नोव्हेंबर १४, २०२४: नॅशनल अॅक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने (एनएबीएच) फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजल सोसायटीज ऑफ इंडियाच्या (एफओजीआयसी) मान्यता माता आरोग्य दर्जा मानकांचा समावेश एनएबीएचच्या सर्व प्रमाणन कार्यक्रमांमध्ये केला आहे. मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या तसेच भारत सरकारच्या ‘वन नेशन, वन स्टॅण्डर्ड’ या उद्दिष्टाच्या दिशेने पुढील पाऊल टाकण्याच्या उद्देशाने, एनएबीएच व एफओजीएसआय यांच्यात २०२२ मध्ये झालेल्या धोरणात्मक कराराचाच हा भाग आहे. देशभर एकसमान मानकांच्या माध्यमातून मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित मापदंड प्रस्थापित करून, हा करार, व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास चालना देणार आहे आणि वैश्विक आरोग्य संरक्षण साध्य करण्याच्या दृष्टीने चाललेल्या प्रयत्नांमध्ये योगदानही देणार आहे.
मान्यता हा एफओजीएसआयचा फ्लॅगशिप (प्रमुख) दर्जा सुधारणा व प्रमाणन उपक्रम आहे. बाळंतपणादरम्यान व बाळाच्या जन्मानंतर मातांची सातत्यपूर्ण, सुरक्षित व आदरपूर्वक काळजी घेण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट दर्जा राखला जाईल याची खातरजमा हा उपक्रम करतो. बाळाच्या जन्मपूर्वी (अँटिनेटल), बाळंतपणादरम्यान (इंट्रापार्टम) व बाळंतपणानंतर (पोस्टपार्टम) अशा टप्प्यांमध्ये मातेच्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घालून दिलेल्या मानकांच्या आधारे पुराव्यावर आधारित क्लिनिकल नियमांचा अवलंब करण्यास हा उपक्रम उत्तेजन देतो.
दोन संस्थांमधील या करारापूर्वी एक कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला. यामध्ये मान्यता मानकांनुसार प्रशिक्षण घेतलेल्या २०० खासगी प्रसुतीगृहांचे मूल्यमापन एनएबीएचच्या मूल्यांकनकर्त्यांद्वारे करण्यात आले. एफओजीएसआयने या कामासाठीच मूल्यांकन करणाऱ्यांची नियुक्ती केली होती व त्यांना प्रशिक्षणही दिले होते. मूल्यमापन एफओजीएसआय किंवा एनएबीएच यापैकी कोणाच्याही मूल्यांकनकर्त्यांनी केले तरीही प्रमाणन सातत्याने यशस्वी ठरत गेल्याचे प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात आढळले. एनएबीएचचा प्रवेश-स्तरावरील प्रमाणन कार्यक्रम करत असलेल्या आस्थापनांना यापुढे एनएबीएच आणि मान्यता यांची दुहेरी प्रमाणपत्रे प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्यसेवा मानक व विशेषीकृत माता सेवा नियम या दोन्हींची पूर्तता करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होईल, एनएबीएच होप पोर्टल त्यांना अर्ज प्रक्रिया व मूल्यमापनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म पुरवेल. याशिवाय संस्थेच्या नेटवर्कचा लाभ घेत एफओजीएसआय मूल्यांकनकर्त्यांचा शोध घेईल. त्यांना एनएबीएचद्वारे प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग या क्षेत्रांचे विशेष ज्ञान असलेल्या एनएबीएच मूल्यांकनकर्त्यांचा एक समर्पित समूह तयार होईल.
एनएबीएचचे अध्यक्ष श्री. रिझवान कोइता या घोषणेबद्दल म्हणाले, “प्रत्येक मातेला तिच्या प्रसूतीच्या ठिकाणानुसार सुसंगत काळजी मिळावी यासाठी एकसमान मानके अत्यावश्यक आहेत. नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स (NABH) च्या प्रमाणपत्र कार्यक्रमांमध्ये मण्यता मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करून, आपण केवळ आमच्या मान्यतेच्या चौकटीस मजबूत करत नाही आहोत, तर मातृ आरोग्यासाठी एक नवीन मापदंडही निश्चित करत आहोत. या प्रमाणकीकरणामुळे संपूर्ण भारतात मातृ काळजी बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल. याशिवाय, NABH आई आणि बालकांच्या काळजीसाठी काम करणाऱ्या रुग्णालयांसाठी आणि HIS/EMR प्रणालींसाठी डिजिटल हेल्थ स्टँडर्ड्समध्ये मातृ आरोग्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करेल”.
