मुंबई, 26 डिसेंबर, 2023: भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीकअसलेल्या महालक्ष्मी सरस 2023-24 या उत्सावाचे 26 डिसेंबरलामुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील एमएमआरडीएच्यामैदानावर अतिशय उत्साहात आणि धडाक्यात शुभारंभ झाला. नॅशनलबँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डतर्फेआयोजित या उत्सावात देशभरातील अनेक कारागिरांना त्यांच्यामालाची विक्रीसाठी उत्तम दालन प्राप्त झालेले आहे.
महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री श्री. गिरीश महाजनयांनी महालक्ष्मी सरस 2023-24 या उत्सावाचे उदघाटन केले. यावेळीमहाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना (एमएसआरएलएम) चेसीईओ श्री. रूचेश जयवंशी, एमएसआरएलएमचे सीओओ श्री. परमेश्वर राऊत, रेमंड डिसोझा तसेच एमएसआरएलएमचे अन्यअधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना (एमएसआरएलएम) शीसंबंधित असलेल्या उमेद या उपक्रमाच्या सहकार्याने, केद्र सरकारचेग्रामीण विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचे ग्रामीण विकासविभाग यांच्याद्वारे 2006 पासून दरवर्षी आयोजित केला जाणारामहालक्ष्मी सरस मेळा हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करते. बचत गट (एसएचजी), ग्रामीण भागातील कुशल कारागीर, कलाकार, शेतकरी आणि अन्य भागधारकांना त्यांची उत्पादने ग्राहकांसमोरआणण्यात तसेच शहरी ग्राहकांशी थेट संबध जोडण्यासाठी हा मेळाअतिशय उपयुक्त ठरला आहे.
याप्रसंगी बोलताना नाबार्डचे अध्यक्ष श्री. के. व्ही. शाजी (Shaji) म्हणाले, “महालक्ष्मी सरस मेळा ग्रामीण कारागिरांना सक्षमबनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, कारागिरांना आम्हीकेवळ बाजारपेठच उपलब्ध करून देत नाही तर, भारताच्या समृद्धसांस्कृतिक वारशाच्या सखोल माहितीचा प्रसार करणाऱ्या कार्यक्रमाशीजोडले गेलो आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. यासारख्याउपक्रमांद्वारे, ग्रामीण कारागीर आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी कमीकरणे, शाश्वत उपजीविका निर्माण करणे आणि आपल्या समृध्द आणविविधता असलेल्या परंपरांचे जतन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,”
याप्रसंगी बोलताना नाबार्डचे सीजीएम श्री. रेमंड डिसोझा म्हणाले, “नाबार्डने पाठबळ दिलेला प्रत्येक स्टॉल आमच्या कारागिरांनीसुंदररित्या विणलेले हातमाग तसेच हस्तकला तयार करण्याच्या त्यांच्याप्रयत्नांची गाथा उलगडतो. नाबार्ड ग्रामीण कारागीर आणि शेतकर्यांनाअत्याधुनिक पध्दतीने मदत करत राहील आणि सरस मेळ्यातत्यांच्यासाठी तब्बल 49 स्टॉलची तरतूद हे एक उदाहरण आहे. सरसमध्ये सहभागी झालेले कारागीर ग्रामीण भागातील अन्यकारागींराना पुढे येण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची शहरी भागातविक्री करण्यास प्रेरित करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
यंदाच्या उत्सवात 500 हून अधिक स्टॉल्स आहेत. या स्टॉल्सवरभारतभरातील विविध उत्पादने मांडण्यात आलेली आहेत. उल्लेखनीयम्हणजे, नाबार्डने देशभरातील विविध कारागिरांच्या ४९ स्टॉल्ससाठीमदत देत मेळ्याच्या अनोख्या योजनेमध्ये योगदान दिलेले आहे. यास्टॉल्सच्या माध्यमातून आसामी गामोचा, पोचमपल्ली साड्या, बनारसीसाड्या, टांगलिया उत्पादने इत्यादी कलाकुसरीच्या वस्तू मांडण्यातआलेल्या आहेत. स्वयंम बचत गट (एसएचजी), शेतकरी उत्पादकसंस्था (एफपीओ) आणि बिगर शेतकरी उत्पादक संस्था (ओएफपीओ) तील सुमारे 100 ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने सादरकरण्यासाठी नाबार्ड मदत करत आहे. नाबार्ड–सहाय्यित कारागीर गटया मेळ्यात 13 भौगोलिक संकेत (जीआय) प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शनकरणार आहे.
ग्रामीण भागातील दुर्लक्षित होत चाललेल्या कला आणि हस्तकलेचेसंरक्षण करण्याची गरज ओळखून, त्यांना मदतीसाठी नाबार्डआघाडीवर आहे, ग्रामीण कारागीर, विणकर, शेतकरी आणि कारागीरयांना आर्थिक सहाय्य, कौशल्य, बाजार जोडणी आणि पायाभूत सुविधाप्रदान करत बँक मदत करत आहे. आपल्या सहाय्यकारी उपक्रमांचा एकभाग म्हणून, सरस मेळ्याचा 2023-24 उत्सवासाठी नाबार्ड सातत्यपूर्णसहाय्य देत आहे. जीआय–टॅग केलेल्या उत्पादनांचे महत्त्व अधोरेखितकरताना नाबार्ड हे सुध्दा सुनिश्चित करत आहे की, केवळ सर्जनशीलआणि नाविन्यपूर्ण उत्पादने यांनाच मेळ्यामध्ये स्थान मिळेल आणिशहरी ग्राहकांसमोर या वैविध्यपूर्ण आणि विशिष्टतेने नटलेल्याआपल्या समृद्ध परंपरेचे सादरीकरण होईल.
अनेक ग्रामीण कारागिरांना शहरी बाजारपेठांमध्ये सहजासहजी प्रवेशमिळत नाही. सरस मेळा त्यांना आपल्या उत्पादनांच्यासादरीकरणीसाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतो. हे व्यासपीठ ग्रामीणकारागीरांना शहरी बाजारपेठेची प्राधान्ये समजून घेण्यास मदत करतेतसेच अनुकूल वातावरणही तयार करते. कारागीर उत्तम किंमतमिळण्यासाठी ग्राहकांशी वाटाघाटी करू शकतात आणि मोठ्याप्रमाणात कॉर्पोरेट ऑर्डरसाठी संधी शोधू शकतात. ग्रामीण कारागिरांनाउत्पन्न वाढवण्यासाठी, स्वतःचा ब्रँड विकसित करण्यासाठी आणिशहरी ग्राहकांमध्ये ओळख मिळवण्यासाठी नाबार्डची या सहयोगातूनएक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देते.
प्रदर्शनाचा समारोप येत्या 7 जानेवारी 2024 रोजी होईल. तोपर्यंत सर्वदिवस ग्राहकांना सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत स्टॉल्सला भेट देतायेतील.
About NABARD:
The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is an apex development financial institution in India. Established on 12 July 1982, with headquarters in Mumbai, NABARD operates with a mission to promote sustainable and equitable agriculture and rural prosperity through effective credit support, related services, institutional development, and other innovative initiatives. NABARD plays a crucial role in fostering rural development, empowering farmers, and catalysing the growth of the rural economy.