maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

टाटा मोटर्सच्‍या सीएसआर उपक्रमांनी आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १ दशलक्ष व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला

मुंबई, 21 नोव्‍हेंबर, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल कंपनीने आज आपला १०वा वार्षिक कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अहवाल सादर केला, जो त्‍यांच्‍या धोरणात्‍मक सामुदायिक हस्‍तक्षेपांच्‍या परिवर्तनात्‍मक प्रभावाला प्रशंसित करतो. १ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात केलेल्‍या शाश्‍वत प्रभावाला दाखवत ‘बिल्डिंग टूगेदर ए मिलियन ड्रिम्‍स’ शीर्षक असलेला हा उल्‍लेखनीय अहवाल सहयोगांनी या दशकभराच्‍या प्रवासादरम्‍यान बजावलेल्‍या महत्त्वपूर्ण भूमिकेप्रती समर्पित आहे. ४० टक्‍क्‍यांहून अधिक लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायांमधील असण्‍यासह टाटा मोटर्सने २६ राज्‍ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमधील ९४ महत्त्वाकांक्षी जिल्‍ह्यांपर्यंत पोहोच वाढवत समुदायांपलीकडे आपल्‍या सीएसआर उपक्रमाची फूटप्रिंट वाढवली आहे.

१०व्‍या वार्षिक सीएसआर अहवालाच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स येथील सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, “आम्‍हाला आमच्‍या समर्पित सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून एक दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींना जीवनात घडवून आणलेल्‍या आमूलाग्र परिवर्तनासाठी केलेल्‍या प्रयत्‍नांचा अत्‍यंत अभिमान वाटतो. आमच्‍या नाविन्‍यपूर्ण ‘मोअर फॉर लेस फॉर मोअर’ धोरणाने आम्‍हाला कार्यक्षमतांना चालना देण्‍यास, तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यास, संसाधने सानुकूल करण्‍यास आणि उपक्रमांमध्‍ये वाढ करण्‍यास सक्षम केले आहे, ज्‍यामुळे देशभरात आमची पोहोच वाढवण्‍यासह आमचा प्रभाव अधिक दृढ होत आहे. या यशामधून आमच्‍या सहयोगींचा अविरत पाठिंबा आणि आम्‍ही सेवा देत असलेल्‍या समुदायांचा विश्‍वास दिसून येतो. आम्‍ही पुढे वाटचाल करत महत्त्वपूर्ण सामाजिक समस्‍यांचे निराकरण करण्‍याप्रती आणि सरकारी योजनांचा फायदा घेत शिक्षण, आरोग्‍य, रोजगारक्षमता व पर्यावरणीय संरक्षणामधील शाश्‍वत विकासाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

वर्षभरात, टाटा मोटर्सने हेल्‍थ (आरोग्‍य), एज्‍युकेशन (विद्याधनम), एम्‍प्‍लॉयेबिलिटी (कौशल्‍य) आणि एन्‍व्‍हायरोन्‍मेंट (वसुंधरा) यामध्‍ये केंद्रित सामाजिक हस्‍तक्षेपांची अंमलबजावणी करण्‍यासाठी सरकार, गैर-सरकार व खाजगी क्षेत्रांमधील क्षमतांना एकत्र आणण्‍यावर भर दिला, तसेच जल संवर्धन आणि एकात्मिक ग्रामीण विकासावर विशेष भर देण्‍यात आला.

आर्थिक वर्ष २४ साठी टाटा मोटर्सच्‍या सीएसआर अहवालाची ठळक वैशिष्‍ट्ये

जल सुरक्षेच्‍या दिशेने वाटचाल

नाम फाऊंडेशन (NAAM Foundation), मनरेगा विभाग (MGNREGA Department) आणि महाराष्‍ट्र सरकारसोबतच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्सने भारत सरकारच्‍या अमृत सरोवर मिशनअंतर्गत महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागामध्‍ये १०६ जलस्रोतांचा कायापालट व विकास केला आहे. या उपक्रमाने आतापर्यंत पालघर, पुणे आणि सातारा जिल्‍ह्यांमध्‍ये १,८६० दशलक्ष लिटर पाण्‍याची क्षमता निर्माण केली आहे, ज्‍यामुळे कृषी उत्‍पादकता वाढली आहे, भूजल पातळी वाढत आहे, पिण्‍यायोग्‍य पाणी उपलबध होत आहे आणि वर्षभर सिंचनाची खात्री मिळत आहे.