“आमच्या अधिमान्यता प्रक्रियेमध्ये मान्यता मानकांचे एकात्मीकरण होणे हे मातांचे आरोग्य सुधारण्याच्या दिशेने टाकलेले कायापालट घडवून आणणारे पाऊल आहे,” असे एनएबीएचचे सीईओ डॉ. अतुल मोहन कोचर म्हणाले. “या सहयोगामुळे आमच्या प्रयत्नांना एफओजीएसआयच्या कौशल्यांची जोड मिळेल, अधिमान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये सर्वसमावेशक माता आरोग्य नियमांची पूर्तता होत असल्याची निश्चिती यामुळे होईल. दर्जा अधिमान्यतेसाठी शाश्वत प्रारूप तयार करून देशभरातील माता व नवजात अर्भकांना त्याचा लाभ देणे हे आमच्यापुढील लक्ष्य आहे,” असेही ते म्हणाले.
एफओजीएसआयच्या महासचिव डॉ. माधुरी पटेल म्हणाल्या, “”गेल्या दोन दशकांत सुमारे 13 लाख भारतीय महिलांनी मातृत्वाशी संबंधित कारणांमुळे आपला जीव गमावला असून, एकूण मातृ मृत्यू दरात 70% घट होऊनही, प्रगती अधिक वेगवान करण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांचे 2030 चे शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सर्वसामान्य आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी, आपल्याला आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी आपला निर्धार वाढवावा लागेल. सहयोगाच्या सामर्थ्याचा वापर करून आपण काळजी मानके स्थिर करू शकतो, सेवा वितरण सुधारू शकतो आणि मातृ आरोग्यसेवा सुलभता वाढवणारे शाश्वत उपाय तयार करू शकतो.”
एफआयजीओ आशिया ओशिनियाचे विश्वस्त, एफओजीएसआयचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि एफओजीएसआय-मान्यता उपक्रमाचे प्रमुख प्रशासक डॉ. हृषिकेश डी. पै म्हणाले, “एफओजीएसआय आणि एनएबीएच यांच्यातील सहयोग हा उत्कृष्टता, जबाबदारी व खासगी क्षेत्रात रुग्णकेंद्री सेवाभाव यांची जोपासना करणाऱ्या संस्कृतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या यशाच्या पायावर उभारणी करण्यासाठी तसेच या उपक्रमाचे यश अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. यामुळे सर्वोत्तम पद्धतींच्या व्यापक स्तरावरील अंगिकाराला प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय, प्रत्येक बाळंतपण हा एक सुरक्षित, साधार व प्रतिष्ठेचा अनुभव ठरेल अशा भविष्यकाळाच्या दिशेने जाणारा मार्ग यातून तयार होऊ शकेल.”
एफओजीएसआय-मान्यता उपक्रमाच्या राष्ट्रीय निमंत्रक डॉ. हेमा दिवाकर म्हणाल्या, “प्रत्येक मातेला, मग ती कोणत्याही परिस्थितीतील असो, अनुकंपायुक्त व उत्कृष्ट काळजी घेतली जाण्याचा हक्क मिळवून देण्याची एफओजीएसआय व एनएबीएचची सामाईक दृष्टी या घोषणेतून स्पष्ट होते. एफओजीएसआय व एनएबीएच या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त तांत्रिक कार्यकारी समूहाच्या माध्यमातून आम्ही दर्जा मानकांमध्ये शिस्तबद्धता आणण्यावर काम करत आहोत. या मानकांमध्ये पायाभूत सुविधा तसेच प्रसुतीकक्षासारख्या सुविधांचा मेळ उत्तम साधला जाईल आणि माता व नवजातांची काळजी उत्तमरित्या घेतली जाईल यासाठी आम्ही काम करत आहोत. या धोरणात्मक करारामुळे रुग्णांची सुरक्षितता व क्लिनिकल उत्कृष्टता यांच्याप्रती आमची बांधिलकी तर अधिक दृढ झालीच आहे, शिवाय, उच्च दर्जाची, मानकीकृत सेवा देण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यातील लाभही अधोरेखित होत आहेत.”
एफओजीआयएसच्या माजी अध्यक्ष व आयएफएफएसच्या खजिनदार डॉ. रिष्मा पै म्हणाल्या, “एनएबीएचच्या प्रमाणन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मान्यताच्या सर्वसमावेशक नियमांचा समावेश करून, मातांना सर्वत्र दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचा दर्जा उंचावणारी ठोस, एकात्मिक प्रणाली विकसित करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवणे व दिल्या जाणाऱ्या सेवांचे मानकीकरण करणे एवढ्यापुरते आमचे उद्दिष्ट मर्यादित नाही, तर ही एक नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे या आस्थापनांमध्ये येणाऱ्या प्रत्येक मातेची व बाळाची सुरक्षितता निश्चित केली जाणार आहे.”
टाळता येण्याजोगे मातामृत्यू हा भारतात अद्यापही लक्षणीय चिंतेचा विषय आहे. ही घोषणा म्हणजे या समस्येवर उपाय करण्याच्या दिशेने दिलेले एक स्वागतार्ह आश्वासन आहे. भारतात माता आरोग्यसेवेची पूर्तता अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, अधिक चांगली आरोग्य निष्पत्ती साध्य करण्यासाठी मानकीकृत सेवा नियम प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे.