link to the trailer-

https://youtu.be/6BVkucjaiwE

Related posts

कुहूची फंड्सइंडियासोबत हातमिळवणी

Shivani Shetty

टाटा मॅजिक बाय-फ्यूएलसह महाराष्ट्रच्‍या लास्‍ट माइल कनेक्‍टीव्‍हीटीचे सक्षमीकरण

Shivani Shetty

बीकेसी येथील सॅमसंग फ्लॅगशिप स्‍टोअरने नवीन गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या ७०० हून अधिक लवकर डिलिव्‍हरीजसह विक्रम रचला

Shivani Shetty

Leave a Comment