maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मेटाकडून GenAI च्‍या माध्‍यमातून भारतातील ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेमध्‍ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी एनएलएसआययू – आयआयटी बॉम्‍बे रिसर्च प्रोजेक्‍टला मदतीचा हात

बेंगळुरू, नोव्‍हेंबर २८, २०२३: मेटाने आज नॅशनल लॉ स्‍कूल ऑफ इंडिया युनिव्‍हर्सिटीच्‍या (एनएलएसआययू) संशोधन प्रकल्‍पाला मदतीचा हात पुढे करण्‍याची घोषणा केली. यामुळे भारताील ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेमधील कार्यक्षमता वाढवण्‍याकरिता सार्वजनिक सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या लार्ज लँग्‍वेज मॉडेल्‍सचे (एलएलएम) मूल्‍यांकन करता येईल, जे वास्‍तविक विश्‍वातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी जबाबदार व खुल्‍या एआय इनोव्‍हेशनच्‍या इकोसिस्‍टमला चालना देण्‍याच्‍या मेटाच्‍या सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांचा भाग आहे. नॉलेज पार्टनर म्हणून ग्राहक व्यवहार विभागासह (डीओसीए) सहयोगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) सोबत हा प्रकल्प राबवविण्‍यात येईल.

संशोधन उपक्रम मेटाचे खुले उपलब्‍ध असलेले मोठे लँग्‍वेज मॉडेल लामा २ (Llama 2) चा फायदा घेण्‍याच्‍या व्‍यवहार्यतेचा शोध घेईल, ज्‍यामुळे ग्राहक कायदा क्षेत्रात ग्राहक केंद्रित बॅटबॉट व निर्णय-सहाय्यक साधनाच्‍या संकल्‍पनेची निर्मिती करण्‍यासह मूल्‍यांकन करता येईल. कार्यक्षमता वाढवण्‍याच्‍या ध्‍येयासह चॅटबॉटची रचना ग्राहकांना तक्रारीचा मसुदा तयार करण्याच्या आणि भारतातील ग्राहक कायद्याशी संबंधितप्रश्नांची उत्तरे देण्याच्या प्रक्रियात्मक पैलूंवर मार्गदर्शन करण्यासाठी केली जाईल. या संशोधनामधील निर्णय-सहाय्यक साधन देखील ग्राहकप्रकरणांच्या क्षेत्रातील न्यायिक अधिकाऱ्यांना साह्य करण्‍याच्‍या उद्देशाने खटल्यातील कायदे आणि दस्तऐवजांचे सारांश शोधण्‍यास पाठिंबा देण्‍यासाठी डिझाइन केले जाईल. मानवी धोरणकर्त्‍यांद्वारे चालू असलेल्या देखरेख आणि नियंत्रणाच्या संदर्भात एलएलएम ग्राहकांना किंवान्यायिक अधिकाऱ्यांना कशी मदत करू शकतात हे संशोधन प्रकल्प शोधून काढेल. जबाबदार नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध राहत एनएलएसआययू आणि आयआयटी श्वेतपत्रिका देखील जारी करतील, ज्यात अंमलबजावणी केलेल्‍या जोखीम कमी करण्याच्या पद्धती आणि स्टॅकच्या प्रत्येकस्तरावर जबाबदार डिझाइन तत्त्वे कशी तैनात केली गेली आहे, याचे स्‍पष्‍टीकरण केले जाईल.

इव्‍हेण्‍टच्‍या उद्घाटनाप्रसंगी नॅशनल लॉ स्‍कूल ऑफ इंडिया युनिव्‍हर्सिटीचे वाइस-चान्‍सलर प्रा. सुधीर कृष्‍णास्‍वामी म्‍हणाले, ”नॅशनल लॉ स्‍कूल ऑफ इंडिया युनिव्‍हर्सिटी कायदेशीर यंत्रणा सुधारणांना मदत करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स वापरून शैक्षणिक संशोधन आणिकायदेशीर नवकल्पनांप्रती कटिबद्ध आहे. ग्राहक कायद्यावरील या प्रकल्पाचा ग्राहक हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्‍याचा आणि लामा२ (Llama2)चा फायदा घेऊन सुलभ सहाय्य प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. आंतरविद्याशाखीय संशोधनातील आमच्या निपुणतेचा फायदा घेत एनएलएसआययू मोठ्या लँग्‍वेज मॉडेल्‍सचा अवलंब करणाऱ्या या कायदेशीर उपयोजनांना पुढे घेऊन जाण्‍यास मदत करण्‍यासाठी अद्वितीयरित्‍या स्थित आहे. आम्ही देशातील ग्राहक तक्रारींच्‍या लँडस्केपचे मूल्‍यांकन करण्यासाठी भारतीय कायदेशीर संसाधनांचा संपन्‍नकॉर्पस तयार करू आणि या कॉर्पसचा वापर लामा मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी करू. मॉडेलमध्ये दिलेली सामग्री संबंधित, विश्वासार्ह आणिवापरकर्ता-अनुकूल आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही कार्य करू. याव्यतिरिक्त, आम्‍ही ग्राहकांच्‍या तक्रारींचे कार्यक्षमपणे निवारण करण्‍यास साह्य करण्‍यासाठी निर्णय-सहाय्यक साधनाचा प्रोटोटाइप तयार करू. आम्‍ही या उत्‍साहवर्धक उपक्रमासाठी मेटा, आयआयटी बॉम्‍बे आणि ग्राहक व्‍यवहार विभागासोबत सहयोगाने काम करण्‍यास उत्‍सुक आहोत. हा उपक्रम भारतातील परिवर्तनात्‍मक कायदेशीर सुधारणांच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे.”