एकात्मिक सामुदायिक विकासाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण उदरनिर्वाहामध्‍ये सुधारणा

टाटा मोटर्स ग्रामीण समुदायांसोबत संलग्‍न होण्‍यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवलंब करते, जेथे स्‍थानिक प्रशासन प्रबळ करण्‍यावर विशेष फोकस आहे. महाराष्‍ट्रातील पालघर जिल्‍ह्यामध्‍ये जव्‍हारच्‍या आदिवासी भागात सुरू झालेला इंटीग्रेटेड व्हिलेज डेव्‍हलपमेंट प्रोग्राम (आयव्‍हीडीपी) आता पुणे, सानंद, जमशेदपूर आणि लखनौ अशा इतर हरित ठिकाणांमधील समुदायांपर्यंत पोहोचला आहे.

जव्‍हारमधील पाच ग्रामपंचायतींसोबतचा आपला सहभाग वाढवत आयव्‍हीडीपीने स्‍थलांतराचे प्रमाण ४५ टक्‍क्‍यांवरून २५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी केले आहे, सरासरी कौटुंबिक उत्‍पन्‍न ६० टक्‍क्‍यांनी वाढवले आहे आणि या आदिवासी पट्ट्यामध्‍ये वर्षभर पाणी उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतली आहे. टाटा मोटर्सने अहमदाबाद जिल्ह्यातील नवापारा येथील ओसाड वस्तीचा कायापालट केला आहे, जेथे वंचित आदिवासी समुदायाची वस्ती आहे. वर्षभर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसह २३० पैकी १९० कुटुंबं उत्‍पन्‍नाचा मुख्य स्त्रोत म्हणून मत्स्यपालन व्‍यवसाय करत आहे. समुदायाचे स्थलांतर ४० टक्क्यांनी कमी झाले आहे आणि शाळा सोडण्याच्या दरात १० टक्‍के घट झाली आहे.

हरित आणि अधिक शाश्‍वत पर्यावरणाची निर्मिती

महात्‍मा गांधी एनरेगा योजनेअंतर्गत महाराष्‍ट्र सरकार आणि बीएआयएफ इन्स्टिट्यूटसोबत सहयोगाने टाटा मोटर्सने महाराष्‍ट्रातील पालघर जिल्‍ह्यामध्‍ये १.७ दशलक्ष रोपांची लागवड केली आहे, ज्‍यामुळे ज्यामुळे १३,००० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे आणि १३,००० एकर वापरात नसलेल्‍या शेतजमीनीला उत्पादक वापरात आणली आहे.

टाटा मोटर्सच्या शहरी वनीकरण उपक्रमाने टीईआरआरई पॉलिसी सेंटरसोबत सहयोगाने पुणे आणि आसपासच्या भागांमधील २०० हेक्टर क्षेत्रावर १२५,००० झाडे लावली आहेत. ही शहरी जंगले दरवर्षी ३००,००० किलो कार्बन शोषून घेतात, जैवविविधतेचे संरक्षण करतात आणि हवेचा दर्जा सुधारतात.

सुधारित शैक्षणिक पाठिंब्‍याच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांचे सक्षमीकरण

इंजीनिअरिंग नीट अॅडमिशन ब्रिज अॅक्‍सेलरेटेड लर्निंग एंगेजमेंट (एनेबल) प्रोग्राम नवोदय विद्यालय समिती, अवंती फेलोज आणि एक्‍स-नवोदय फाऊंडेशनसोबत सहयोगाने ५५० हून अधिक जव्‍हार नवोदय विद्यालयांना जेईई व नीट (NEET) परीक्षांसाठी कोचिंग, लाइव्‍ह क्‍लासेस व मॉक टेस्‍ट्ससह साह्य करतो. दरवर्षी, एनेबल डिजिटल प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून इयत्ता अकरावी व बारावीच्‍या १८,००० विज्ञान शाखेच्‍या विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण व समुपदेशन देते, ज्‍यामुळे त्‍यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी तयारी करण्‍यास मदत होते. २०२३-२४ मध्‍ये एनेबल ऑनलाइन प्रोग्राममधील २७ टक्‍के विद्यार्थी आयआयटी जेईईसाठी पात्र ठरले, तर ७९ टक्‍के विद्यार्थी नीट परीक्षांमध्‍ये पात्र ठरले.

