मुंबई, १२ एप्रिल २०२४: पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आश्वासन देते की त्यांचे अॅप, क्यूआर कोड्स, साऊंडबॉक्स आणि कार्ड मशिन्स पूर्णपणे कार्यरत आहेत. कंपनी विनाव्यत्यय सेवेची खात्री देते, तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी या सेवांवर अवलंबून असलेल्या लाखो वापरकर्त्यांना व व्यापाऱ्यांना सोयीसुविधा देते.
पेटीएमने आपल्या आर्थिक वितरण सेवा विस्तारित करण्यासाठी विविध बँकांसोबत सहयोग केला आहे. कंपनी देशभरातील वापरकर्त्यांसाठी सर्वसमावेशक, नेक्स्ट-जनरेशन आर्थिक इकोसिस्टम तयार करण्याप्रती कटिबद्ध आहे.
पेटीएम चित्रपट, इव्हेण्ट्स व प्रवासासाठी तिकिट बुकिंग्ज, रिचार्जेस् व युटिलिटी बिल पेमेंट्स अशा अनेक सेवा आपल्या अॅपच्या माध्यमातून सुलभपणे उपलब्ध होण्याची खात्री देते. तसेच, कंपनीने विविध विमा सेवांसह आपल्या ऑफरिंग्जमध्ये वाढ केली आहे, ज्यामधून वापरकर्त्यांना सर्वसमावेशक आर्थिक सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती कंपनीची समर्पितता दिसून येते.