maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग टीव्‍ही प्‍लसकडून फक्‍त सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍हींवर व्‍हायकॉम१८ च्‍या चार नवीन फास्‍ट चॅनेल्‍सच्‍या लाँचची घोषणा

गुरूग्राम, भारत – नोव्‍हेंबर १३, २०२४: सॅमसंग टीव्‍ही प्‍लस या भारतातील ब्रँडच्‍या फ्री अॅड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टीव्ही (फास्‍ट) सेवेने फक्‍त सॅमसंग टीव्‍ही प्‍लसवर चार नवीन फास्‍ट चॅनेल्‍स – सुपरहिट बीट्स, कानफोड म्‍युझिक, फुली फालतू आणि कलर्स इन्फिनिटी लाइट लाँच करण्‍यासाठी व्‍हायकॉम१८ सोबत सहयोग केला आहे.

 

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस मोफत स्‍ट्रीमिंग सर्विस आहे, जी सॅमसंग स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍समध्‍ये प्री-इन्‍स्‍टॉल केलेली आहे, ज्‍यामुळे निवडक देशांमध्‍ये बातम्‍या, क्रीडा, मनोरंजनासह चॅनेल्‍सची व्‍यापक श्रेणी मिळते. भारतात, सॅमसंग टीव्‍ही प्‍लस प्रेक्षकांना १०० हून अधिक लाइव्‍ह टीव्‍ही चॅनेल्‍स आणि हजारो लाइव्‍ह व ऑन-डिमांड चित्रपट व टीव्‍ही मालिकांचा आनंद देते.

 

”आम्‍हाला सॅमसंग टीव्‍ही प्‍लस प्‍लॅटफॉर्मवर सहयोगी म्‍हणून व्‍हायकॉम१८ चे स्‍वागत करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही भारतातील प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण कन्‍टेन्‍ट पर्यायांचा आनंद देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे त्‍यांच्‍या पसंती व व्‍युइंग सवयींची पूर्तता करतात. या नवीन ऑफरिंग्‍ज सॅमसंग टीव्‍ही प्‍लसवर मनोरंजन पर्यायांमध्‍ये वाढ करण्‍यासोबत वापरकर्त्‍यांना अपवादात्‍मक मूल्‍य व विविधता देण्‍याप्रती आमच्‍या समर्पिततेला देखील दाखवतील,” असे सॅमसंग टीव्‍ही प्‍लस इंडियाच्‍या पार्टनरशीप्‍सचे प्रमुख कुणाल मेहता म्‍हणाले.

 

व्‍हायकॉम१८ च्‍या डायनॅमिक कन्‍टेन्‍ट ऑफरिंग्‍ज प्रेक्षकांना अद्वितीय मनोरंजन अनुभव देतील. सुपरहिट बीट्स संगीतप्रेमींसाठी प्रमुख गंतव्‍य ठरेल, जेथे नवीन हिट व कालातीत आवडत्‍या गाण्‍यांचा आनंद मिळेल. कानफोड म्‍युझिक विविध पसंतींची पूर्तता करत म्‍युझिकच्‍या वैविध्‍यपूर्ण एकत्रिकरणाचा आनंद देईल. फुली फालतूचा लक्षवेधक व फ्रेश कन्‍टेन्‍टसह तरूणांचे लक्ष वेधून घेण्‍याचा मनसुबा आहे, तर कलर्स इन्फिनिटी लाइट प्रीमियम इंग्रजी कन्‍टेन्‍टचे मनोरंजन देईल, ज्‍यामध्‍ये आंतरराष्‍ट्रीय शोज व चित्रपटांचा समावेश असेल.

 

”सॅमसंग टीव्‍ही प्‍लससोबतचा हा सहयोग व्‍हायकॉम१८ साठी मनोरंजन देण्‍याच्‍या पद्धतीला नवीन आकार देण्‍याच्‍या दिशेने धाडसी पाऊल आहे. हा सहयोग प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्ण व प्रीमियम कन्‍टेन्‍टचा आनंद देईल. आमचा सर्वोत्तम, परस्‍परसंवादी अनुभव निर्माण करण्‍यावर, तसेच प्रेक्षकांना त्‍यांच्‍या सोईप्रमाणे मनोरंजनाचा आनंद देण्‍यावर फोकस आहे,” असे व्‍हायकॉम१८ च्‍या युथ, म्‍युझिक अॅण्‍ड इंग्लिश एंटरटेन्‍मेंट क्‍लस्‍टरचे बिझनेस हेड अंशुल अलियावाडी म्‍हणाले.

Related posts

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून पहिले प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर – ‘acti.ev’ लाँच

Shivani Shetty

२१ महिन्यांच्या चिमुरड्याने अस्थिमज्जा प्रत्यारोपणावर केली मात

Shivani Shetty

टाटा मोटर्सच्‍या सर्वांगीण विक्री-पश्‍चात्त सेवांमुळे महाराष्‍ट्रातील ट्रक्‍स विनासायास कार्यरत आहेत

Shivani Shetty

Leave a Comment