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत ग्राहक व्‍यवहार विभागाचे सचिव श्री. रोहित कुमार सिंग म्‍हणाले, ”सरकार ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. लाँच करण्‍यात आलेला संशोधन प्रकल्‍प ग्राहक हक्‍क व जागरूकता सुधारण्‍यासाठी, भारतातील ग्राहक संरक्षणाप्रती आमच्‍या प्रयत्‍नांना गती देण्‍यासाठी जनरेटिव्‍ह एआयचा वापर करत नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सचे मूल्‍यांकन करण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्‍नांच्‍या दिशेने पुढाकार आहे. एनएसएलआययू व आयआयटी बॉम्‍बे यांच्‍यासह ग्राहक व्‍यवहार विभागाच्‍या पुढाकाराने सुरू करण्‍यात आलेल्‍या या उपक्रमाला मेटाचे पाठबळ आहे आणि ग्राहकांच्‍या फायद्यांकरिता अॅप्‍लीकेशन्‍स निर्माण करण्‍यासाठी ओपन इनोव्‍हेशनचा वापर करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे.”

मेटाच्‍या ग्‍लोबल पॉलिसीचे उपाध्‍यक्ष जोएल कॅप्‍लान म्‍हणाले, ”मेटाने दशकापासून आमच्‍या एआय प्रयत्‍नांमध्‍ये संशोधन, ओपन सायन्‍स आणि शैक्षणिक व उद्योग भागीदारांसोबत सहयोगाला प्राधान्‍य दिले आहे. आम्‍ही ओपन इनोव्‍हेशनमुळे तंत्रज्ञानांना मिळणारी चालना प्रत्‍यक्ष पाहिली आहे, ज्‍यामुळे अधिकाधिक व्‍यक्‍तींना फायदा होईल आणि क्षेत्रांमध्‍ये आमूलाग्र बदल घडून येईल. आम्‍हाला एनएलएसआययूला लामा २ (Llama 2) चा फायदा घेत एआय साधने निर्माण करणाऱ्या त्‍यांच्‍या संशोधन उपक्रमांसाठी पाठिंबा देताना आनंद होत आहे. अधिकाधिक संशोधन, विकासक व स्‍टार्टअप्‍स तंत्रज्ञान निर्माण करण्‍यासह त्‍यासंदर्भात प्रयोग करत असल्‍यामुळे आपण युज केसेस, मॉडेलचे सुरक्षित उपयोजन आणि संभाव्‍य संधींबाबत अधिक जाणून घेऊ शकतो.”

आयआयटी बॉम्‍बेचे प्राध्‍यापक आणि प्रसिद्ध नॅच्‍युलर लँग्‍वेज प्रोसेसिंग अॅण्‍ड मशिन लर्निंग एक्‍स्‍पर्ट प्रा. पुष्‍पक भट्टाचार्य म्‍हणाले, ”एलएलएम म्‍हणजेच मेटाचे लामा २ (Llama 2) हे ज्‍वलंत उदाहरण आहे, आज सामाजिक भल्‍यासाठी व्‍यापक क्षमता असलेले एआयमधील सर्वात उत्‍साहवर्धक विकास आहे. डोमेन-टास्‍क-लँग्‍वेज, उदाहरणार्थ लॉ-चॅटबॉट-इंग्लिश किंवा अॅग्रीकल्‍चर-सेंटिमेंट-मराठी या त्रिमूर्तीचा एलएलएमच्‍या माध्‍यमातून अनपेक्षित पद्धतीने सामना केला जाणार आहे. एनएलपी, एमएल व एलएलएममधील आमच्‍या दीर्घकालीन व सखोल कौशल्‍यासह आम्‍ही मेटा, एनएलएसआययू व डीओसीए यांच्‍यासोबत ग्राहक कायद्याच्या डोमेनमध्ये प्रश्नांची उत्तरे आणि शोध याअतिशय प्रभावी समस्येवर काम करण्यास उत्सुक आहोत.”

मेटा GenAI संशोधनामधील उद्योग अग्रणी आहे आणि भारतात प्रबळ एआय इकोसिस्‍टम निर्माण करण्‍यासाठी सहयोग करत आहे. मेटाचा एआय मॉडेल्‍स निर्माण करण्‍यासाठी खुल्‍या दृष्टिकोनावर विश्‍वास आहे आणि त्‍यांना जबाबदारीने प्रगत करण्‍यासाठी उद्योग, सरकार, नागरी समाज व शैक्षणिक संस्‍थांसोबत सहयोगाने काम करते.

Related posts

ILT20 सीझन 2 च्या यशानंतर ब्लॉकबस्टर सीझन 3 ची तयारी सुरू

Shivani Shetty

वझीरएक्स एक्सचेंजकडून टोकनफायचा समावेश

Shivani Shetty

प्रतिष्ठित FAI पुरस्कार ‘मॅटिक्स फर्टिलायझर्स अँड केमिकल्सला’

Shivani Shetty

Leave a Comment