तरूणांसाठी नवीन करिअर मार्गांची निर्मिती

लर्न, अर्न अँड प्रोग्रेस (लीप) या प्रमुख सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी प्रोग्राम वंचित समुदायांमधील तरूणांना, विशेषत: रोजगारासाठी आवश्‍यक कौशल्‍यांचा अभाव असलेल्‍या शाळा सोडलेल्‍या तरूणांना मोटर मेकॅनिक वेईकल्‍स (एमएमव्‍ही) मधील ऑटो ट्रेड कौशल्‍यांचे ज्ञान देतो. आयटीआय, स्किल्‍स फॉर प्रोग्रेस (स्किप) आणि टाटा मोटर्स डिलर्ससोबत सहयोगाने हा उपक्रम तीन महिन्‍यांचे सिद्धांत प्रशिक्षण, ज्‍यानंतर नऊ महिन्‍यांचे ऑन-जॉब-ट्रेनिंग (ओजेटी) देतो. १६ राज्‍यांमध्‍ये फूटप्रिंट असण्‍यासह लीप दरवर्षाला जवळपास १५०० तरूणांना प्रशिक्षण देतो, ज्‍यापैकी जवळपास ८० टक्‍के तरूणांना टाटा मोटर्स इकोसिस्‍टममध्‍ये किंवा इकोसिस्‍टमबाहेर रोजगार मिळतो. लीपच्‍या लाभार्थींचा मोठा विभाग फर्स्‍ट-जनरेशन विद्यार्थी आहेत.

आदिवासींच्‍या राहणीमानात सुधारणा

वनोपजांवर पहिला आणि नैसर्गिक अधिकार असूनही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील जुन्‍नर आणि आंबेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना हिरडा बेरीची व्यावसायिक खरेदी किंवा विक्री करण्याची परवानगी सरकारने दिली नाही. २०२० मध्ये, हिरडा खरेदी-विक्रीकरिता स्थानिक तरुणांना प्रशिक्षण व रोजगार देण्यासाठी टाटा मोटर्स आणि शाश्‍वत संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी उत्पादक गट (एफपीजी) ची स्थापना करण्यात आली.

एफपीजी ११ गावांमधील ३०० कुटुंबांवरून चार तालुक्यांतील ५,००० कुटुंबांपर्यंत वाढले आहे. शेतकऱ्यांना रिअल-टाइम, वाजवी किंमत प्रदान केल्यामुळे चार वर्षांत ४ कोटी रूपये महसूल जमा झाला आहे. या उपक्रमामुळे कौटुंबिक उत्पन्‍न वाढले आहे, स्थलांतरावर अंकुश बसला आहे आणि शाश्‍वत कृषी पद्धतींना चाला मिळाली आहे.

सर्वांगीण आरोग्‍य उपक्रम

२०२३-२४ मध्‍ये जमशेदपूरमधील मालन्‍यूट्रिशन ट्रीटमेंट सेंटर (एमटीसी)ने परिवार कल्‍याण संस्‍थान (पीकेएस) सोबत सहयोगाने दुर्गम भागांमध्‍ये आपल्‍या आरोग्‍यसेवा विस्‍तारित केल्‍या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी क्षमता-निर्माण उपक्रमांमध्‍ये वाढ केली. दरवर्षाला सेव्‍हर अॅक्‍यूट मालन्‍यूट्रिशन (एसएएम)ने पीडित ५,५०० मुलांचा उपचार करणाऱ्या एमटीसीने आपली पोहोच दुप्‍पटीहून अधिकने वाढवली.

या यशाला अधिक पुढे घेऊन जात, टाटा मोटर्सने परवरिश केंद्रे स्‍थापित करण्‍यासाठी आणि वंचित समुदायांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी उत्तराखंडमधील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डेव्‍हलपमेंट (आयएसडी) आणि बाल विकास विभागासोबत सहयोग करत कुपोषणाचे निराकरण करण्‍याच्‍या आपल्‍या प्रयत्‍नांमध्‍ये वाढ केली आहे.

कर्मचारी स्‍वयंसेवेचे सक्षमीकरण

टाटा मोटर्सने संस्‍थात्‍मक संस्‍कृती म्‍हणून स्‍वयंसेवा प्रबळ करण्‍यासाठी परिवर्तनात्‍मक उपाय हाती घेतले. कंपनीने आतापर्यंतच्‍या सर्वाधिक ५९ टक्‍के कर्मचारी सहभागाची नोंद केली, जेथे त्‍यांनी समुदाय सेवेसाठी १,१७,००० तास स्‍वयंसेवा केली.

Related posts

क्रेडाई-एमसीएचआय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाश्वततेसाठी वचनबद्ध आहे; दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी फिनिक्स फाऊंडेशनला पाठिंबा

Shivani Shetty

परवडण्याजोगी आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

Shivani Shetty

कच्छची गानकोकिळा, गुजरातची सर्वोत्तम आणि अव्वल लोकगायिका ‘गीता रबारी’ नवरात्रोत्सवामध्ये पहिल्यांदाच मुंबईत…

Shivani Shetty

Leave a Comment